All the Best! आजपासून बारावीच्या परीक्षेला प्रारंभ, कॉपीमुक्त परीक्षा अभियानासाठी बोर्ड सज्ज

आजपासून 12 वीच्या विद्यार्थ्यांची बोर्ड परीक्षा सुरू होत आहे. त्यासाठी बोर्ड कडून संपूर्ण तयारी झाली आहे. यंदाच्या वर्षी कॉपीमुक्त अभियानावर भर दिला जाणार आहे.

All the Best! आजपासून बारावीच्या परीक्षेला प्रारंभ, कॉपीमुक्त परीक्षा अभियानासाठी बोर्ड सज्ज
Image Credit source: Google
Follow us
| Updated on: Feb 21, 2023 | 8:36 AM

मुंबई : आजपासून बारावीच्या बोर्ड परीक्षेला ( Board Exam ) सुरुवात होत आहे. त्यासाठीची संपूर्ण तयारी झाली असून बोर्ड सह इतर यंत्रणा सज्ज झाल्या आहेत. राज्य माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून ही परीक्षा आयोजित केली जाते. यंदाच्या वर्षी 14 लाख 57 हजार 293 विद्यार्थी ( Student ) परीक्षेला पात्र आहे. त्यासाठी 3 हजार 195 केंद्रांची नियुक्ती करण्यात आली आहे. कॉपीमुक्त अभियान राबविण्यासाठी यंदाच्या वर्षी तब्बल 271 भरारी पथक असणार आहे. तर ही संपूर्ण परीक्षा प्रक्रिया राबविण्यासाठी 21 हजार 396 शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहे.

विद्यार्थ्यांच्या शालेय प्रवासात दहावी ही बोर्ड परीक्षा पहिला टप्पा असते, तर बारावीच्या परीक्षेचा टप्पा दूसरा असतो. राज्य माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून या परीक्षा घेतल्या जातात. आजपासून त्या सुरू होत आहे.

बोर्ड परीक्षेचे नियोजन करत असतांना दोन सत्रात या परीक्षा होणार आहे. त्यासाठी प्रत्येक विद्यार्थ्याने कमीतकमी अर्धा तास अगोदर परीक्षा केंद्रावर उपस्थित असणे अनिर्वाय केले आहे. परीक्षेपूर्वी आसन क्रमांक आणि वर्ग शोधण्यासाठी तीस मिनिटे अगोदर बोलावण्यात आले आहे.

हे सुद्धा वाचा

पहिल्या सत्रातील परीक्षा ही सकाळी अकरा वाजता सुरू होणार आहे. मात्र, विद्यार्थ्यांनी त्यासाठी साडेदहा वाजताच परीक्षा केंद्रावर हजर व्हायचे आहे. तर दुसऱ्या सत्रात होणारी परीक्षा ही तीन वाजता असणार आहे. त्यासाठी अर्धा तास अगोदर म्हणजेच अडीच वाजता परीक्षा केंद्रावर हजर राहायचे आहे.

यंदाच्या परीक्षेदरम्यान कॉपीमुक्त अभियान राबविण्यासाठी बोर्ड कडून विशेष लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. अनेक परीक्षा केंद्रांवर कॉपी केली जाते. परीक्षा केंद्रांच्या अवतीभोवती मोठ्या प्रमाणात कागदांचा खच पडत असतो.

त्याच पार्श्वभूमीवर बोर्डकडून विशेष पथके तयार करण्यात आली आहे. त्यासाठी संपूर्ण राज्यात 271 पथके विविध परीक्षा केंद्रांवर धडक देणार आहे. कॉपी करतांना कुठलाही विद्यार्थी आढळून आल्यास त्याच्यावर कारवाई केली जाणार आहे.

कॉपीमुक्त परीक्षा केंद्र करण्यासाठी विशेष भर देण्यात आला आहे. याशिवाय निर्धारित वेळेपेक्षा दहा मिनिटे वेळ वाढवून देण्यात आली आहे. याच काळात प्रश्नपत्रिका सील बंद पाकिटात आणणे, याशियाय दोन विद्यार्थ्यांच्या सहीनेच ते खुले करावे लागणार आहे.

या संपूर्ण काळात जीपीएस वाहनांचा वापर केला जाणार आहे. कंट्रोल रूमच्या माध्यमातून त्यावर नजर ठेवली जाणार आहे. प्रत्येक परीक्षा केंद्रावर वाहन कोणत्या मार्गाने जात आहे. निर्धारित वेळत पोहचते का? याबाबत लक्ष ठेवले जाणार आहे.

बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्यe अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्यe अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...