तुकाराम सुपेनं 2018 मध्ये टीईटी घोटाळा प्रकरण दाबलं, जी ए सॉफ्टवेअरच्या संचालकानं 30 लाख दिले
टीईटी घोळ्यातील आरोपी तुकाराम सुपेनं (Tukaram Supe) जी. ए सॉफ्टवेअरच्या संचालकांकडून पैसे घेतल्याची कबुली पोलीस (Pune) तपासात दिली आहे.
पुणे : महाराष्ट्र राज्य शिक्षक पात्रता (TET Exam Scam) परीक्षेसंदर्भातील घोटाळ्यासंदर्भात आणखी माहिती समोर आली आहे. टीईटी घोळ्यातील आरोपी तुकाराम सुपेनं (Tukaram Supe) जी. ए सॉफ्टवेअरच्या संचालकांकडून पैसे घेतल्याची कबुली पोलीस (Pune) तपासात दिली आहे. तुकाराम सुपेला परीक्षेचं कंत्राट दिलेल्या जी ए सॉफ्टवेअरचा संचालक शिवकुमार याने तब्बल 30 लाख रुपये दिले असल्याची माहिती समोर आली आहे. ही शिवकुमारनं पोलीस तपासात दिली आहे. याशिवाय 2018 सालीचं तुकाराम सुपेनं प्रकरण दाबल्याची पोलीस चौकशीत माहिती दिली आहे. जळगावच्या तत्कालीन शिक्षणाधिकाऱ्यांनी 81 बनावट प्रमाणपत्र देऊनही सुपेनं काही कारवाई केली नाही नसल्याचं देखील पोलीस तपासात समोर आलं आहे. 16 फेब्रुवारीपर्यंत या प्रकरणाचा पोलीस कोठडीत तपास चालणार आहे.
तुकाराम सुपेनं जीए सॉफ्टवेअरकडून 30 लाख घेतले
टीईटी परीक्षेचं आयोजन करणाऱ्या जीए सॉफ्टवेअर कंपनीकडून तुकाराम सुपेनं पैसे घेतल्याची कबुली पोलीस तपासात दिली आहे. जी ए सॉफ्टवेअरचा संचालक शिवकुमार यानं तुकाराम सुपे याला 30 लाख रुपये दिले असल्याची माहिती पुणे पोलिसांच्यावतीनं करण्यात आलेल्या तपासात म्हटलं आहे.
2019 च्या परीक्षेत धुळ्यातील 1003 जण पैसे देऊन उत्तीर्ण
टीईटी परीक्षेत लाखो रुपये देऊन पात्र झालेल्या 7 हजार 880 जणांपैकी तब्बल 1003 अपात्र उमेदवार फक्त धुळ्यात तर पुण्यात 323 अपात्र उमेदवार असल्याची माहिती समोर आली आहे. अपात्र असतानाही पैसे देऊन पात्र झालेले उमेदवार राज्यातील विविध भागातील खासगी आणि सरकारी शाळांमध्ये नोकरीला असल्याचं समोर आलं आहे.
जी.ए. टेक्नॉलॉजीचे गणेशनं यांची चौकशी सुरु
जी.ए. टेक्नॉलाजीचे गणेशन हा ट्रान्झिट रिमांड घेऊन पुणे पोलिसांसमोर टीईटी परीक्षा घोटाळ्याप्रकरणी चौकशीसाठी हजर झाला आहे. पुणे पोलिसांकडून त्यांची चौकशी करण्यात येत आहे. दरम्यान, पुणे पोलिसांकडून सुरु असलेल्या टीईटी गैरप्रकारातील घोटाळ्याची व्याप्ती वाढणार असल्याचं समोर येत आहे.
इतर बातम्या :
TET exam scam Tukaram Supe accepted money taken from G A Software