RTE अंतर्गत प्रवेश नोंदणी सुरु, 96 हजार विद्यार्थ्यांना पहिली ते आठवीपर्यंत मोफत शिक्षण
शिक्षण अधिकार म्हणजेच RTE कायद्यांतर्गत पहिली ते आठवीच्या प्रवेश नोंदणीला सुरुवात झाली आहे. RTE admission registration
मुंबई: शिक्षण अधिकार म्हणजेच RTE कायद्यांतर्गत पहिली ते आठवीच्या प्रवेश नोंदणीला सुरुवात झाली आहे. आरटीई कायद्यांतर्गत पहिली ते आठवी पर्यंत मोफत शिक्षण दिलं जाते. आरटीईच्या पोर्टलवर 3 मार्चपासून नोंदणी सुरु झाली असून 21 मार्च पर्यंत विद्यार्थ्यांची नोंदणी केली जाणार आहे. RTE अंतर्गत खासगी शाळांमध्ये 25 टक्के जागांवर प्रवेश दिला जातो. (Right to Education act RTE admission registration started for 25 per cent seats in private unaided school)
आरटीईअंतर्गत प्रवेश कुणाला?
शिक्षणाचा अधिकार कायद्यांतर्गत खासगी इंग्रजी आणि मराठी माध्यमांच्या शाळेत 25 टक्के जागा आरटीईसाठी राखीव ठेवल्या जातात. अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना उत्पन्नाची कोणतिही अट ठेवण्यात आलेली नाही. खुल्या प्रवर्गातून अर्ज करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या पालकांचं उत्पन्न एक लाखांपेक्षा कमी असणं आवश्यक आहे.
आरटीईअंतर्गत किती जागांवर प्रवेश
मुंबईमधध्ये आरटीई साठी 352 शाळांमध्ये 6 हजार 463 जागा राखीव ठेवण्यात आल्या आहेत. यामधील 292 शाळा या सीबीएसई बोर्डाशी संलग्नित आहेत तर 62 शाळा राज्य सरकारच्या शिक्षण बोर्डाशी संलग्नित आहेत. संपूर्ण महाराष्ट्रात एकूण 96801 जागांवर या कायद्यांतर्गत प्रवेश दिले जाणार आहेत. राज्याच्या 36 जिल्ह्यातील 9 हजार 431 शाळांमध्ये 25 टक्के जागा आरटीई प्रवेशासाठी राखीव ठेवण्यात आल्या आहेत.
प्रवेशासाठी आवश्यक कागदपत्रे
आरटीई अंतर्गत प्रवेश मिळवण्यासाठी रहिवाशी दाखला, जात प्रमाणपत्र, दिव्यांग प्रमाणपत्र, उत्पन्नाचा दाखला( खुल्या प्रवर्गासाठी), जन्माचा दाखला, अनाथालयात राहणाऱ्या विद्यार्थ्यांना देखील या योजनेअंतर्गत प्रवेश दिला जातो.
लॉटरी पद्धतीनं प्रवेश
नोंदणी प्रक्रियेद्वारे अर्ज प्राप्त झाल्यानंतर लॉटरी पद्धतीनं विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जातो. या प्रक्रियेद्वारे प्रवेश मिळाल्यास मराठी किंवा इंग्रजी माध्यमांमध्ये आठवीपर्यंत मोफत शिक्षण मिळते. आरटीईअंतर्गत पहिलीच्या वर्गाला प्रवेश दिला जातो.
RTE प्रवेश नोंदणीसाठी अर्ज कुठे करणार?
पालकांना त्यांच्या पाल्याची नोंदणी RTE प्रवेशासाठी करायची आहे. ते https://student.maharashtra.gov.in/adm_portal/Users/rteindex वेबसाईटला भेट देऊन अर्ज करु शकतात.
India vs England 4th Test, Day 1 Live Updates | इंग्लंडला मोठा धक्का, कॅप्टन जो रुट आऊटhttps://t.co/w6raaa12tu
| #IndiavsEngland2021 | #INDvsENG | #TeamIndia | #AhmedabadTest | #WorldTestChampionship | #TeamIndia | #ViratKohli |
— TV9 Marathi (@TV9Marathi) March 4, 2021
संबंधित बातम्या:
JEE Main 2021 फेब्रुवारी सत्रातील परीक्षेची उत्तरतालिका जाहीर, ‘या’ दिवशी निकाल जाहीर होणार
CBSE Board Exam 2021: सीबीएसई बोर्डाची प्रात्यक्षिक परीक्षेला सुरुवात,वाचा सविस्तर
Right to Education act RTE admission registration started for 25 per cent seats in private unaided school