Ranjitsinh Disale : मानसिक त्रास दिल्याचे,पैसे मागितल्याचे पुरावे द्या, सोलापूर जिल्हा परिषदेचे रणजितसिंह डिसले यांना पत्र

ग्लोबल टीचर पुरस्कार विजेते शिक्षक रणजितसिंह डिसले (Ranjitsinh Disale) यांना सोलापूर जिल्हा परिषदेनं (Solapur ZP) एक पत्र पाठवण्यात आलं आहे.

Ranjitsinh Disale : मानसिक त्रास दिल्याचे,पैसे मागितल्याचे पुरावे द्या, सोलापूर जिल्हा परिषदेचे रणजितसिंह डिसले यांना पत्र
रणजितसिंह डिसले
Follow us
| Updated on: Jan 25, 2022 | 12:46 PM

सोलापूर : ग्लोबल टीचर पुरस्कार विजेते शिक्षक रणजितसिंह डिसले (Ranjitsinh Disale) यांना सोलापूर जिल्हा परिषदेनं (Solapur ZP) एक पत्र पाठवण्यात आलं आहे. त्या पत्रातून जिल्हा परिषदेकडून रणजितसिंह डिसले यांनी माध्यमांशी बोलताना जे आरोप केले होते. त्या आरोपांविषयी पुरावे असतील तर ते जिल्हा परिषदेकडे द्यावे असं म्हटलंय. सोलापूर जिल्हा परिषदेकडून रणजितसिंह डिसले यांना नोटीस पाठवण्यात आल्याच्या चर्चा सुरु झाल्या होत्या. मात्र, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी (Dilip Swami) यांनी रणजितसिंह डिसले यांना नोटीस पाठवली नसून सन्मानपूर्वक पत्र पाठवण्यात आल्याचं म्हटलंय. स्वामी यांनी ही माहिती टीव्ही 9 मराठीच्या प्रतिनिधीशी बोलताना दिली आहे. रणजितसिंह डिसले यांच्या रजेचं प्रकरण प्रसारमाध्यमांमध्ये चांगलंच गाजलेलं होतं. रणजितसिंह डिसले यांना जिल्हा परिषदेनं दिलेलं पत्र अद्याप मिळालं नसल्याची माहिती आहे. डिसले आता पत्राला काय उत्तर देणार हे पाहावं लागणार आहे.

पाहा व्हिडीओ

पैसे कुणी मागितले? त्रास कुणी दिला पुरावे द्या, कारवाई करु

रणजितसिंह डिसले यांच्या रजेचा वाद निर्माण झाल्यानंतर तो प्रसारमाध्यमांपर्यंत पोहोचला होता. त्यावेळी डिसले यांनी जे प्रसारमाध्यमांवर आरोप केले होते त्याची चौकशी करण्यासाठी पुरावे असतील तर द्यावेत,अशा आशयाचंच पत्र जिल्हा परिषदेच्या गटशिक्षणाधिकाऱ्यांमार्फत पाठवण्यात आलं आहे. डिसले यांनी पुरावे यांनी दिल्यास दोषींवर कारवाई करु, असं जिल्हा परिषदेच्यावतीनं सांगण्यात आलं आहे.

ग्लोबल टीचर डिसले गुरूजींना नोटीस नाही, सन्मानपूर्वक पत्र

सोलापूर जिल्हा परिषदेच्यावतीनं रणजितसिंह डिसले यांना नोटीस पाठवण्यात आल्याच्या चर्चा सुरु झाल्या होत्या.त्यावर जिल्हा परिषदेचे सीईओ दिलीप स्वामी यांनी माहिती दिली आहे. डिसले यांना नोटीस नव्हेत तर सन्मानपूर्वक पत्र पाठवण्यात आलंय.गटशिक्षणाधिकाऱ्यांमार्फत आज पत्र डिसले गुरूजींना जाईल. डिसले गुरूजींनी जे प्रसारमाध्यमांवर आरोप केले होते त्याची चौकशी करण्यासाठी पुरावे असतील तर द्यावे. आम्ही दोषींवर कारवाई करू अशा आशयाचं पत्र आम्ही गुरूजींना दिलंय, अशी माहिती सोलापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांची टीव्ही 9 मराठीला दिली.

माझ्यापर्यंत पत्र पोहोचलं नाही डिसले गुरूजींची माहिती

रणजितसिंह डिसले यांनी जिल्हा परिषदेकडून पाठवण्यात आलेल्या पत्राविषयी माहिती दिली आहे. मला अद्याप पत्र पोहोचलेल नाही, असं ते म्हणाले आहेत. रणजितसिंह डिसले त्यांना पत्र मिळाल्यानंतर काय भूमिका घेणार हे येणाऱ्या काळाता पाहावं लागणार आहे.

इतर बातम्या:

Nashik Corona | नाशिक जिल्ह्यात किती कोरोना रुग्ण, आजचा अहवाल काय?

VIDEO: नगरविकास खात्यातील फाईली चेक करतानाचा किरीट सोमय्यांचा फोटो व्हायरल, सोमय्या म्हणाले, भीती कशाची वाटतेय?

Solapur ZP Sent letter to Ranjitsinh Disale for demanding proofs of allegations made on Media

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.