Board Exam 2021: विद्यार्थ्यांची बोर्ड परीक्षा रद्द करण्यासाठी ट्विटरवर मोहीम, #CancelBoardExam2021 हॅश्टॅगद्वारे मागणी
विद्यार्थ्यांकडून बोर्ड परीक्षा रद्द करावी किंवा ऑनलाईन पद्धतीनं आयोजित करण्याची मागणी होत आहे. Cancel Board Exams
नवी दिल्ली: देशात सध्या कोरोना विषाणूचे रुग्ण वेगानं वाढत आहेत. सध्या विद्यार्थ्यांकडून बोर्ड परीक्षा रद्द करावी किंवा ऑनलाईन पद्धतीनं आयोजित करण्याची मागणी होत आहे. कोरोना विषाणू संसर्गामुळे काही राज्यांमधील परीक्षा झालेल्या नाहीत. सीबीएसई बोर्ड, यूपी बोर्ड, हरियाणा बोर्ड आणि आयसीएसई बोर्ड यासह इतर बोर्डांच्या परीक्षा येणाऱ्या काही दिवसांमध्ये सुरु होणार आहेत. विद्यार्थी मात्र वाढत्या कोरोना रुग्णसंख्येमुळे चिंतीत आहेत. विद्यार्थ्यांनी ट्विटरवर #CancelBoardExam2021 हा ट्रेंड सुरु केला आहे. विद्यार्ध्यांच्या मागणीला प्रतिसाद मिळताना दिसत असून अभिनेता सोनू सूद, अरमान मलिक, काँग्रेस खासदार राहुल गांधी , प्रियांका गांधी यांनी विद्यार्थ्यांच्या बाजूनं आवाज उठवला आहे. (Students demanded CancelBoardExams 2021 is trending on twitter sonu sood arman malik support students)
विवेक भारती नावाचा विद्यार्थी ट्विट करुन ” जर सरकारला बोर्ड परीक्ष घ्यायची असेल तर विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचे उपाय राबवावे लागतील. सरकार जर हे करु शकत नसेल तर त्यांनी परीक्षा रद्द कराव्यात. पहिल्यांदा सुरक्षित जीवन महत्वाचं असल्याचं म्हटलं आहे.
Government should do something for us if they want to take board exams then there should be an proper management and safety for the aspirant…. agar govt yeh nhi kar sakti toh #cancelboardexam2021 safety is first life is more important #cancelboardexam2021 #cancelboardexam2021 pic.twitter.com/WrQsmUoCDu
— Vivek bharti (@realvivekbharti) April 12, 2021
सीबीएसई परीक्षा ऑनलाईन का घेत नाही?
राजीव नावाच्या एका ट्विटर हँडलवरुन सीबीएसई बोर्ड परीक्षा रद्द का करत नाही किंवा ऑनलाईन पद्धतीनं का घेत नाही, असा सवाल केला आहे. कोरोना विषाणू संसर्गाच्या काळात सरकारला विद्यार्थ्यांच्या आरोग्याची काळजी नाही, असा आरोप या ट्विटमधून करण्यात आला आहे.
I don’t know why cbse does not cancel board exam or take it online. The situation of covid 19 pandmic cases are increasing day by day.Government don’t realize the problem of students. #cancelboardexam2021 #justiceforstudents #justiceforStudentsHealth
— Rajiv (@Rajiv67890) April 12, 2021
सोनू सूदचा विद्यार्थ्यांच्या मागणीला पाठिंबा
आता बॉलिवूड अभिनेता सोनू सूदनं देखील विद्यार्थ्यांसाठी आवाज उठवला आहे. देशात 1 लाख 45 हजार कोरोना रुग्ण वाढत आहेत. सध्याच्या परिस्थिती विद्यार्थ्यांच्या मागं उभं राहिलं पाहिजे. अंतर्गत मूल्यमापनाद्वारे विद्यार्थ्यांना प्रमोट करावं, असं ट्विट सोनू सूदनं केलं आहे
I request everyone to support students who are forced to appear for offline board exams in these tough times. With the number of cases rising to 145k a day I feel there should be an internal assessment method to promote them rather than risking so many lives. #cancelboardexam2021 pic.twitter.com/Taq38B0811
— sonu sood (@SonuSood) April 11, 2021
प्रियांका गांधी यांचं ट्विट
It is downright irresponsible of boards like the CBSE to force students to sit for exams under the prevailing circumstances. Board exams should either be cancelled, rescheduled or arranged in a manner that does not require the physical presence of children at crowded exam centres
— Priyanka Gandhi Vadra (@priyankagandhi) April 9, 2021
प्रियांका गांधी यांनी ट्विट करुन सीबीएसई बोर्डावर निशाणा साधला. सीबीएसईसारख्या बोर्डांनी विद्यार्थ्यांना सध्याच्या परिस्थितीत परीक्षा द्यायला भाग पाडणं बेजबाबदारपणाचं आहे.सध्या बोर्डाच्या परीक्षा रद्द कराव्यात किंवा परीक्षा पुढे ढकलून नवं वेळापत्रक जारी करावं, अशी मागणी प्रियांका गंधी यांनी केली. याशिवाय विद्यार्थ्यांची गर्दी होणार नाही, अशा पद्धतीनं परीक्षांचं नियोजन करावं, अशी मागणी प्रियांका गांधी यांनी केली.
गायक अरमान मलिकचा विद्यार्थ्यांना पाठिंबा
गायक अरमान मलिक हा देखील विद्यार्थ्यांच्या समर्थनार्थ उतरला आहे. कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांच्या परीक्षा घेऊ नयेत. देशातील मानसिक, शारीरिक आरोग्याची काळजी घ्यावी. काही विद्यार्थी परीक्षेची तयारी करत आहेत, काही वेळ थांबवत आहेत, काही वेळानंतर पुन्हा अभ्यास करत आहेत. शिक्षण महत्वाचं आहे पण आरोग्याची बाजी लावून परीक्षा देणं महत्वाचं नाही, असं अरमान मलिक म्हणाला.
बोर्ड परीक्षा रद्द करा, 1 लाख विदयार्थ्यांची मागणी
सध्या वाढलेल्या कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर दहावी आणि बारावीच्या एक लाख विद्यार्थ्यांनी परीक्षा रद्द करा किंवा ऑनलाईन पद्धतीनं घ्या, असी मागणी केली आहे. मात्र, सीबीएसईनं विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी योग्य उपाययोजना करण्यात आल्याची माहिती दिली आहे. विद्यार्थ्यांकडून परीक्षा ऑनलाईन पद्धतीनं आयोजित कराव्यात यासाठी मागणी करण्यात येत आहे. सीबीएसईच्या लेखी परीक्षांना 4 मेपासून सुरुवात होणार आहे.
संबंधित बातम्या:
कोरोना वाढतोय सीबीएसईच्या परीक्षा स्थगित करा, ‘या’ राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांची मागणी
(Students demanded CancelBoardExams 2021 is trending on twitter sonu sood arman malik support students)