UGC NET Exam Date : केंद्रीय शिक्षणमंत्र्यांकडून नेट परीक्षेच्या तारखांची घोषणा, अर्ज कुठे करणार? वाचा सविस्तर

केंद्रीय शिक्षणमंत्री रमेश पोखरियाल निशंक (Education Minister Ramesh Pokhariyal Nishank) राष्ट्रीय पात्रता परीक्षा ( UGC NET ) म्हणजे नेट परीक्षेच्या तारखांची घोषणा केली आहे.

UGC NET Exam Date : केंद्रीय शिक्षणमंत्र्यांकडून नेट परीक्षेच्या तारखांची घोषणा, अर्ज कुठे करणार? वाचा सविस्तर
रमेश पोखरियाल
Follow us
| Updated on: Feb 02, 2021 | 2:00 PM

नवी दिल्ली: केंद्रीय शिक्षणमंत्री रमेश पोखरियाल निशंक (Education Minister Ramesh Pokhariyal Nishank) राष्ट्रीय पात्रता परीक्षा (National Eligibility Test) म्हणजे नेट परीक्षेच्या तारखांची घोषणा केली आहे. राष्ट्रीय पात्रता परीक्षेचे आयोजन नॅशनल टेस्टिंग एजन्सी (NTA) तर्फे केले जाते. रमेश पोखरियाल यांनी त्यांच्या ट्विटर अकाऊंटवरुन परीक्षेच्या आयोजनाबाबत माहिती दिली. ज्युनिअर रिसर्च फेलोशिप आणि सहाय्यक प्राध्यापक पदासाठी नेट परीक्षेचे आयोजन केले जाते. (Ramesh Pokhariyal Nishank announced UGC NET exam dates)

विद्यापीठ अनुदान आयोगाच्या (University Grants Commission) वतीनं नॅशनल टेस्टिंग एजन्सी नेट परीक्षेचे आयोजन करते. यंदाची नेट परीक्षा 2 मेपासून ऑनलाईन पद्धतीनं घेतली जाणार आहे. नेट परीक्षा उत्तीर्ण झालेले विद्यार्थी प्राध्यापक म्हणून नोकरी करण्यास पात्र ठरतात.  विद्यार्थ्यांना यासाठी पदव्युत्तर परीक्षा विहीत गुणांसह उत्तीर्ण असणं आवश्यक आहे.

2 मे पासून ऑनलाईन परीक्षा

रमेश पोखरियाल निशंक यांनी दिलेल्या माहितीनुसार यूजीसी-नेट परीक्षा 2, 3, 4, 5, 6, 7, 10, 11, 12, 14 आणि 17 मे रोजी आयोजित केली जाणार आहे. (UGC-NET Exam Date) जाहीर करताना रमेश पोखरियाल निशंक यांनी विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी शुभेच्छा दिल्या आहेत. राष्ट्रीय पात्रता परीक्षा यापूर्वी विद्यापीठ अनुदान आयोगाकडून घेतली जात होती. त्यानंतर परीक्षेच्या आयोजनाची जबाबदारी सीबीएसईला देण्यात आली होती. नॅशनल टेस्टिंग एजन्सी स्थापन झाल्यानंतर नेट परीक्षा ऑनलाईन पद्धतीनं घेतली जाऊ लागली.

यूजीसी नेट परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यंना www.nta.ac.in किंवा https://ugcnet.nta.nic.in या वेबसाईटला भेट द्यावी लागेल. 2 फेब्रुवारी ते 2 मार्च 2021 पर्यंत परीक्षेचे अर्ज भरता येणार आहेत. तर, 3 मार्च रोजी परीक्षा फी भरता येईल. विद्यार्थ्यानी अधिक माहितीसाठी वरील वेबसाईटला भेट द्यावी.

सीबीएसई परीक्षेच्या तारखांची घोषणा

केंद्रीय शिक्षणमंत्री रमेश पोखरियाल निशंक केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या (CBSE Date Sheet) 10 वी आणि 12 वीच्या परीक्षेचं वेळापत्रक जाहीर करणार आहेत. शिक्षणमंत्र्यांनी वेळापत्रक जाहीर केल्यानंतर सीबीएसईच्या दहावी बारावीच्या परीक्षेचं वेळापत्रक विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध होणार आहे. त्यामुळे अखेर विद्यार्थ्यांना विषयनिहाय परीक्षेची तारीख समजणार आहे. 4 मे ते 10 जून या काळात ही परीक्षा ऑफलाईन पद्धतीने होणार आहे. विद्यार्थ्यांना हे वेळापत्रक cbse.nic.in आणि cbse.gov.in या मंडळाच्या अधिकृत वेबसाईटवर उपलब्ध होईल

संबंधित बातम्या:

CBSE Exam Date Sheet 2021: रमेश पोखरियाल सीबीएसई 10 वी, 12 वी परीक्षेचं वेळापत्रक जाहीर करणार, टाईम टेबल कुठे पाहणार?

CBSE Class 10-12 TimeTable 2021 : सीबीएसई बोर्डाच्या दहावी-बारावी परीक्षांचे वेळापत्रक कसं पाहाल?

(Ramesh Pokhariyal Nishank announced UGC NET exam dates)

18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.