पुण्याच्या डॉ.विद्या अवसरे यांना मानाचा ‘इन्सा टिचर अवार्ड 2021’ जाहीर
भारतीय राष्ट्रीय विज्ञान अकादमीतर्फे स.प. महाविद्यालयाच्या रसायनशास्त्र विभाग प्रमुख डॉ. विद्या अवसरे (Vidya Avasare) यांना 'इन्सा टिचर अवार्ड 2021' जाहीर झाला आहे.
पुणे: भारतीय राष्ट्रीय विज्ञान अकादमीतर्फे स.प. महाविद्यालयाच्या रसायनशास्त्र विभाग प्रमुख डॉ. विद्या अवसरे (Vidya Avasare) यांना ‘इन्सा टिचर अवार्ड 2021’ जाहीर झाला आहे. पन्नास हजार रुपये रोख आणि शिक्षण विषयक 20 हजार रुपयांची पुस्तके खरेदी करण्यासाठी निधी, असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. डॉ. विद्या अवसरे यांनी विज्ञान व तंत्रज्ञान क्षेत्रात केलेल्या कामाची दखल घेऊन त्यांची या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे.
सासवड ते मुंबई शिक्षणाचा प्रवास
विज्ञान विषयातील अध्यापनात त्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला. या पुढेही त्यांनी अशाच पद्धतीने काम करावे,अशी अपेक्षा इंडियन नॅशनल सायन्स अकॅडमीच्या अध्यक्ष चंद्रिमा शहा यांनी व्यक्त केले आहे. विद्या अवसरे यांनी सासवड येथून शालेय शिक्षण पूर्ण केल्यानंतर सावित्रीबाई फूले पुणे विद्यापीठाच्या रसायनशास्त्र विभागातून एमएस्सी पदवी प्राप्त केली. त्यानंतर नोकरी करत मुंबईच्या आयआयटीमधून पीएचडी पदवी प्राप्त केली.
25 वर्ष शिक्षण क्षेत्रात कार्यरत
विद्या अवसरे या गेल्या पंचवीस वषार्पासून मी शिक्षण क्षेत्रात कार्यरत आहेत. शिक्षण व विज्ञान क्षेत्रातील संशोधनात दिलेल्या योगदानामुळे तसेच शिक्षक व विद्यार्थ्यांसाठी राबविलेल्या नाविन्यपूर्ण उपक्रमांची दखल घेऊन या पुरस्कारासाठी अवसरे यांची निवड करण्यात आली. सध्या त्या पुणे विद्यापीठाच्या अभ्यास मंडळाची सदस्य आहेत
भौतिकशास्त्रातील नोबेल पुरस्कारांची घोषणा
रॉयल स्वीडिश अकॅडमी ऑफ सायन्सेसने (Royal Swedish Academy of Sciences) 2021 वर्षाचे भौतिकशास्त्रासाठीचे (Physics) नोबेल पारितोषिक जाहीर केले आहे. रॉयल स्वीडिश अकॅडमी ऑफ सायन्सेसने 2021 चे भौतिकशास्त्रातील नोबेल पारितोषिक स्युकुरो मनाबे (Syukuro Manabe), क्लाऊस हॅसलमन (Klaus Hassselmann) आणि जियोर्जियो पारिसी (Giorgio Parisi) यांना जाहीर झााला आहे. या तिघांना हा पुरस्कार त्यांच्या जटिल भौतिकशास्त्र प्रणालींच्या संशोधन कार्यासाठी देण्यात आला आहे.
इतर बातम्या:
Nobel Prize 2020 Photos: कुणाला, कोणता नोबेल पुरस्कार मिळाला, पुरस्कार्थींची संपूर्ण यादी
Pune SP College Professor Vidya Avasare wins INSA award for 2021