मिस इंडीया ते एमबीए…नंतर बहुराष्ट्रीय कंपनीत जॉब, आकांक्षा चौधरी हीचा आश्चर्यकारक प्रवास

आयआयएम अहमदाबादसाठी अर्ज केला तेव्हा आकांक्षा चौधरी हीची मिस इंडीया स्पर्धेसाठी निवड झाली नंतर तिने बिझनेस मॅनेजमेंटचे शिक्षण पूर्ण केले. आता बहुराष्ट्रीय कंपनीत कामाला आहे.

मिस इंडीया ते एमबीए...नंतर बहुराष्ट्रीय कंपनीत जॉब, आकांक्षा चौधरी हीचा आश्चर्यकारक प्रवास
Akanksha Chaudhary
Follow us
| Updated on: Sep 30, 2023 | 3:43 PM

नवी दिल्ली | 30 सप्टेंबर 2023 : आकांक्षा चौधरी ही मिस इंडीया एलाईट 2016 विजेती आणि राष्ट्रीय पातळीवरील मॉडेल आहे. बिझनेस स्कूल आयआयएम अहमदाबाद मधून आकांक्षा हीने शिक्षण केले असल्याने ती खरोखरच ‘ब्युटी विथ ब्रेन’ आहे. मॉडेलिंगमधून करीयर घडवित असताना आकांक्षा हीने CAT परीक्षा देत देशातील सर्वोच्च कॉलेजात प्रवेश मिळविला. सध्या आकाक्षा बहुराष्ट्रीय कंपनीत कन्सलटन्ट म्हणून काम करीत आहे.

आकांक्षा चौधरी दिल्लीच्या श्रीराम कॉलेज ऑफ कॉमर्स मध्ये पाचव्या क्रमांकावर होती. कॉलेजच्या दिवसात ती अनेक फॅशन इव्हेंटमध्ये सहभाग घ्यायची. कनिका कपूर, रणदीप हुडा, गौहर खान आणि झरीन खान यांच्या सोबत तिने मॉडेलिंग केले आहे. आकांक्षा हीने जेव्हा मॅनेजमेंट स्कूलसाठी अर्ज केला तेव्हा तिची नेमकी मिस इंडीया एलाईट स्पर्धेसाठी निवड झाली. तिने आपली मॉडेलिंगची आवडच जोपासली नाही तर तिला CAT मध्ये 98.12 पर्सेंटाईल मिळून तिला आयआयएमला प्रवेश मिळाला.

शिक्षण घेता घेता छंदही जोपासला

एका मुलाखतीत आकांक्षा हीने सांगितले की मी स्पर्धेत केवळ फॅशनची आवड म्हणून सहभाग घेतला होता. मॉडेलिंगसाठी आपली जीवनशैली बदलावी लागते. संपूर्ण फिट राहावे लागते. तिच सवय आपल्याला जॉबमध्ये देखील कामाला येते असे तिचे म्हणणे आहे. आकांक्षा मॉडेलींगमुळे भारताचा नवा चेहरा म्हणून समोर आली तरी तिने तिचे शिक्षण सोडले नाही. मॉडेलिंग आणि CAT चा अभ्यास एकत्र केला. आकांक्षा हीने आयआयएम अहमदाबाद ( बॅच 2017-18 ) मधून एमबीए ग्रॅज्युएट केले. आता ती मॅककिन्से कंपनीत कन्सलटन्ट आहे. आकांक्षा म्हणजे फॅशन – मॉडेलिंग करतानाही तुम्ही बिझनेसमध्येही यशस्वी होऊ शकता याचे उत्कृष्ट उदाहरण आहे.

“याला भेट, त्याला भेट अन् दुसऱ्या दिवशी घरी थेट”,शिंदेंचा कोणाला टोला?
“याला भेट, त्याला भेट अन् दुसऱ्या दिवशी घरी थेट”,शिंदेंचा कोणाला टोला?.
लोकसभा-राज्यसभेत अमित शाह माफी मांगो अन् जयभीमच्या विरोधकांच्या घोषणा
लोकसभा-राज्यसभेत अमित शाह माफी मांगो अन् जयभीमच्या विरोधकांच्या घोषणा.
दादा नाराज भुजबळांनी मनधरणी करणार? अजितदादांसह 'हे' दोन नेते भेट घेणार
दादा नाराज भुजबळांनी मनधरणी करणार? अजितदादांसह 'हे' दोन नेते भेट घेणार.
'दादांची तब्येत बिघडते, अधून-मधून आवाज जातो मी त्यांना गोळी...'
'दादांची तब्येत बिघडते, अधून-मधून आवाज जातो मी त्यांना गोळी...'.
अजितदादा तिसऱ्या दिवशी विधिमंडळात प्रकटले? नॉटरिचेबल असण्याच कारण समोर
अजितदादा तिसऱ्या दिवशी विधिमंडळात प्रकटले? नॉटरिचेबल असण्याच कारण समोर.
'वन नेशन, वन इलेक्शन' रखडलं, सरकारच्या बाजूनं अन् विरोधात किती जण?
'वन नेशन, वन इलेक्शन' रखडलं, सरकारच्या बाजूनं अन् विरोधात किती जण?.
आधी अपहरण नंतर सरपंच संतोष देशमुखांची हत्या...मस्साजोगची A टू Z स्टोरी
आधी अपहरण नंतर सरपंच संतोष देशमुखांची हत्या...मस्साजोगची A टू Z स्टोरी.
मंत्रिमंडळ विस्तारात नाराजीरावांचा पूर, खातेवाटपाच्या वेळी काय होणार?
मंत्रिमंडळ विस्तारात नाराजीरावांचा पूर, खातेवाटपाच्या वेळी काय होणार?.
भुजबळांचं मंत्रिपद दादांनी मंत्रिपद नाकारलं? भुजबळ मोठा निर्णय घेणार?
भुजबळांचं मंत्रिपद दादांनी मंत्रिपद नाकारलं? भुजबळ मोठा निर्णय घेणार?.
ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर
ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर.