जेएनयू कॅंपसमध्ये विद्यार्थ्यांसाठी कठोर आचारसंहिता, हिंसा केल्यास प्रवेशच रद्द

सातत्याने वादाच्या केंद्रस्थानी राहीलेल्या जवाहरलाल नेहरू विश्व विद्यापीठात आता विद्यार्थ्यांसाठी कठोर आचारसंहिता जारी करण्यात आली आहे.

जेएनयू कॅंपसमध्ये विद्यार्थ्यांसाठी कठोर आचारसंहिता, हिंसा केल्यास प्रवेशच रद्द
JNUImage Credit source: socialmedia
Follow us
| Updated on: Mar 02, 2023 | 10:35 AM

नवी दिल्ली : जवाहरलाल नेहरू विश्व विद्यालय तेथील विद्यार्थ्यांचे धरणे आंदोलन आणि इतर कारणांसाठी सतत प्रसिध्दीच्या झोतात असते. येथे विद्यार्थ्यांच्या आंदोलनातून नेतृत्व घडत असते. डाव्या संघटना तसेच ऑल इंडीया स्टुडंट्स असोसिएशन सारख्या संघटना येथे सतत सरकार विरोधात आवाज उठवत असतात. परंतू आता जेएनयूमध्ये काेणी आंदोलन करू शकणार नाही. विद्यापीठ प्रशासनाने नवे नियम जारी केले आहेत. येत्या तीन फेब्रुवारीपासून हे नविन नियम लागू होणार आहेत.

तर विद्यार्थ्यांचा प्रवेशही रद्द होऊ शकतो

जेएनयूमध्ये नव्या नियमानूसार धरणे दिल्यास विद्यार्थ्यांवर २० हजार रूपयांपर्यं दंड होऊ शकतो. तसेच हिंसा केल्या विद्यार्थ्यांचा प्रवेश देखील रद्द केला जाऊ शकतो. तसेच तीस हजारापर्यंत दंड होऊ शकतो. जेएनयू विद्यार्थ्यांसाठी नविन दहा पानांची नियमावली जारी करण्यात आली आहे. त्यात विद्यापिठाने विरोध प्रदर्शन आणि ठगेगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांना विविध नियमानूसार सजा ठरविण्यात आली आहे. जर विद्यार्थांनी जर महाविद्यालयीन शिस्त पाळली नाही तर त्यांची चौकशी होऊन त्यांना चौकशीनंतर कारवाईला सामोरे जावे लागू शकते.

नव्या नियमांची या तारखेपासून अमलबजावणी 

नवीन नियमांची अंमलबजावणी येत्या तीन फेब्रुवारी पासून केली जाणार आहे. या नियमाच्या दस्ताएवजात म्हटले आहे या नियमांना कार्यकारी परिषदने मंजूरी दिल्याचे म्हटले आहे. ही परिषद विश्वविद्यालयाची सर्वौच्च शिखर संस्था आहे.

विद्यार्थी संघटनांची नाराजी

जवाहरलाल नेहरू विश्व विद्यापिठातील या नव्या नियमांना भारतीय विद्यार्थी परिषेदेचे सचिव विकास पाटील यांनी तुगलघी आदेश असे म्हणत टीका केली आहे. विद्यार्थी संघटनांनी या नियमांना प्रचंड विरोध करीत हे नियम अन्यायकारक असल्याचे म्हटले आहे. त्यामुळे नाराज झालेल्या संघटनांनी यास प्रचंड विरोध केला आहे.

सतत वादाच्या केंद्रस्थानी

जेएनयूमध्ये डाव्या विचारसरणीचा पगाडा असल्याने केंद्रात भाजपाचे सरकार आल्यापासून हे विद्यापीठ विविध राजकीय आंदोलनामुळे सतत चर्चेत आले आहे. या विद्यापीठातील डाव्या विचारसरणीच्या विद्यार्थ्यांवर नक्षलवादी चळवळीला पाठींबा दिल्याच्या आरोपापासून ते त्यांनी देशद्रोही ठरविण्यापर्यंत आरोप झाले आहेत.

म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज.
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, राज-उद्धव ठाकरेंमध्ये काय संवाद?
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, राज-उद्धव ठाकरेंमध्ये काय संवाद?.
खातेवाटपानंतर 'मीच होणार पालकमंत्री', ठाणे, पुण्याचं पालकत्व कोणाकडे?
खातेवाटपानंतर 'मीच होणार पालकमंत्री', ठाणे, पुण्याचं पालकत्व कोणाकडे?.
मराठी कुटुंबाला मारहाण, चिमुकलीसोबत अश्लील चाळे, विचारणा केली तर...
मराठी कुटुंबाला मारहाण, चिमुकलीसोबत अश्लील चाळे, विचारणा केली तर....