लखनऊ : उत्तरप्रदेशच्या मैनपुरी येथील सुरज तिवारी याने आपल्या अपंगत्वावर मात करीत अवघड मानल्या जाणाऱ्या युपीएसएसी परीक्षेत उज्वल यश मिळविले आहे. परिस्थिती कितीही बिकट असली तरी आपली इच्छा असेल तर आपण यश मिळवू शकतो हे सुरज याने सिद्ध केले आहे. सुरज याने आपले दोन्ही पाय आणि एक हात रेल्वे अपघातात गमावला आहे. त्याने केवळ एका हाताच्या तीन बोटांनी पेपर सोडवत युपीएससी परीक्षेत 917 वा क्रमांक मिळविला आहे.
सुरज तिवारी याचे वडील टेलरींगचा व्यवसाय करतात. त्याने आपल्या अपंगत्वावर मात करीत कठीण आर्थिक परिस्थितीत हे यश मिळवित देशात युपीएससीत 917 वा क्रमांक मिळविला आहे. यामुळे माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी युपीएससीची परीक्षा पहिल्याच प्रयत्नात यशस्वी झाल्याबद्दल सुरत तिवारी यांचे कौतूक केले आहे. अखिलेश यादव यांनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटले आहे की, ‘मैनपुरीच्या दिव्यांग सुरज तिवारी याने आययएसची परीक्षा पहिल्याच प्रयत्नात पास करीत हे सिद्ध केले आहे की तुमचा निर्धार आणि दृढ संकल्प जगात सर्वात ताकदवान असतो. सुरज याच्या ‘सुरज’ सारख्या ( सुर्या )यशाबद्दल हार्दिक शुभेच्छा आणि त्याला उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा.’
सुरज याचे वडील टेलरींगचा व्यवसाय करतात. त्यांचा टेलरींगचा व्यवसाय आहे. त्यांचा कुटुंबाचा चरितार्थ त्यांच्या टेलरिंगच्या व्यवसायावरच चालतो. त्याने सर्वांसमोर एक उदाहरण सादर केले आहे की परिस्थिती कितीही बिकट असली तरी हार मानू नये. त्याने रेल्वे अपघातात आपले दोन्ही पाय आणि एक हात गमावला आहे. केवळ एका हाताच्या तीन बोटांनी त्यांनी पेपर सोडवित हे यश मिळविले आहे. त्याने दिवसाचा 18 ते 20 तास अभ्यास करीत हे यश मिळविले आहे. त्याने हे यश कोचिंग क्लास किंवा एक्स्ट्रा क्लासेस शिवाय मिळविले आहे.
सुरज मध्यमवर्गीय कुटुंबातील असून त्याचे वडील राजेश तिवारी टेलर मास्टर असून त्यांचे कुरावली येथे छोटे टेलरिंगचे दुकान आहे. त्याच्यावर त्यांच्या कुटुंबाचा चरितार्थ चालतो. 2017 मध्ये एका रेल्वे अपघातात त्यांचे दोन्ही पाय आणि एक हात हात गमावला होता. चार महिने त्याच्यावर उपचार सुरू होते. त्यानंतर काही वर्षांनी त्याचा भावाचा मृत्यू झाला. कुटुंबांची आर्थिकस्थिती खालावली, तरीही सुरज याने एकाग्रता भंग न करता आपल्या अभ्यासावर लक्ष केंद्रीत केले.