विद्यापीठांच्या परीक्षा ऑफलाईन की ऑनलाईन? उदय सामंतांनी स्पष्टच सांगितलं

आदित्य ठाकरे यांच्या संकल्पनेतून महाविद्यालयात लसीकरण मोहीम राबवण्यात येत आहे. मुंबईत आज 55 ठिकाणी लसीकरण करण्यात येतंय. राज्यात ठिकठिकाणी लस देण्यात येत आहेत, अशी माहिती उदय सामंत म्हणाले.

विद्यापीठांच्या परीक्षा ऑफलाईन की ऑनलाईन? उदय सामंतांनी स्पष्टच सांगितलं
उदय सामंत
Follow us
| Updated on: Oct 25, 2021 | 6:31 PM

मुंबई : उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी महाराष्ट्रात 10 कोटी लसीकरण झाल्याचं सांगितलं. कॉलेज सुरु करत असताना दोन्ही डोसची अट ठेवण्यात आली होती. यातून अनेक विद्यार्थी लसीकरणापासून वंचित असल्याचं समोर आलं होत. त्यामुळे आदित्य ठाकरे यांच्या संकल्पनेतून महाविद्यालयात लसीकरण मोहीम राबवण्यात येत आहे. मुंबईत आज 55 ठिकाणी लसीकरण करण्यात येतंय. राज्यात ठिकठिकाणी लस देण्यात येत आहेत, अशी माहिती उदय सामंत म्हणाले. ऑफलाईन वर्ग सुरु करण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे. ज्या ठिकाणी अडचण असेल त्या ठिकाणी ऑनलाईन परीक्षा घेण्यात येईल, असं उदय सामंत यांनी म्हटलं.

परीक्षा ऑफलाईन घेणार

कोरोना विषाणू संसर्गामुळं गेल्यावर्षी ऑनलाईन परीक्षा घ्याव्या लागल्या होत्या. मात्र, यंदा लसीकरण करण्यात येत असून आम्ही ऑफलाईन परीक्षा घेणार आहोत. त्यामुळं विद्यार्थ्यांनी ऑफलाईन परीक्षा देण्यासाठी मानसिकता तयार करावी, असं उदय सामंत म्हणाले.

मिशन महाविद्यालय लसीकरण मोहिमेचं उद्घाटन

राज्यातील महाविद्यालय 100% ऑफलाइन सुरू करण्यासंदर्भात मिशन महाविद्यालय विद्यार्थ्यांचं लसीकरण मोहीम सुरु केली आहेत. या लसीकरण मोहिमेमुळे महाविद्यालयातील ऑफलाईन वर्ग सुरू होतील आणि यंदा परीक्षा ही ऑफलाईन घेता येऊ शकेल, असा आम्हाला विश्वास वाटतो अशी माहिती उच्च तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी दिलीय. मिशन महाविद्यालय लसीकरण मोहिमेचं उद्घाटन आज वांद्र्यातील एम एम के महाविद्यालयात झालं. या मिशन अंतर्गत आठ दिवसात 40 लाख विद्यार्थ्यांचा लसीकरण मोहीम पूर्ण करण्याचा टप्पा आखण्यात आला आहे.

विद्यार्थ्यांना काय वाटत?

विद्यार्थ्यांनी महाविद्यालयात लस मिळत आहे, त्यामुळे मला ऑफलाईन महाविद्यालयाचे वर्गात उपस्थित राहता येणार आहे. त्याचा मला आनंद होत असल्याचे विद्यार्थ्यांनी सांगितलय.

इतर बातम्या:

बाळासाहेब पाटील तुम्ही सहकाराचे रक्षक की भक्षक? 2013 चं आंदोलन विसरु नका,राजू शेट्टींचा इशारा

ऐन दिवाळीत एसटी प्रवास महागला, तब्बल 17 टक्क्यांनी तिकीट दरात वाढ

Uday Samant said this year university exam conduct in offline mode

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.