UPSC IES, ISS 2020 interview : युपीएससी आयईएस, आयएसएस परीक्षेच्या मुलाखतीचे वेळापत्रक प्रसिद्ध
उमेदवार अधिकृत वेबसाईट upsc.gov.in वर जाऊन संपूर्ण वेळापत्रक तपासू शकतात. मुलाखतीसाठी प्रवेशपत्रे त्याच वेळी अधिकृत वेबसाईटवर अपलोड केले जाईल. (UPSC IES, ISS Exam Interview Schedule Published on official website)
नवी दिल्ली : केंद्रीय लोकसेवा आयोगाने (युपीएससी) भारतीय आर्थिक सेवा परीक्षा 2020 आणि भारतीय सांख्यिकी सेवा परीक्षा 2020 साठीच्या मुलाखतींचे वेळापत्रक जाहीर केले आहे. भारतीय आर्थिक सेवेच्या मुलाखती 19 एप्रिल 2021 पासून सुरू होतील आणि 22 एप्रिल 2021 पर्यंत असतील. भारतीय सांख्यिकी सेवेच्या मुलाखती 19 एप्रिल 2021 पासून सुरू होतील आणि 23 एप्रिल 2021 पर्यंत असतील. उमेदवार अधिकृत वेबसाईट upsc.gov.in वर जाऊन संपूर्ण वेळापत्रक तपासू शकतात. (UPSC IES, ISS Exam Interview Schedule Published on official website)
मुलाखतीच्या वेळेतच प्रवेशपत्र अपलोड होईल
भारतीय आर्थिक सेवा आणि भारतीय सांख्यिकी सेवा मेन्स परीक्षेत पात्र ठरलेले उमेदवार यूपीएससी आयईएस / आयएसएस मुलाखतीसाठी पात्र ठरतील. उमेदवारांनी लक्षात ठेवा की, मुलाखतीसाठी प्रवेशपत्रे त्याच वेळी अधिकृत वेबसाईटवर अपलोड केले जाईल. अशा परिस्थितीत सर्व उमेदवारांना नवीनतम अपडेट तपासण्याचा सल्ला देण्यात येतो. युपीएससी भारतीय आर्थिक सेवा मुलाखतीसाठी एकूण 31 आणि यूपीएससी भारतीय सांख्यिकी सेवांसाठी 131 उमेदवारांना बोलावण्यात आले आहे.
या तारखा लक्षात ठेवा
भारतीय आर्थिक सेवा – 19 एप्रिल 2021 ते 22 एप्रिल 2021
भारतीय सांख्यिकी सेवा – 19 एप्रिल 2021 ते 23 एप्रिल 2021
वेळापत्रक तपासण्यासाठी खालील स्टेप्स फॉलो करा
स्टेप 1 : युपीएससीची अधिकृत वेबसाईट upsc.gov.in वर जा
स्टेप 2 : ‘UPSC IES/ ISS interview schedule 2020’ या लिंकवर क्लिक करा.
स्टेप 3 : आपणास नवीन पृष्ठावर पुनर्निर्देशित केले जाईल
स्टेप 4 : युपीएससी आयईएस आणि आयएसएस मुलाखत वेळापत्रक स्क्रीनवर प्रदर्शित केले जाईल
स्टेप 5 : पीडीएफ डाऊनलोड आणि जतन करा
यावर्षी होणारी आय.ए.एस. / आय.एस.एस. परीक्षा
यूपीएससीतर्फे घेण्यात येणाऱ्या I.E.S./I.S.S परीक्षेसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया 7 एप्रिलपासून सुरू होईल. यासाठी उमेदवारांना 27 एप्रिलपर्यंत मुदत दिली जाईल. युपीएससी कॅलेंडरनुसार या पदांच्या परीक्षा 16 जुलैपासून सुरू होणार आहेत. ही परीक्षा तीन दिवस चालते. (UPSC IES, ISS Exam Interview Schedule Published on official website)
एकदाच प्रीमियम भरा आणि आयुष्यभरासाठी पेन्शन मिळवा; 1 एप्रिलपासून नवी योजना#Singlepremiumplan #IRDAI #LifetimePension #Pensionplan #Saralpensionplanhttps://t.co/nCb3hQaHKv
— TV9 Marathi (@TV9Marathi) March 9, 2021
इतर बातम्या
मुंबईत कोविडची लस घेतल्यानंतर दीड तासात ज्येष्ठ नागरिकाचा मृत्यू; महापालिकेकडून चौकशी समिती स्थापन
शिक्षणाचा दर्जा सुधारण्यासाठी सरकारचे महत्त्वाचे पाऊल, 12 विषयांचे 120 ग्राफिक कॉमिक्स बुकचे प्रकाशन