IAF Agniveer Recruitment 2022 : हवाई दलात अग्निवीर वायू भरतीसाठी 7 लाखांहून अधिक अर्ज

IAF Agniveer Recruitment 2022 : यावर्षी भारतीय वायू दलाकडून अग्निवीर वायू पदांसाठी सर्वाधिक अर्ज(application) प्राप्त झाले आहे. वायूदलाने (air force) याबद्दल माहिती दिली आहे. यावर्षी एकूण 7,49,899 अर्ज भरले गेले आहेत.

IAF Agniveer Recruitment 2022 : हवाई दलात अग्निवीर वायू भरतीसाठी  7 लाखांहून अधिक अर्ज
अग्निवीर वायुला उदंड प्रतिसादImage Credit source: सोशल मीडिया
Follow us
| Updated on: Jul 06, 2022 | 4:55 PM

Agniveer Vayu Registration : अग्निवीर वायू पदांसाठी फॉर्म भरणे प्रक्रिया 24 जूनपासून सुरू होती‌. ही प्रक्रिया 5 जुलै पर्यंत चालू होती. वायूसेनातील भरती ( IAF Agniveer Vayu Bharti 2022) अर्जप्रक्रिया पूर्ण झाली आहे. यासाठी एकूण 7,49,899 अर्ज प्राप्त झाले आहे. मागच्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी जास्त अर्ज भरले आहेत. मागच्या वर्षी हाच आकडा 6,31,528 एवढे अर्ज भरले होते. अशी माहिती वायूसेनाने दिली. भारतीय नौदलात देखील भरती अर्जप्रक्रिया 1 जुलैपासून सुरू झाली आहे. तर भारतीय सैन्यभरती सुध्दा सुरू झाली आहे. रेल्वेमध्ये( railway Bharati) देखील भरतीची घोषणा केली आहे.14 जून 2022 ला भारतीय सशस्त्र दलाच्या (Armed forces) भरतीची घोषणा केली आहे. अग्निवीरांना वायुदलात समावेशासाठीची भरती प्रक्रिया 24 जूनपासून सुरु करण्यात आली होती. 22 जून रोजी वायुदलाने याविषयीची आधिसूचना जाहीर केली होती. अर्ज, निवड आणि भरती प्रक्रियेची सविस्तर माहिती इंडियन एअरफोर्सच्या अधिकृत संकेतस्थळावर indianairforce.nic.in वर उपलब्ध करुन देण्यात आली होती. ऑनलाईन रजिस्ट्रेशन प्रक्रिया 5 जुलै पर्यंत सुरु होती. या दरम्यान देशभरातून या भरती प्रक्रियेला उदंड प्रतिसाद मिळाला. उमेदवारांनी या भरतीवर उड्या टाकल्या. याअगोदर या भरती प्रक्रियेला प्रचंड विरोध झाला. परंतू अर्ज प्रक्रियेनंतर उमेदवारांना या भरतीचे आणि त्यानंतरच्या करियरच्या संधीचे महत्व समजल्याचे दिसून येते.

अग्निवीर भरती तीन भागात केली जाईल

इयत्ता 12 वी अथवा समकक्ष परीक्षेत गणित(Math’s), भौतकिशास्त्र(Physic) आणि इंग्रजीसह (English) कमीतकमी 50 टक्के गुणवत्ताधारक अथवा 3 वर्षांचा अभियांत्रिकी पदविकाधारक (Engineering Diploma) याशिवाय 2 व्यवासायिक पदविका (Vocational Course) पूर्ण करणा-या उम्मेदवारांना या भरती प्रक्रियेत संधी मिळणार आहे. उमेदवाराचे वय 17.5 वर्ष ते अधिकत्तम 23 वर्षांपेक्षा कमी असणा-या तरुणांना या भरती प्रक्रियेत सहभागी करुन घेण्यात आले आहे. अग्निवीर वायूदलात तीन भागात भरती होईल, यात जल ,वायुदलात चार वर्षं काम करावे लागेल. त्यानंतर भरती झालेल्या लोकांमध्ये ज्याचे वय 75 वर्ष असतील अशांना चांगली रक्कम देऊन रिटायर्ड केले जाते . त्यानंतर नवीन 25 वर्ष असलेल्या लोकांना रुजू केले जाईल.

हे सुद्धा वाचा

चार वर्षांच्या परिश्रमात अग्निवीरांना खडतर प्रशिक्षण, कौशल्यासह चांगल्या वेतनाची (Salary) संधी खुणावत आहे. अवघ्या 23, 24 वर्षी तयार होऊन बाहेर पडणा-या तरुणांना दांडगा अनुभव तर असेलच पण त्यांच्या गाठी जमापुंजीपण असेल. त्या जोरावर ते नवीन करियर घडवू शकतात. त्यांचा जॉब प्रोफाईल (Job Profile) कमी वयातच जबरदस्त असल्याने अनेक कंपन्यांची दार त्यांच्यासाठी उघडणार आहेत. एवढंच नाहीतर त्यांना पुढचे शिक्षण घेऊन आणखी उंच भरारी घेता येणार आहे. अथवा त्यांचा व्यवसाय सुरु करता येणार आहे.

महाराष्ट्रातील असं एक गाव जिथं माणसं आपोआप होतात टकले, नेमक काय घडतय?
महाराष्ट्रातील असं एक गाव जिथं माणसं आपोआप होतात टकले, नेमक काय घडतय?.
शकुनी-कंस मामाला लाजवेल असा कलीयुगातला मामा, भाचीच्या लग्नात असं कृत्य
शकुनी-कंस मामाला लाजवेल असा कलीयुगातला मामा, भाचीच्या लग्नात असं कृत्य.
'चुकीच्या पद्धतीने...', धसांचा धनंजय मुंडेंनंतर पंकजा मुंडेंवर आरोप
'चुकीच्या पद्धतीने...', धसांचा धनंजय मुंडेंनंतर पंकजा मुंडेंवर आरोप.
पुरुष वेश्या.. मुंडेंच्या राजीनाम्यावर बोलताना 'या' आमदाराची जीभ घसरली
पुरुष वेश्या.. मुंडेंच्या राजीनाम्यावर बोलताना 'या' आमदाराची जीभ घसरली.
'मनगटात दम असेल तर कामाने मोठे व्हा', जानकरांना महिला नेत्याचा सल्ला
'मनगटात दम असेल तर कामाने मोठे व्हा', जानकरांना महिला नेत्याचा सल्ला.
'शरद पवार गटाकडून दादांना मिसकॉल येतात', NCP च्या आमदाराचा गौप्यस्फोट
'शरद पवार गटाकडून दादांना मिसकॉल येतात', NCP च्या आमदाराचा गौप्यस्फोट.
'बाप-लेकीला सोडा अन्...', शरद पवारांच्या खासदारांना कोणाचा प्रस्ताव?
'बाप-लेकीला सोडा अन्...', शरद पवारांच्या खासदारांना कोणाचा प्रस्ताव?.
दादर स्टेशनवर तरूणीचे कापले केस, काढला पळ; माथेफिरूला पोलिसांकडून अटक
दादर स्टेशनवर तरूणीचे कापले केस, काढला पळ; माथेफिरूला पोलिसांकडून अटक.
फेसबूक अन् इंस्टाग्राम वापरताय? आता होणार मोठा बदल, झुकेरबर्ग म्हणाला
फेसबूक अन् इंस्टाग्राम वापरताय? आता होणार मोठा बदल, झुकेरबर्ग म्हणाला.
मुंबईकरांची चिंता वाढली; HMPV चा शिरकाव, 6 महिन्याचं बाळ पॉझिटीव्ह
मुंबईकरांची चिंता वाढली; HMPV चा शिरकाव, 6 महिन्याचं बाळ पॉझिटीव्ह.