Pune School Reopening : पुण्यात शाळांची घंटा वाजणार का? विद्येच्या माहेरघरात संभ्रमाचं वातावरण
पुण्यात शाळा सुरु करण्याबाबत संभ्रम निर्माण झाला असून दुपारी 1वाजेपर्यंत पुन्हा सर्वांशी चर्चा करुन घेणार निर्णय घेणार असल्याची माहिती महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी दिली आहे.
पुणे: महाराष्ट्रात पुण्याला विद्येचं माहेरघर म्हणून ओळखलं जातं. राज्य सरकारनं तब्बल दीड वर्षानंतर पहिलीपासूनचे वर्ग सुरु करण्याचा निर्णय घेतलाय. शालेय शिक्षण विभागानं शाळा सुरु करण्यासंबंधीचा शासन निर्णय देखील जारी केला आहे. मात्र, पुण्यात शाळा सुरु करण्याबाबत संभ्रमाचं वातावरण असल्याचं दिसून आलं आहे. पुणे महापालिकेचे आयुक्त विक्रम कुमार यांनी दुपारी 1वाजेपर्यंत पुन्हा सर्वांशी चर्चा करुन घेणार निर्णय घेणार असल्याची माहिती दिली आहे.
पालक संघटना आणि शिक्षण संस्थाशी चर्चा करणार, महापौरांची भूमिका
राज्य सरकारकडून पहिली ते चौथीच्या शाळा उद्यापासून सुरु करण्याची घोषणा करण्यात आली असली तरी पालक संघटना आणि शिक्षण संस्था यांच्याशी चर्चा करूनच निर्णय घेतला जाईल, असं महापौर मुरलीधर मोहोळ यांनी स्पष्ट केलंय. त्यामुळे शाळा सुरु करण्याबाबत प्रशासनात संभ्रम असल्याचं चित्र आहे.
शाळांची तयारी पूर्ण, पालकही आग्रही
पुण्यातील शाळांनी पहिलीपासूनचे वर्ग सुरु करण्यासाठीची तयारी पूर्ण केलीय. तर, दुसरीकडे शाळा सुरु करावी अशी पालकांची भूमिका आहे. दुपारी 1 वाजेपर्यंत याबाबतचा निर्णय घेतला जाईल, असं सांगण्यात आलंय. त्यामुळे शाळा सुरु करण्याबाबत काय निर्णय होतो याकडे सर्वांचंच लक्ष लागलं आहे.
सोलापूरमध्येही आज निर्णय होणार
सोलापूर महापालिका क्षेत्रातील शाळा सुरु करण्यासंबंधीचा निर्णय आज घेण्यात येणार आहे. सोलापूर महापालिकेचे आयुक्त पी. शिवशंकर हे यासंबंधी निर्णय घेणार आहेत. तर, नाशिक जिल्ह्यातील शाळा सुरु करण्याचा निर्णय देखील लांबणीवर टाकण्यात आला आहे. तर, मुंबई महापालिकेनं देखील पहिली ते चौथीचे वर्ग उद्यापासून सुरु न करण्याचा निर्णय घेतला आहे. आता पुणे महापालिका कोणता निर्णय घेणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
इतर बातम्या
Solapur School Reopening: सोलापूर शहरातील शाळा सुरु की बंद, महापालिका आयुक्तांच्या निर्णयाकडे लक्ष
Pune School Reopening there is confusion on decision to start school from 1 December