दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी सर्वात महत्त्वाची बातमी, परीक्षांच्या निकालाबाबत मोठी Update

राज्य सरकारी तसेच निम सरकारी कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या संपामुळे दहावी-बारावीचे निकाल लांबणीवर जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत होती. मात्र बोर्डाकडून आता मोठा खुलासा करण्यात आला आहे.

दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी सर्वात महत्त्वाची बातमी, परीक्षांच्या निकालाबाबत मोठी Update
फाईल फोटो
Follow us
| Updated on: Apr 03, 2023 | 12:42 PM

अभिजित पोते, पुणे : राज्यभरातील दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची माहिती हाती आली आहे. परीक्षा झाल्यानंतर निकाल कधी लागतो, यासाठी राज्यभरातील लाखो विद्यार्थी वाट पाहतायत. नुकतीच बोर्डातील अधिकृत सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, यंदा निकाल वेळेवरच लागतील. जूनच्या पहिल्या आठवड्यात बारावी बोर्डाचा तर लगेच दुसऱ्या आठवड्यात दहावीचा निकाल जाहीर होण्याची शक्यता आहे. दरवर्षी ज्या कालावधीत निकाल लागतात, त्याच वेळेला विद्यार्थ्यांच्या परीक्षेचे निकाल जाहीर केले जातील, असे राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे.

‘निकाल लांबणीवर नाहीच’

राज्यात मागील महिन्यात सरकारी कर्मचाऱ्यांनी जुन्या पेंशन योजनेच्या मागणीसाठी बेमुदत संप पुकारला होता. या संपात खासगी तसेच सरकारी शाळांच्या शिक्षकांचाही समावेश होता. त्यामुळे अनेक शाळांतील कामकाज ठप्प झाले होते. या संपामुळे दहावी-बारावीच्या निकालांवर परिणाम होण्याची शक्यता वर्तवली जात होती. उत्तर पत्रिका तपासण्या विलंब लागणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला होता. मात्र माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून यावर मोठा खुलासा करण्यात आलाय. दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांचे निकाल ठरलेल्या वेळेतच लागणार आहेत.

इतके विद्यार्थी प्रतिक्षेत

२ मार्च ते २५ मार्च दरम्यान झालेल्या दहावी बोर्डाच्या परीक्षेला यंदा १५ लाख, ७७ हजार २५६ विद्यार्थ्यांनी हजेरी लावली. तर २१ फेब्रुवारी ते २३ मार्च दरम्यान झालेल्या बारावी बोर्डाच्या परीक्षेला १४ लाख ५७ हजार २९४ विद्यार्थ्यांनी हजेरी लावली. परीक्षांच्या उत्तर पत्रिका तपासण्याची मोठी जबाबदारी असलेल्या शिक्षक तसेच शिक्षकेतर संघटनांनी संपात सहभाग नोंदवला होता. मात्र आता उत्तर पत्रिका तपासणीचे काम जलद गतीने सुरु आहे. त्यामुळे दहावीचे पेपर तपासण्याची डेडलाइन १५ एप्रिल असेल तर त्याआधी बारावीचे पेपर तपासून पूर्ण होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

दहावी आणि बारावीचा निकाल वेळेत लागावा, यासाठी राज्य मंडळातर्फे युद्ध पातळीवर प्रयत्न केले जात आहेत. या प्रक्रियेतील सर्वच शिक्षक, कर्मचारी तसेच अधिकाऱ्यांचे योग्य सहकार्य मिळत आहे. त्यामुळे येत्या जून महिन्यात पहिल्या आठवड्यात बारावीचा निकाल लागण्याची शक्यता आहे, अशी माहिती राज्य मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी दिली आहे.

Non Stop LIVE Update
बटेंगे तो कटेंगेच्या वक्तव्यावरून पंकजा मुंडेंचा यू-टर्न? म्हणाल्या...
बटेंगे तो कटेंगेच्या वक्तव्यावरून पंकजा मुंडेंचा यू-टर्न? म्हणाल्या....
'पंकजाताईंनी मोठ मन केल म्हणून मी...', सभेतून धनंजय मुंडे काय म्हणाले?
'पंकजाताईंनी मोठ मन केल म्हणून मी...', सभेतून धनंजय मुंडे काय म्हणाले?.
चित्रपटात काम केलं असत.., सदा सरवणकरांच्या मुलीचा अमित ठाकरेंना टोला
चित्रपटात काम केलं असत.., सदा सरवणकरांच्या मुलीचा अमित ठाकरेंना टोला.
'रामदास कदम सरपटणारा साप, निवडणुकीनंतर...',ठाकरे गटाच्या नेत्याची टीका
'रामदास कदम सरपटणारा साप, निवडणुकीनंतर...',ठाकरे गटाच्या नेत्याची टीका.
'राणे पिता-पुत्र हे गाडग्यासारखे..', ठाकरे गटाच्या बड्या नेत्याची टीका
'राणे पिता-पुत्र हे गाडग्यासारखे..', ठाकरे गटाच्या बड्या नेत्याची टीका.
भाजपच्या किती जागा येणार?,कोण होणार CM?; विनोद तावडेंनी थेट सांगितलं..
भाजपच्या किती जागा येणार?,कोण होणार CM?; विनोद तावडेंनी थेट सांगितलं...
डोंबिवलीत भाजपचं कार्यालय फोडल, कोणी केल्ला हल्ला? घटना CCTV मध्ये कैद
डोंबिवलीत भाजपचं कार्यालय फोडल, कोणी केल्ला हल्ला? घटना CCTV मध्ये कैद.
एकनाथ शिंदेंच्या आमदारानं पैसे वाटले? विधानसभेच्या तोंडावर अडचणी वाढल्
एकनाथ शिंदेंच्या आमदारानं पैसे वाटले? विधानसभेच्या तोंडावर अडचणी वाढल्.
पंकजा मुंडेंकडून भाऊ धनंजय मुंडेंना खास गिफ्ट, सभेतून काय केली घोषणा?
पंकजा मुंडेंकडून भाऊ धनंजय मुंडेंना खास गिफ्ट, सभेतून काय केली घोषणा?.
पवार कुटुंबातील कटुता भविष्यात दूर होणार? अजित पवारांचं मोठं वक्तव्य
पवार कुटुंबातील कटुता भविष्यात दूर होणार? अजित पवारांचं मोठं वक्तव्य.