TET Exam Scam : लाखो रुपये देऊन धुळ्यातील 1003 तर पुण्यातील 323 उमेदवार उत्तीर्ण, पुणे पोलिसांच्या तपासातून माहिती समोर

पुणे सायबर पोलिसांकडून (Pune Cyber Police) सुरु असलेल्या शिक्षक पात्रता परीक्षा (TET Exam Scam) घोटाळ्याच्या तपासात धक्कादायक बाबी उघड होत आहेत. पुणे पोलिसांनी केलेल्या तपासात राज्यातील 7880 विद्यार्थी बनावट पद्धतीनं उत्तीर्ण झाल्याचं समोर आलं आहे.

TET Exam Scam : लाखो रुपये देऊन धुळ्यातील 1003 तर पुण्यातील 323 उमेदवार उत्तीर्ण, पुणे पोलिसांच्या तपासातून माहिती समोर
प्रातिनिधिक छायाचित्र Image Credit source: tv9
Follow us
| Updated on: Feb 10, 2022 | 8:20 AM

पुणे : पुणे सायबर पोलिसांकडून (Pune Cyber Police) सुरु असलेल्या शिक्षक पात्रता परीक्षा (TET Exam Scam) घोटाळ्याच्या तपासात धक्कादायक बाबी उघड होत आहेत. पुणे पोलिसांनी केलेल्या तपासात राज्यातील 7880 विद्यार्थी बनावट पद्धतीनं उत्तीर्ण झाल्याचं समोर आलं आहे. शिक्षक पात्रता परीक्षा 2019 मध्ये हा गैरप्रकार झाला होता. ही परीक्षा 2020 मध्ये झाली होती. 7880 जणांवर कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती आहे. टीईटी परीक्षेत लाखो रुपये देऊन पात्र झालेल्या 7 हजार 880 जणांपैकी तब्बल 1003 अपात्र उमेदवार फक्त धुळ्यातील (Dhule) आहेत. तर, पुण्यात 323 अपात्र उमेदवार असल्याचं समोर आलं आहे. अपात्र असतानाही पैसे देऊन पात्र झालेले उमेदवार राज्यातील विविध भागातील खासगी आणि सरकारी शाळांमध्ये नोकरीला असल्याची बाब समोर आली आहे.

2019 च्या परीक्षेत धुळ्यातील 1003 जण पैसे देऊन उत्तीर्ण

टीईटी परीक्षेत लाखो रुपये देऊन पात्र झालेल्या 7 हजार 880 जणांपैकी तब्बल 1003 अपात्र उमेदवार फक्त धुळ्यात तर पुण्यात 323 अपात्र उमेदवार असल्याची माहिती समोर आली आहे. अपात्र असतानाही पैसे देऊन पात्र झालेले उमेदवार राज्यातील विविध भागातील खासगी आणि सरकारी शाळांमध्ये नोकरीला असल्याचं समोर आलं आहे.

आरोपींवर लाचलुचपतचं कलम लागणार

टीईटी परीक्षा घोटाळा प्रकरणी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेचे तत्कालीन आयुक्त तुकाराम सुपे, माजी आयुक्त सुखदेव डेरे, शिक्षण विभागाचा तांत्रिक सल्लागार अभिषेक सावरीकर, जीए टेक्नॉलॉजीचा आश्विन कुमार, सौरभ त्रिपाठी डॉ. प्रीतिश देशमुख आणि आयएएस अधिकारी सुशील खोडवेकर याच्यासह इतरांना अटक करण्यात आली आहे. म्हाडा, आरोग्य आणि टीईटी प्रकरणातील आरोपींच्या मालमत्तेची चौकशी होणार आहे. पेपरफुटीप्रकरणी लाचलुचपतची कलमं लावण्यात येणार आहेत.

जी.ए. टेक्नॉलॉजीचे गणेशनं यांची चौकशी सुरु

जी.ए. टेक्नॉलाजीचे गणेशन हा ट्रान्झिट रिमांड घेऊन पुणे पोलिसांसमोर टीईटी परीक्षा घोटाळ्याप्रकरणी चौकशीसाठी हजर झाला आहे. पुणे पोलिसांकडून त्यांची चौकशी करण्यात येत आहे. दरम्यान, पुणे पोलिसांकडून सुरु असलेल्या टीईटी गैरप्रकारातील घोटाळ्याची व्याप्ती वाढणार असल्याचं समोर येत आहे.

‘…तर त्यांच्यावर सेवा समाप्तीची कारवाई’ – Dattatray Jagtap | TET Exam

TET Exam Result Update : टीईटीचा निकाल कधी लागणार? MSCE च्या अध्यक्षांकडून महत्त्वाची माहिती

TET Exam Scam 1003 candidates from Dhule and 323 from Pune pass by giving money

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.