Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

शाळेने केला अजब कारभार, प्रमाणपत्र देताना केली विचित्र चूक, विद्यार्थ्याचे गेले वर्ष वाया

एका शाळेने विद्यार्थ्याच्या सर्टीफिकेट्सवर अशी तारीख लिहीली की त्या विद्यार्थ्याचे शैक्षणिक वर्षे वाया गेले आहे.

शाळेने केला अजब कारभार, प्रमाणपत्र देताना केली विचित्र चूक, विद्यार्थ्याचे गेले वर्ष वाया
schoolImage Credit source: socialmedia
Follow us
| Updated on: Jul 21, 2023 | 6:24 PM

नवी दिल्ली | 21 जुलै 2023 : सरकारी यंत्रणेमुळे अनेकदा नागरिकांना फटका बसत असतो. त्यामुळे सरकारी यंत्रणेतील कारकून तुम्हाला कधी फायलीतून हद्दपार करतील याचा काही नेम नाही. त्यामुळे सरकारी कार्यालये आणि संस्थामधून आपली महत्वाची कागदपत्रे मिळविताना आपल्या खूपच टेन्शन येत असते. आपले नाव आणि जन्मतारीख पाहून ही प्रमाणपत्रे पाहावी लागतात.कारण यात जर चूक झाली तर तुमचे काम बिघडले म्हणून समजा. अशा सरकारी दिरंगाईच्या फटक्याने एका विद्यार्थ्यांचे संपूर्ण वर्ष वाया गेले आहे.

एका विद्यार्थ्यांचे वर्षे वाया गेले आहे. या शाळेने लिप वर्षांच्या पुढची तारीख (  लीप वर्ष 29 फेब्रुवारी )  30 फेब्रुवारी  एका मुलाच्या ट्रान्सफर सर्टीफिकेटवर लिहिल्याने त्याचे वर्षे वाया गेले आहे. या मुलाला शाळेतून दुसऱ्या शाळेत प्रवेश घ्यायचा होता. परंतू शाळेतील कारकूनाने ट्रान्सफर सर्टीफिकेट्सवर 30 फेब्रुवारी लिहील्याने गडबड झाली. या विद्यार्थ्याने या शाळेतून आठवी इयत्ता उत्तीर्ण केली होती. त्याला दुसऱ्या शाळेत नववीसाठी सप्रवेश घ्यायचा होता.

अमनकुमारचे वडील मुलाला शाळेत प्रवेश करण्यासाठी गेले असता स्थानांतर प्रमाणपत्रावर अमनची जन्मतारीख चुकीची असल्याने त्यांना प्रिन्सिपलनी तारीखच चुकीची असल्याचे सांगितले. तेव्हा पासून ते आधीची चकाई येथील शाळेच्या चकरा मारीत आहेत. परंतू काही फायदा झालेला नाही.

शाळेने केली मोठी  विचित्र चूक

बिहारी येथील जुमई जिल्ह्यातील एका सरकारी शाळेच्या प्रतापामुळे अमन कुमार आणि त्याचे कुटुंबियांना शाळेने ट्रान्सफर सर्टीफिकेट्स देताना त्याची जन्म तारीख 30 फेब्रुवारी 2009 अशी लिहीली, जुमई जिल्ह्यातील चकाई ब्लॉक येथील उत्क्रमित माध्यमिक विद्यालयात शिकणाऱ्या अमन कुमार याला दुसऱ्या शाळेत जाण्यासाठी दिलेल्या टीसीवर अशी चुकीची तारीख लिहील्याने त्याला दुसऱ्या शाळेत नववीच्या इयत्तेत प्रवेळ मिळाला नाही. 14 जुलै ही शाळा प्रवेशाची शेवटची तारीख होती असे त्याचे वडील राजेश यादव यांनी म्हटले आहे.

कारवाई करण्याचे आदेश

या प्रकरणात जिल्हाधिकारी कपिल देव तिवारी यांनी लक्ष घालून कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. टीसी प्रकरणात चकाई स्कूलच्या प्रिन्सिपलकडून खुलासा मागविण्यात आला आहे, त्यांना कारणे दाखवा नोटीस बजावली असून त्यांच्या उत्तरानंतर योग्य कारवाई करण्यात येईल असेही तिवारी यांनी म्हटल्याचे टाईम्सच्या वृत्तात म्हटले आहे.

30 फेब्रुवारी तारीख कधीच नसते

ग्रेगोरियन कॅलेंडरच्या दुसऱ्या महिना फेब्रुवारीत सामान्यत 28 दिवस असतात. लिप इयरमध्ये फेब्रुवारी 29 महिन्याचा असतो.गेले लिप वर्ष साल 2020 मध्ये होते. पुढील लिप वर्ष 2024 रोजी असेल, लिप वर्षाशिवाय 29 फेब्रुवारी नसतो. 30 फेब्रुवारी तर केव्हाच नसतो.

वाल्मिक कराडच्या एन्काउंटरच्या सुपारीबाबत खरं असू शकतं - करुणा शर्मा
वाल्मिक कराडच्या एन्काउंटरच्या सुपारीबाबत खरं असू शकतं - करुणा शर्मा.
धीरेंद्र शास्त्री महाराजांनी केलं छत्रपती संभाजीराजेंचं कौतुक
धीरेंद्र शास्त्री महाराजांनी केलं छत्रपती संभाजीराजेंचं कौतुक.
तिसऱ्या दिवशी माझ्यावर खुनाचा गुन्हा..गोरेंनी सांगितली 'ती' मधील घटना
तिसऱ्या दिवशी माझ्यावर खुनाचा गुन्हा..गोरेंनी सांगितली 'ती' मधील घटना.
राज्यातील 'या' भागांना हवामान खात्याचा अलर्ट, पुढील 3 दिवस...
राज्यातील 'या' भागांना हवामान खात्याचा अलर्ट, पुढील 3 दिवस....
धक्कादायक! डीजेच्या आवाजाने तरुणाचा दुर्दैवी मृत्यू?
धक्कादायक! डीजेच्या आवाजाने तरुणाचा दुर्दैवी मृत्यू?.
रायगडचं पालकमंत्रिपद गोगावलेंना नाही; ठाकरेंच्या नेत्यानं कारण सांगितल
रायगडचं पालकमंत्रिपद गोगावलेंना नाही; ठाकरेंच्या नेत्यानं कारण सांगितल.
बॉलीवूडच्या भाईजानचं टेंशन वाढलं; गाडी उडवून देण्याची मिळाली धमकी
बॉलीवूडच्या भाईजानचं टेंशन वाढलं; गाडी उडवून देण्याची मिळाली धमकी.
'पुन्हा भिसे प्रकरण...', 'दीनानाथ' मधील घटनेनंतर चाकणरांची मोठी ग्वाही
'पुन्हा भिसे प्रकरण...', 'दीनानाथ' मधील घटनेनंतर चाकणरांची मोठी ग्वाही.
ढोल वाजवण्यात आणि लेझिम खेळण्यात सुरेश धस रमले
ढोल वाजवण्यात आणि लेझिम खेळण्यात सुरेश धस रमले.
प्रफुल पटेल भाजपसोबत गेल्यावर दाऊदची संपत्ती मुक्त केली; राऊतांची टीका
प्रफुल पटेल भाजपसोबत गेल्यावर दाऊदची संपत्ती मुक्त केली; राऊतांची टीका.