SC Verdict on NEET-UG : नीटची पुन्हा परीक्षा नाही, तो आरोपही टिकला नाही; सर्वोच्च न्यायालयाचा ‘NEET’ निर्णय काय?

NEET UG 2024 : नीट यूजी प्रश्नपत्रिका फुटल्याप्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने आता सर्व किंतू-परंतू दूर केले आहे. ही परीक्षाच संशयाच्या घेऱ्यात आल्यानंतर या सुप्रीम फैसल्याने अनेक वादावर पडदा टाकला आहे. तर या निर्णयावर विद्यार्थ्यांना उच्च न्यायालयात दाद मागण्याचा मार्ग पण मोकळा ठेवण्यात आला आहे.

SC Verdict on NEET-UG : नीटची पुन्हा परीक्षा नाही, तो आरोपही टिकला नाही; सर्वोच्च न्यायालयाचा 'NEET' निर्णय काय?
नीट-युजी 2004 वर सुप्रीम फैसला
Follow us
| Updated on: Aug 02, 2024 | 12:02 PM

NEET UG 2024 प्रश्नपत्रिका फुटल्याप्रकरणात आता सर्वोच्च न्यायालयाने या परीक्षेवरील मळभ दूर केले आहे. ही संपूर्ण परीक्षाच संशयाच्या फेऱ्यात आली होती. सर्वोच्च न्यायालयाने याप्रकरणात आम्ही या निष्कर्षाप्रत पोहोचलो आहोत की पेपरचं कोणतेही ’सिस्टीमॅटिक ब्रीच’ झाले नाही, असे महत्वपूर्ण निरीक्षण नोंदवले आणि अनेक वादांवर पडदा टाकला. आता ही परीक्षा पुन्हा होणार नाही, तर परीक्षेत देशात सगळीकडेच गोंधळ उडाला, पेपर लीक झाला हा आरोप न्यायालयात टिकला नाही, हे स्पष्ट झाले.

सुप्रीम कोर्टाचा निकाल काय

आम्ही या निष्कर्षाप्रत पोहोचलो आहोत की पेपरचं कोणतेही ’सिस्टीमॅटिक ब्रीच’ झाले नाही. पेपर लीक व्यापक प्रमाणावर झाला नाही. पेपर लीक फक्त पाटणा आणि हजारीबाग पुरतां मर्यादित होता. ⁠एनटीए ने यापुढे काळजी घ्यायला पाहिजे, अशी ताकीद पण न्यायालयाने दिली. आम्ही नीटच्या पुर्नपरिक्षेच्या मागणीला फेटाळत असल्याचे न्यायालयाने स्पष्ट केले.

हे सुद्धा वाचा

केंद्राचे टोचेल कान

या वर्षी जी गडबड झाली त्यावर केंद्र सरकारनं विचार केला पाहिजे. यापुढे अशा घटना व्हायला नाही पाहिजे, असे सर्वोच्च न्यायालयाने कान टोचले. ⁠संपूर्ण परिक्षा पद्धतीत कोणताही बिघाड नसल्याचं सुप्रीम कोर्टाने सांगितले. कोर्टाने कमिटीचा अहवाल तयार करण्यासाठी ३० सप्टेंबर २०२४ चा कालावधी निश्चीत केला आहे.

सुप्रीम कोर्टाचे सायबर तंत्रज्ञानावर बोट

सरन्यायाधीशांनी याप्रकरणात केंद्र सरकारने एक समिती गठीत केल्याचे स्पष्ट केले. या समितीत एक मूल्यांकन समिती पण असेल. परीक्षा प्रणालीतील सायबर सुरक्षेतील कमकुवत पणा शोधण्यासाठी तंत्रज्ञान विकसीत करण्याची गरज असल्याचे निरीक्षण कोर्टाने नोंदवले. पेपर लीक केवळ पाटणा आणि हाजारीबाग पुरते मर्यादीत होते. यात कोणतेही सिस्टमॅटिक ब्रीच झालेले नाही. म्हणजे यात नियोजनबद्धरीत्या पेपर फोडण्यात आले नसल्याचे निरीक्षण न्यायालयाने नोंदवले.

सरन्यायाधीश डी. वाय. चंद्रचूड यांच्या पीठाने या याचिकेवर सुनावणीदरम्यान काही सल्ले पण दिले. ई-रिक्शाचा वापर करण्याऐवजी रिअल टाईम लॉक असलेल्या वाहनांचा वापर करण्याचा सल्ला दिला. प्रश्न पत्रिका तयार करण्यापासून तर परीक्षा संपेपर्यंतच्या प्रक्रियेवर करडी नजर ठेवण्याचे आणि एसओपी तयार करण्याचे न्यायालयाने स्पष्ट केले.

Non Stop LIVE Update
मंत्री उदय सामंत यांचे गोमाता प्रेम पाहीलंय का ?
मंत्री उदय सामंत यांचे गोमाता प्रेम पाहीलंय का ?.
नागपूरातील संविधान संमेलनात राहुल गांधी सहभागी होणार
नागपूरातील संविधान संमेलनात राहुल गांधी सहभागी होणार.
दुसऱ्याचं चिन्हं चोरणे ही काही मर्दानगी नाही, काय म्हणाले अंबादास दानव
दुसऱ्याचं चिन्हं चोरणे ही काही मर्दानगी नाही, काय म्हणाले अंबादास दानव.
रणशिंग फुंकले, राज ठाकरे यांची 5 आणि 6 तारखेला येथे होणार जाहीर सभा
रणशिंग फुंकले, राज ठाकरे यांची 5 आणि 6 तारखेला येथे होणार जाहीर सभा.
सदा सरवणकर यांची समजूत काढून विधानपरिषेदत संधी देऊ - प्रसाद लाड
सदा सरवणकर यांची समजूत काढून विधानपरिषेदत संधी देऊ - प्रसाद लाड.
जे बंडखोर ऐकणार नाहीत, त्यांना सहा वर्षे बंदी, बावनकुळे यांनी दिला दम
जे बंडखोर ऐकणार नाहीत, त्यांना सहा वर्षे बंदी, बावनकुळे यांनी दिला दम.
देवेंद्र फडणवीस यांना इस्रायल की युक्रेनपासून धोका ? काय म्हणाले राऊत
देवेंद्र फडणवीस यांना इस्रायल की युक्रेनपासून धोका ? काय म्हणाले राऊत.
एक दोन दिवस माझ्यावर नाराज व्हायचं तर व्हा, काय म्हणाले जरांगे पाहा
एक दोन दिवस माझ्यावर नाराज व्हायचं तर व्हा, काय म्हणाले जरांगे पाहा.
राष्ट्रवादी पक्षात अन् पवार कुटुंबात फूट, रोहित पवार म्हणाले...
राष्ट्रवादी पक्षात अन् पवार कुटुंबात फूट, रोहित पवार म्हणाले....
मराठा-दलित-मुस्लिम समीकरण जुळलं, उद्या मोठी घोषणा, जरांगे म्हणाले...
मराठा-दलित-मुस्लिम समीकरण जुळलं, उद्या मोठी घोषणा, जरांगे म्हणाले....