IIT Delhi Admission 2021 : आयआयटी दिल्लीमध्ये पीजी आणि पीएचडी प्रवेशासाठी नोंदणी प्रक्रिया सुरू

या अभ्यासक्रमांमध्ये नावनोंदणी करण्याची अंतिम तारीख 24 एप्रिल 2021 आहे. आयआयटी दिल्लीने जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार प्रवेश परीक्षा आणि मुलाखत 10 मे ते 23 जून दरम्यान घेण्यात येणार आहे. (Registration process for PG and PhD admissions at IIT Delhi begins)

IIT Delhi Admission 2021 : आयआयटी दिल्लीमध्ये पीजी आणि पीएचडी प्रवेशासाठी नोंदणी प्रक्रिया सुरू
आयआयटी दिल्लीमध्ये पीजी आणि पीएचडी प्रवेशासाठी नोंदणी प्रक्रिया सुरू
Follow us
| Updated on: Mar 24, 2021 | 3:43 PM

नवी दिल्ली : आयआयटी दिल्ली (Indian Institute of Technology Delhi) येथे पीजी आणि पीएचडी अभ्यासक्रमामध्ये प्रवेश घेऊ इच्छिणार्‍या उमेदवारांसाठी महत्वाची बातमी आहे. पीजी आणि पीएचडी अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी संस्थेने अर्ज प्रक्रिया सुरू केली आहे. या अभ्यासक्रमासाठी इच्छुक उमेदवार अधिकृत वेबसाईट home.iitd.ac.in वर जाऊन नोंदणी करू शकतात. उमेदवारांनी हे लक्षात ठेवा की, या अभ्यासक्रमांमध्ये नावनोंदणी करण्याची अंतिम तारीख 24 एप्रिल 2021 आहे. आयआयटी दिल्लीने जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार प्रवेश परीक्षा आणि मुलाखत 10 मे ते 23 जून दरम्यान घेण्यात येणार आहे. (Registration process for PG and PhD admissions at IIT Delhi begins)

जागेच्या उपलब्धतेनुसार प्रवेश देण्यात येईल

आयआयटी संस्थेने ज्या अभ्यासक्रमासाठी प्रवेश प्रक्रिया सुरू केली आहे, त्यामध्ये अप्लायड मेकेनिक्स, केमिकल इंजिनिअरिंग, केमिस्ट्री, सिव्हिल इंजिनिअरिंग, कॉम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग, इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग, मटेरियल सायन्स अँड इंजिनिअरिंग, मेकॅनिकल इंजिनिअरिंग आणि टेक्स्टाईल आणि फायबर अभियांत्रिकी यासह इतर अभ्यासक्रमासाठी प्रवेश अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. माध्यमांच्या अहवालानुसार उमेदवार पीएचडी, एमटेक आणि एमएसच्या पूर्णवेळ आणि अर्धवेळ अभ्यासक्रमासाठी सीटच्या उपलब्धतेनुसार प्रवेश देण्यात येईल.

प्रवेश घेण्यासाठी शैक्षणिक पात्रता

या व्यतिरिक्त, एमटेक, एमई, एमडी प्रोग्राममध्ये प्रवेशासाठी उमेदवारांकडे 60% गुण असले पाहिजेत. याशिवाय एमएससी, एमबीए, एमए, एमबीबीएस यासह इतर अभ्यासक्रमांमध्ये प्रवेश घेण्यासाठी उमेदवाराचे गेट, युजीसी नेट, आयसीएआर आणि आयसीएमआर फेलोशिप असणे आवश्यक आहे. याशिवाय बीई, बीटेक प्रोग्राममध्ये प्रवेश घेण्यासाठी उमेदवारांनी 70 टक्के गुण मिळवले आहेत.

नोंदणी कशी करावी?

आयआयटी दिल्ली येथे पदव्युत्तर आणि पीएचडी कोर्ससाठी प्रवेश घेऊ इच्छिणारे उमेदवार खाली दिलेल्या निर्देशांचे पालन करून ऑनलाईन नोंदणी करू शकतात.

– सर्वप्रथम home.iitd.ac.in या अधिकृत वेबसाईटवर जा. – मुख्यपृष्ठावरील प्रवेशाच्या विभागातील PG Admissions 2021-2022 प्रोग्रामवर क्लिक करा. – आता PG Admission including PhD लिंकवर क्लिक करा. – यानंतर IIT DELHI PG ADMISSIONS PORTAL उघडेल. – आता New User Registration Here वर क्लिक करा. – येथे आवश्यक तपशील भरून नोंदणी करू शकता. (Registration process for PG and PhD admissions at IIT Delhi begins)

इतर बातम्या

SBI सह संपूर्ण देशात ‘या’ मोठ्या बँकांकडून स्वस्त घर खरेदीची संधी; शेवटचे 7 दिवस शिल्लक

जगभर बंदी असलेल्या कीटकनाशकांचं काय होणार? केंद्रीय कृषी मंत्री नरेंद्र तोमर म्हणाले…

... अन् एकटी महिला भिडली, छेड काढणाऱ्याला चांगलंच चोपल, बघा व्हिडीओ
... अन् एकटी महिला भिडली, छेड काढणाऱ्याला चांगलंच चोपल, बघा व्हिडीओ.
मुंबईतील काँग्रेस कार्यालयात घुसून आंदोलन करणं 'भाजप युवा'च्या अंगाशी
मुंबईतील काँग्रेस कार्यालयात घुसून आंदोलन करणं 'भाजप युवा'च्या अंगाशी.
'ए अंबादास खाली बस...', शिंदेंनी विरोधकांना फटकारलं, सभागृहात काय झाल?
'ए अंबादास खाली बस...', शिंदेंनी विरोधकांना फटकारलं, सभागृहात काय झाल?.
'.. आता भाजपची वाट', सुषमा अंधारे यांचा नेमका कोणाला खोचक टोला?
'.. आता भाजपची वाट', सुषमा अंधारे यांचा नेमका कोणाला खोचक टोला?.
बीड सरपंच संतोष देशमुखांची हत्या, शवविच्छेदन अहवालातून काय आलं समोर?
बीड सरपंच संतोष देशमुखांची हत्या, शवविच्छेदन अहवालातून काय आलं समोर?.
अचानक संध्याकाळी 17 लाख मतं वाढली? EVMच्या आरोपांवर फडणवीसांचं उत्तर
अचानक संध्याकाळी 17 लाख मतं वाढली? EVMच्या आरोपांवर फडणवीसांचं उत्तर.
'लाडक्या बहिणीं'नो तुमच्यासाठी मोठी बातमी, डिसेंबरचा हफ्ता कधी मिळणार?
'लाडक्या बहिणीं'नो तुमच्यासाठी मोठी बातमी, डिसेंबरचा हफ्ता कधी मिळणार?.
अध्यक्ष महोदय बोट दुर्घटना तुमच्याच मतदारसंघातील, दादा असं का म्हणाले?
अध्यक्ष महोदय बोट दुर्घटना तुमच्याच मतदारसंघातील, दादा असं का म्हणाले?.
'बहुमत मिळाल्यानं गांगरून गेलेत', मनसे नेत्याची महायुतीवर सडकून टीका
'बहुमत मिळाल्यानं गांगरून गेलेत', मनसे नेत्याची महायुतीवर सडकून टीका.
...म्हणून भूजबळांना महायुतीच्या मंत्रिमंडळातून डावललं, कारणं आली समोर
...म्हणून भूजबळांना महायुतीच्या मंत्रिमंडळातून डावललं, कारणं आली समोर.