दोनदा UPSC Prelims फेल, तिसऱ्या प्रयत्नात सहावा रॅंक मिळविला

आयएएस होण्याचे तिचे स्वप्न होते, परंतू दोनदा अपयश आले. मग म्हणून तिने लाखभर पगाराची नोकरी सोडली आणि मनलावून अभ्यास सुरु करीत सहावा रॅंक मिळविला...

दोनदा UPSC Prelims फेल, तिसऱ्या प्रयत्नात सहावा रॅंक मिळविला
ias vishakha_yadavImage Credit source: socialmedia
Follow us
| Updated on: Aug 16, 2023 | 6:37 PM

नवी दिल्ली | 16 ऑगस्ट 2023 : युपीएसएसी सिव्हील परीक्षा एकाच प्रयत्नात क्रॅक करणे खूपच अवघड शिवधनुष्य असते. अनेक उमेदवारांना युपीएससीची परीक्षेत यश मिळविण्यासाठी खूपच वेळ आणि मेहनत लागते. त्या थकून काही जण हताश होत प्रयत्न सोडूनही देतात. परंतू एका तरुणीला युपीएससीत दोनदा प्रथम परीक्षेतच अपयश आले तरी तिने हार मानली नाही. परंतू तिसऱ्या प्रयत्नात तिने कमाल करीत केवळ यशस्वीच झाली नाही तर देशात सहावा क्रमांक मिळविला. आयएएस विशाखा यादव यांचा प्रेरणादायी प्रवास पाहूयात..

दिल्लीतील द्वारका परिसरात राहणाऱ्या विशाखा यादव यांचे शालेय शिक्षण दिल्लीत येथेच झाले. बारावीनंतर विशाखा यादव यांनी जेईई मुख्य परीक्षा पास करीत दिल्लीतील टेक्नॉलॉजी युनिव्हर्सिटीत ( डीटीयू ) प्रवेश घेतला. तेथून ग्रॅज्यूशन पूर्ण केले. आणि आयएएस होण्यासाठी  विशाखा यादव तयारी करु लागल्या, परंतू मार्ग कठीण होता.

लाखभर पगाराची नोकरी सोडली 

डीटीयूमधून ग्रॅज्यूएशन पूर्ण केल्यानंतर विशाखा यादव यांना चांगली नोकरी चालून आली. त्यामुळे तिने जॉब स्वीकारला. दोन वर्षे नोकरी केली. परंतू तिला सिव्हील सर्व्हीसमध्येच जाण्याचे स्वप्न खुणावत होते. मग तिने चांगला पगार असलेली नोकरी सोडली. आणि युपीएससीची तयारी सुरु केली.

तिसऱ्या प्रयत्नात यश मिळाले

आयएएस विशाखा यादव यांनी चांगली नोकरी सोडून संपूर्ण लक्ष केंद्रीत करीत युपीएससी परीक्षेची तयारी सुरु केली. परंतू हा प्रवास कठीण होता. मेहनत घेऊनही दोन वेळा युपीएससीची प्रिलियम परीक्षेतच अपयश आले. दोन्ही वेळा पहिल्या पायरीवरच अपयश आले. परंतू विशाखा यादव यांनी हिंमत हारली नाही. नव्या उमेदीने अभ्यास सुरु केला. अखेर तिसऱ्या प्रयत्नात यश मिळाले आणि विशाखा यादव देशभरातून सहाव्या रॅंकने युपीएससी उत्तीर्ण झाल्याने त्यांचे आयएएस बनण्याचे स्वप्न अखेर साकार झाले.

Non Stop LIVE Update
'या' दिग्गज नेत्यांचा दारूण पराभव, कोणाच्या जिव्हारी लागला निकाल?
'या' दिग्गज नेत्यांचा दारूण पराभव, कोणाच्या जिव्हारी लागला निकाल?.
..अन् मुसंडी, भाजप-महायुतीच्या यशाचं क्रेडिट फक्त फडणवीसांना कारण...
..अन् मुसंडी, भाजप-महायुतीच्या यशाचं क्रेडिट फक्त फडणवीसांना कारण....
माहिममध्ये अमित ठाकरे,सदा सरवणकर पराभूत; ठाकरे गटाच्या उमेदवाराची बाजी
माहिममध्ये अमित ठाकरे,सदा सरवणकर पराभूत; ठाकरे गटाच्या उमेदवाराची बाजी.
भावानं परळीचा गड राखला... धनंजय मुंडे म्हणाले, 'माझी बहीण पंकजा...'
भावानं परळीचा गड राखला... धनंजय मुंडे म्हणाले, 'माझी बहीण पंकजा...'.
महायुतीच्या विजयनानंतर एकनाथ शिंदे म्हणाले, ही तर लँडस्लाईड व्हिक्ट्री
महायुतीच्या विजयनानंतर एकनाथ शिंदे म्हणाले, ही तर लँडस्लाईड व्हिक्ट्री.
फडणवीस CM होणार? सलग तिसऱ्यांदा महाराष्ट्राच्या चाणाक्यावर मात अन्...
फडणवीस CM होणार? सलग तिसऱ्यांदा महाराष्ट्राच्या चाणाक्यावर मात अन्....
कणकवलीत भाजपचा जल्लोष, निलेश राणे म्हणाले, आता अल्लाहू अकबर नाही तर...
कणकवलीत भाजपचा जल्लोष, निलेश राणे म्हणाले, आता अल्लाहू अकबर नाही तर....
महाराष्ट्रात महायुतीची लाट नाही त्सुनामी, भाजपन स्वतःचा मोडला रेकॉर्ड
महाराष्ट्रात महायुतीची लाट नाही त्सुनामी, भाजपन स्वतःचा मोडला रेकॉर्ड.
लाडक्या बहिणी वनसाईड महायुतीच्या बाजूने, सत्तेच्या दिशेने वाटचाल
लाडक्या बहिणी वनसाईड महायुतीच्या बाजूने, सत्तेच्या दिशेने वाटचाल.
मलिक बाप-लेक पिछाडीवर,अणूशक्तीनगर-मानखुर्द शिवाजीनगरमध्ये कोण आघाडीवर?
मलिक बाप-लेक पिछाडीवर,अणूशक्तीनगर-मानखुर्द शिवाजीनगरमध्ये कोण आघाडीवर?.