मुलाने आयआयटी सोडून कॉम्प्युटर सायन्स निवडले, टॉवले विक्रेता पिता म्हणाला, मुलाने जे निवडलंय त्यात यश मिळवावे

दिल्ली टेक्नॉलॉजी युनिव्हर्सिटीत अभ्यासाची वार्षिक फी 2.2 लाख रु. इतकी आहे. सुजलचे वडील बळवंत सिंग यांची कमाई महिन्याला 20 हजार रुपये देखील होत नाही.

मुलाने आयआयटी सोडून कॉम्प्युटर सायन्स निवडले, टॉवले विक्रेता पिता म्हणाला, मुलाने जे निवडलंय त्यात यश मिळवावे
balwant singh street vendorImage Credit source: socialmedia
Follow us
| Updated on: Aug 11, 2023 | 9:04 PM

नवी दिल्ली | 10 ऑगस्ट 2023 : नोएडातील रस्त्यावर टॉवले विकणारे 47 वर्षीय बळवंत सिंग यांची छाती गुणी मुलाच्या कामगिरीने अभिमानाने फुगली आहे. हातावरचे पोट असूनही त्यांनी मेहनतीने मुलाला शिक्षण दिले. त्यांच्या मुलांनेही मन लावून अभ्यास करीत चांगले मार्कस् मिळविल्याने त्यांच्या मुलाला दिल्ली आयआयटीत सहज प्रवेश मिळाला. परंतू मुलाने आयआयटी करण्याऐवजी थेट दिल्ली टेक्नॉलॉजी युनिव्हर्सिटीतील कॉम्प्युटर सायन्स निवडल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.

बळवंत यांचा अठरा वर्षांचा मुलगा सुजल याला जेईई मेन परीक्षेत 99.5 टक्के मिळवित दिल्ली आयआयटीत सिव्हील इंजिनिअरिंग शाखेत बी.टेकसाठी प्रवेश मिळविला. परंतू मुलाला कंप्युटर सायन्समध्ये रस असल्याने दिल्ली टेक्नॉलॉजी युनिव्हर्सिटीत प्रवेश मिळविला असल्याचे वृत्त इंडीयन एक्सप्रेसने दिले आहे. आपण मुलाला करीयरबाबत कधीही फोर्स केला नाही. त्याने जे क्षेत्र निवडलंय त्यात यश मिळवावे असे बळवंत सिंग यांनी म्हटले आहे. त्याची मुलगी युपीएससीची तयारी करीत आहे.

सुजल दिवसरात्र अभ्यास करतो

मूळचे अलीगडचे असलेले सिंग नोएडा येथील स्थानिक बाजारात गेली 28 वर्षे टॉवेल विकतात. परंतू मुलांच्या शिक्षणासाठी नेहमी सर्तक असतात. तुम्ही काय करताय हे महत्वाचे नाही तुम्ही तुमच्या मुलांना शिक्षण दिले पाहीजे. योग्य शिक्षणाशिवाय काही महत्वाचे नाही, असे बळवंत म्हणतात. आपल्या मुलाचे कौतूक सांगताना ते म्हणतात की सुजय संपूर्ण दिवस अभ्यासच करीत असतो. मला माहीती आहे माझा मुलगा सक्षम आहे तो दिवसरात्र अभ्यास करीत असतो. तो सकाळी लवकर उठतो आणि रात्री उशीरापर्यंत अभ्यास करीत असतो. मी रात्री पाणी पिण्यासाठी 2-3 वाजण्याच्या दरम्यान उठतो तेव्हा तो अभ्यास करीत असलेला दिसतो. तो मित्रांच्या सोबत कधीच वेळ घालवत नाही असे त्याचे वडील बळवंत यांनी म्हटले आहे.

महिना केवळ 20 हजार कमाई 

दिल्ली टेक्नॉलॉजी युनिव्हर्सिटीत अभ्यासाची वार्षिक फी 2.2 लाख रु. इतकी आहे. सुजलचे वडील बळवंत सिंग यांची कमाई महिन्याला 20 हजार रुपये देखील होत नाही. परंतू कर्ज काढणे त्यांना पटत नाही. आपण नातलगांकडून मुलांच्या शिक्षणासाठी पैसे उसणे घेतले आहेत, सुजलच्या काकाने मला एक लाख रुपये उधार दिले आहेत, आपण मुलाच्या शिक्षणासाठी मॅनेज करु असेही ते म्हणाले.

खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज.