घरची गरिबी पण मेहनतीला तोड नाय, पाचव्यांदा UPSC क्रॅक, यंदा उर्दू भाषेतून बाजी, धुळ्याच्या असीमचं आभाळाएवढं यश!
यूपीएससी 2021 परीक्षेचा अंतिम निकाल या आठवड्यात जाहीर झाला आहे. यामध्ये धुळ्यातील असीम खान यांनी UPSC 2021 च्या परीक्षेमध्ये भारतातून 558 रँक मिळवत घवघवीत यश प्राप्त केले आहे. हे यश त्यांना पहिल्यांदा मिळाले नाही तर त्यांनी तब्बल 5 वेळा UPSC क्रॅक केली आहे.
धुळे : यूपीएससी 2021 परीक्षेचा अंतिम निकाल या आठवड्यात जाहीर झाला आहे. यामध्ये धुळ्यातील असीम खान यांनी UPSC 2021 च्या परीक्षेमध्ये भारतातून 558 रँक मिळवत घवघवीत यश प्राप्त केले आहे. हे यश त्यांना पहिल्यांदा मिळाले नाही तर त्यांनी तब्बल 5 वेळा UPSC क्रॅक केली आहे. यंदा तर त्यांनी उर्दू भाषेतून यूपीएससी परीक्षा दिली. आश्चर्य म्हणजे उर्दू भाषेतून UPSC परीक्षेत ते एकमेव विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.
केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत 2020 मध्ये घेण्यात आलेल्या मुलाखतीचा निकाल जाहीर करण्यात आला. यात धुळे शहरातील असीम खान या तरुणाने घवघवीत यश संपादन केले आहे. आसीम खान यांना पाचव्यांदा या परीक्षेत यश मिळाले असून त्यांच्या यशाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
यंदा उर्दू भाषेतून बाजी
सर्वात महत्वाचे म्हणजे असीम यांनी उर्दू माध्यमातून परीक्षा दिली आणि त्यातूनच त्यांनी यश मिळवले आहे. भारतातून उर्दू भाषेतून UPSC परीक्षेतून ते एकमेव विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. असीम यांनी हज कमिटी ऑफ इंडिया, मुंबईच्या IAS अॅकॅडमी मधून प्रशिक्षण घेतले होते. ते अत्यंत सामान्य कुटुंबातून येतात. त्यांच्या या यशामुळे अनेकांचे डोळे दिपलेत. धुळे जिल्ह्यातून त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.
घरची गरिबी, पण मेहनतीला तोड नाय!
उर्दू भाषेतून यूपीएससी परीक्षा देताना अनेक अडचणींचा सामना करावा लागला. उर्दू भाषेतील पुस्तके मिळण्यास प्रचंड अडचणी आल्या मात्र तरीही जिद्द आणि चिकाटी कायम ठेवत अभ्यास सातत्याने सुरू ठेवला, अपयशातून धडा घेत हे यश मिळाले असल्याचे आसीम खान यांनी टीव्ही 9 मराठीशी बोलताना सांगितले.
उर्दू भाषेतून UPSC देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी असीमडून 2 पुस्तकांचं लेखन
विशेष म्हणजे आसीम खान यांनी उर्दू भाषेतून यूपीएससी परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी 2 पुस्तके लिहिली आहेत. भविष्यात अजून यश मिळवण्यासाठी आपण प्रयत्नशील राहणार असल्याचे आसीम खान यांनी सांगितले.
(UPSC result Dhule Asim Khan Clear upsc Exam Got 558 Rank)
हे ही वाचा :
क्लास-बिसची भानगड नाय, बसल्या बैठकीला 10 तास अभ्यास, UPSC चं चक्र परळीच्या ‘अभिमन्यू’ने सहज भेदलं!