NCC चा समावेश निवडक कोर्समध्ये करा, युजीसीचे सर्व विद्यापीठांना पत्र
राष्ट्रीय कॅडेट कोर्प्स (NCC) हा विषय आता विद्यापीठांमध्ये निवडक कोर्स म्हणून शिकवला जाणार आहे. (NCC as a Gen Elective Credit Course)
नवी दिल्ली : राष्ट्रीय कॅडेट कोर्प्स (NCC) हा विषय आता विद्यापीठांमध्ये निवडक कोर्स म्हणून शिकवला जाणार आहे. नुकतंच विद्यापीठ अनुदान आयोगाचे (University Grant Commission) सचिव रजनीश जैन यांनी सर्व विद्यापीठांच्या कुलगुरूंना याबाबत एक पत्र लिहिले आहे. यात यूजीसीने सर्व विद्यापीठांच्या कुलगुरुंना एनसीसी NCC जनरल इलेक्टिव्ह क्रेडिट कोर्स (Gen Elective Credit Course) म्हणून जारी करण्याचा सल्ला दिला आहे.
त्यामुळे आता ज्या विद्यार्थ्ययाला एनसीसी हा विषय शिकायचा असेल, त्या विद्यार्थ्यासाठी विद्यापीठाकडून शिक्षक आणि शिक्षणाचे स्त्रोत उपलब्ध करुन दिले जाणार आहेत. (UGC issued advisory all universities of India to have NCC as a Gen Elective Credit Course)
अतिरिक्त दक्षता घेण्याची सूचना
वाढत्या कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर विद्यापीठ अनुदान आयोगाने (University Grant Commission) उच्च शिक्षण संस्थांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. युजीसीने सर्व शिक्षण संस्थांना अतिरिक्त दक्षता घेण्याची सूचना केली आहे. तसेच सर्व विद्यापीठांनी 5 कलमी धोरणांचा अवलंब करावा, असे निर्देशही केले आहे. यात तपासणी, contact tracing, चांगला उपचार करणे, स्क्रीनिंग आणि लसीकरण याचा समावेश आहे.
विद्यार्थ्यांनी वसतिगृहात राहणे कठीण
युजीसीने दिलेल्या माहितीनुसार, देशभरातील अनेक विद्यापीठात तसेच उच्च शैक्षणिक संस्थेतील वसतिगृहांमध्ये अनेक विद्यार्थी राहतात. या विद्यार्थ्यांसाठी तिथे राहणे दिवसेंदिवस कठीण होत चालले आहे. त्यामुळे ज्या विद्यार्थ्यांना कोरोनाची लक्षण आहेत, त्यांनी राष्ट्रीय टोल फ्री नंबर 1057 वर त्वरित संपर्क साधा, असे आवाहन करण्यात आले आहे. सध्या देशात एक हजाराहून अधिक विद्यापीठं असून जवळपास 50 हजार महाविद्यालये आहेत.
महाराष्ट्रात कोरोनाचा हाहाकार!
महाराष्ट्रातील कोरोनाची स्थिती दिवसेंदिवस विदारक बनत चालली आहे. काल कोरोना रुग्णांच्या झपाट्याने वाढणाऱ्या संख्येसह मृत्यूचं तांडव पाहायला मिळत आहे. राज्यात काल (15एप्रिल) दिवसभरात तब्बल 349 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. गेल्या 24 तासांत 61 हजार 695 जणांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. तर 53 हजार 335 जण पूर्णपणे कोरोनामुक्त झाले आहेत. राज्यात सध्या 6 लाख 20 हजार 60 सक्रिय रुग्ण असल्याची माहिती राज्याच्या आरोग्य विभागानं दिली आहे.
कालच्या आकडेवारीसह राज्यातील कोरोना रुग्णांची एकूण संख्या 36 लाख 39 हजार 855 वर जाऊन पोहोचली आहे. त्यातील 29 लाख 59 हजार 56 जण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत. तर मृत्यांचा आकडा 59 हजार 153 वर जाऊन पोहोचला आहे. (UGC issued advisory all universities of India to have NCC as a Gen Elective Credit Course)
संबंधित बातम्या :
NEET PG 2021 Postponed | देशभरात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढता, NEET PG परीक्षा अखेर रद्द