सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा मोठा निर्णय, प्रवेश परीक्षांसाठी अर्ज दाखल करण्यास मुदतवाढ

विद्यार्थ्यांच्या मागणीनंतर सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठानं प्रवेश परीक्षांसाठी अर्ज करण्याची मुदत वाढवून देण्याचा निर्णय घेतला आहे.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा मोठा निर्णय, प्रवेश परीक्षांसाठी अर्ज दाखल करण्यास मुदतवाढ
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ
Follow us
| Updated on: Jul 03, 2021 | 3:59 PM

पुणे: सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठानं पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या प्रवेश परीक्षांसाठी अर्ज करण्याची मुदत वाढवली आहे. विद्यापीठानं वेबसाईटवर परिपत्रक प्रसिद्ध करुन याविषया माहिती दिली आहे. प्रवेश परीक्षांसाठी अर्ज करण्याची जुनी मुदत 4 जुलैपर्यंत निश्चित करण्यात आली होती. नव्या निर्णयानुसार प्रवेश परीक्षेसाठी अर्ज करण्याची मुदत 10 जुलै करण्यात आली आहे. (Savitribai Phule Pune University decided to extend dates for Entrance Exam form submission )

मुदत वाढवण्याची विद्यार्थी संघटनांची मागणी

जुन्या परिपत्रकानुसार प्रवेश परीक्षांचा अर्ज भरण्याची शेवटची मुदत 4 जुलै निश्चित करण्यात आली होती. मात्र, अनेक विद्यार्थ्यांनी प्रवेश परीक्षेचे अर्ज केले नसल्यानं मुदत वाढवण्याची मागणी विद्यार्थी संघटनांकडून केली जात होती. विद्यार्थी संघटनेची मागणी लक्षात घेता पुणे विद्यापीठानं मुदत वाढवून देण्याचा निर्णय घेतला आहे.

10 जुलैपर्यंत नियमित शुल्क तर 15 जुलैपर्यंत विलंब शुल्क

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठानं जारी केलेल्या पत्रकानुसार प्रवेश परीक्षांसाठी मुदतवाढ देण्यात आली आहे. नियमित शुल्कानं प्रवेश परीक्षेचा अर्ज 10 जुलैपर्यंत दाखल करता येणार आहे. तर, विलंब शुल्क भरून अर्ज करण्याची अंतिम तारीख 15 जुलै निश्चित करण्यात आली आहे.

अखेरची संधी

विद्यापीठ प्रशासनानं प्रवेश परीक्षांचा अर्ज भरण्यास मुदवाढ देताना ही अखेरची संधी असल्याचं स्पष्ट केल आहे. वाढवून दिलेल्या विहीत मुदतीत विद्यार्थ्यांनी प्रवेश परीक्षांचे अर्ज भरावेत, असं आवाहन करण्यात आलं आहे. तर, यापुढे अर्ज सादर करण्यास मुदत वाढवून दिली जाणार नाही, असंही स्पष्ट करण्यात आलं आहे.

राज्य भरातील विद्यार्थ्यांचा प्रवेश परीक्षेला प्रतिसाद

पुणे विद्यापीठातील अभ्यासक्रमाला प्रवेश मिळावा यासाठी महाराष्ट्रातील ग्रामीण भागासह देश, विदेशातील विद्यार्थी प्रवेश परीक्षा देतात. विद्यापीठात पदव्युत्तर पदवी, पदवी, इंटिग्रेटेड कोर्स असे सुमारे 90 अभ्यासक्रमांचे शैक्षणिक विभाग आहेत. या अभ्यासक्रमांसाठी 100 गुणांची प्रवेश परीक्षा घेतली जाते. पुणे विद्यापीठात पदव्युत्तर पदविका आणि प्रमाणपत्र अभ्यासक्रमाचे 77 विभाग आहेत, त्यांच्यासाठीही प्रवेश परीक्षा घेतली जाणार आहे. पात्र विद्यार्थ्यांना अर्ज करताना मागील वर्षाची उत्तीर्णतेची गुणपत्रिका, जातीचा दाखला, नॉन क्रिमिलेअर प्रमाणपत्र याचे फोटोकॉपी अपलोड करावे लागेल. दिव्यांग विद्यार्थ्यांना वैद्यकीय प्रमाणपत्र आवश्‍यक आहे.

इतर बातम्या:

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात फिरायला जाताय? मग महिन्याला 1 हजार रुपये मोजावे लागणार!

पुणे विद्यापाठीला कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा फटका; सहा कर्मचाऱ्यांचा मृत्यू

(Savitribai Phule Pune University decided to extend dates for Entrance Exam form submission )

महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.