केंद्रीय शिक्षणसंस्थांमधील एससी, एसटीची 40 टक्के पद रिक्त, केंद्रीय शिक्षणमंत्री रमेश पोखरियाल यांची माहिती

रमेश पोखरियाल यांनी केंद्रीय उच्च शिक्षण संस्थांमध्ये ओबीसी प्रवर्गासाठी जागा रिक्त असल्याची माहिती दिली. Ramesh Pokhariyal higher education institutions

केंद्रीय शिक्षणसंस्थांमधील एससी, एसटीची 40 टक्के पद रिक्त, केंद्रीय शिक्षणमंत्री रमेश पोखरियाल यांची माहिती
रमेश पोखरियाल निशंक
Follow us
| Updated on: Mar 17, 2021 | 11:57 AM

नवी दिल्ली: केंद्रीय शिक्षणमंत्री रमेश पोखरियाल निशंक(Ramesh Pokhariyal Nishank)यांनी लोकसभेत केंद्रीय उच्च शिक्षण संस्थांमधील आरक्षित पदांविषयी महत्वाची माहिती दिली. रमेश पोखरियाल यांनी केंद्रीय उच्च शिक्षण संस्थांमध्ये ओबीसी प्रवर्गासाठी जागा रिक्त असल्याची माहिती दिली. त्यासोबतच त्यांनी एससी आणि एसटी प्रवर्गासाठीच्या 40 टक्के जागा रिक्त असल्याची माहिती दिली. धक्कादायक बाब म्हणजे आयआयएम सारख्या संस्थेमध्ये एकूण आरक्षणाच्या 60 टक्के पद रिक्त आहेत. तर एसटी प्रवर्गाच्या 80 टक्के जागा रिक्त आहेत. (Ramesh Pokhariyal said many post vacant on reserved teachers in central higher education institutions)

काँग्रेस खासदाराच्या प्रश्नाला उत्तर

काँग्रेस खासदार एन. उत्तम कुमार रेड्डी यांनी लोकसभेत आरक्षित पदांच्याबाबत प्रश्न विचारला होता. त्या प्रश्नाला रमेश पोखरियाल यांनी उत्तर देताना ही माहिती दिली. गेल्या काही दिवसांपूर्वी नवी दिल्लीमधील संबद्ध स्वामी श्रद्धानंद कॉलेजच्या विविध विभागांमध्ये कंत्राटी सहायक प्राध्यापकांच्या मुलाखती घेतल्या गेल्या त्यावेळी एससी, एसटी आणि ओबीसी प्रवर्गासाठी नॉट फाऊंड सुटेबल असा शेरा मारण्यात आला होत्या त्यानंतर मोठा वाद निर्माण झाला होता. शिक्षकांनी त्या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी केली होती.

डीटीएची  मागासवर्ग आयोगाकडं तक्रार

दिल्ली टीचर्स असोसिएशन (डीटीए) ने राष्ट्रीय मागसवर्ग आयोगामध्ये एक याचिका दाखल केली आहे. त्या याचिकेत स्वामी श्रद्धानंद कॉलेजमधील विविध विभागातील मुलाखत प्रक्रिया आणि एससी, एसटी आणि ओबीसी उमदेवारांना डावलले गेल्याचा मुद्दा मांडला होता. डीटीएच्या माहितीनुसार त्या आरक्षित जागांसाठी योग्य आणि पात्र उमेदवार उपलब्ध होते. मात्र, जाणीवपूर्वक त्यांना डावलण्यात आलं आहे. नॉट फाऊंड सुटेबल असा शेरा 2 ओबीसी, 2 एससी आणि 1 एसटी प्रवर्गातील पदांवर देण्यात आला होता. तर, कॉम्प्युटर सायन्समधील ओबीसी पदर रद्द करण्यात आले तर जीवशास्त्र विभागात ओबीसीसाठी राखीव असलेल्या पदाची मुलाखत रद्द करण्यात आली होती.

दरम्यान, रमेश पोखरियाल निशंक यांनी लोकसभेत सादर करण्यात आलेल्या माहितीनंतर आरक्षण असूनही कसं डावललं जातं याविषयी नव्यानं चर्चा होण्याची शक्यता आहे.

संबंधित बातम्या:

‘केंद्र सरकार अडचणीत येतं, तेव्हाच मोदी शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे टाकतात

चर्चेच्या फेऱ्या बंद करा, आता निर्णय घ्या, राजू शेट्टींनी केंद्राला सुनावले

(Ramesh Pokhariyal said many post vacant on reserved teachers in central higher education institutions)

राजीनाम्याची मागणी सुरू असताना धनंजय मुंडे तडकाफडकी दादांच्या भेटीला
राजीनाम्याची मागणी सुरू असताना धनंजय मुंडे तडकाफडकी दादांच्या भेटीला.
बीड प्रकरणात चौकशी सुरू, तर मुंडेंचा राजीनामा कशाला? भुजबळांचं मत काय?
बीड प्रकरणात चौकशी सुरू, तर मुंडेंचा राजीनामा कशाला? भुजबळांचं मत काय?.
मुंबईतील ताज हॉटेलमध्ये एकाच नंबरच्या 2 कार; भानगड नेमकी काय?
मुंबईतील ताज हॉटेलमध्ये एकाच नंबरच्या 2 कार; भानगड नेमकी काय?.
बीड प्रकरणातील मोठी बातमी, SIT पथकातून तिघांची हकालपट्टी
बीड प्रकरणातील मोठी बातमी, SIT पथकातून तिघांची हकालपट्टी.
चीनमधला नव्या HMPV व्हायरसची भारतात एन्ट्री, पहिला रूग्ण कुठं आढळला?
चीनमधला नव्या HMPV व्हायरसची भारतात एन्ट्री, पहिला रूग्ण कुठं आढळला?.
खंडणी डीलमध्ये सहभाग? धसांनी उल्लेख केलेला 'तो' नितीन बिक्कड म्हणाला..
खंडणी डीलमध्ये सहभाग? धसांनी उल्लेख केलेला 'तो' नितीन बिक्कड म्हणाला...
'शक्यता नाकारता येत नाही...', बीड प्रकरणावरून पवारांचं CM यांना पत्र
'शक्यता नाकारता येत नाही...', बीड प्रकरणावरून पवारांचं CM यांना पत्र.
'भक्तांना भिकारी म्हणतात मग तुम्हाला.', अंधारेंनी सुजय विखेंना सुनावलं
'भक्तांना भिकारी म्हणतात मग तुम्हाला.', अंधारेंनी सुजय विखेंना सुनावलं.
संतोष हत्येतील आरोपी फरार झाले कसे? सरपंचाची हत्या करून कुठं मुक्कामी?
संतोष हत्येतील आरोपी फरार झाले कसे? सरपंचाची हत्या करून कुठं मुक्कामी?.
लाडक्या बहिणींनो खुशखबर! 'या' महिन्यानंतर 2100 रुपये मिळणार
लाडक्या बहिणींनो खुशखबर! 'या' महिन्यानंतर 2100 रुपये मिळणार.