केरळच्या विद्यार्थिनीला यूएईचा गोल्डन व्हिसा मिळाला, गोल्डन व्हिसा किती वर्षांसाठी मिळतो?
केरळमधील विद्यार्थिनी तस्नीम असलम हिला यूएईकडून गोल्डन व्हिसा देण्यात आला आहे. Tasneem Aslam Golden Visa
नवी दिल्ली: केरळमधील विद्यार्थिनी तस्नीम असलम या मुलीला तिची शैक्षणिक गुणवत्ता पाहून संयुक्त अरब अमिरात म्हणजेच यूएईनं प्रतिष्ठित असा दहा वर्षांचा गोल्डन व्हिसा जारी केला आहे. संयुक्त अरब अमिरात गोल्डन व्हिसा सहजासहजी कोणत्याही नागरिकाला देत नाही. मात्र, तस्नीम असलम ही विद्यार्थिनी याबाबतीत अपवाद ठरली आहे. यूएईकडून हा व्हिसा जगातील मान्यवर व्यक्तींना दिला जातो. हा व्हिसा दहा वर्षांसाठी देण्यात येतो त्यानंतर पुढं त्याचं नूतनीकरण केलं जातं. (UAE government issue Golden Visa to Indian Student Tasneem Aslam for next 10 years)
केरळची राहणारी असलम ही विद्यार्थिनी आता पुढील दहा वर्ष वास्तव्य करुन शकते. संयुक्त अरब अमिरात मे 2019 मध्ये दीर्घकालीन रहिवासी व्हिसासाठी नवीन कार्यप्रणाली बनवली होती. यानंतर परदेशी नागरिकांना तिथे काम करणे, राहणे, शिक्षण घेणे यासाठी परवानगी मिळाली होती.
गोल्डन व्हिसा मिळवणारी पहिली भारतीय विद्यार्थिनी
संयुक्त अरब अमिरात कडून गोल्डन व्हिसा मिळाल्याची माहिती तस्निम असलमने माध्यमांना दिली आहे. हा व्हिसा मिळाल्यानंतर आनंद होत असल्याचे देखील तिने सांगितलं. असलम शारजाह येथील अल कासिमिया विद्यापीठात शिक्षण घेत आहे. तिथे ती शरियाचा अभ्यास करते. तस्नीम असलम हिनं तिथे प्रथम क्रमांक मिळवला आहे. तिच्या वर्गामध्ये मी 72 देशांचे विद्यार्थी शिकतात.
संजय दत्तला देखील मिळाला गोल्डन व्हिसा
बॉलिवूड अभिनेता संजय दत्त याला 21 मे रोजी संयुक्त अरब अमिरातकडून गोल्डन व्हिसा मिळाल्याची माहिती त्यांनी ट्विट करून दिली होती. गोल्डन व्हिसा मिळवणारा संजय दत्त हा पहिला भारतीय व्यक्ती आहे त्यानंतर तस्नीम असलम या विद्यार्थिनीला गोल्डन व्हिसा मिळाला आहे. यूएई गोल्डन व्हिसा मिळाल्यानं आनंद झाल्याचं ट्विट संजय दत्तनं केलं आहे.
गोल्डन व्हिसा नक्की काय?
संयुक्त अरब अमिरातकडून गोल्डन व्हिसा हा फक्त गुंतवणूकदारांना दिला जात होता. गोल्डन व्हिसा मिळवण्यासाठी गुंतवणूकदाराला कमीत कमी दहा मिलियन दिरहम म्हणजेच भारतीय चलनात 20 कोटी रुपयांची गुंतवणूक करावी लागते. संयुक्त अरब अमिरातमध्ये तुम्ही बँक अकाउऊट काढून त्यामध्ये 20 कोटी गुंतवल्यास हा व्हिसा दिला जातो.
Honoured to have received a golden visa for the UAE in the presence of Major General Mohammed Al Marri, Director General of @GDRFADUBAI. Thanking him along with the @uaegov for the honour. Also grateful to Mr. Hamad Obaidalla, COO of @flydubai for his support?? pic.twitter.com/b2Qvo1Bvlc
— Sanjay Dutt (@duttsanjay) May 26, 2021
संबंधित बातम्या
(UAE government issue Golden Visa to Indian Student Tasneem Aslam for next 10 years)