१२ वी नंतर एकाच वेळेस मिळवा दोन डिग्र्या, कसे ? जाणून घ्या
विद्यार्थ्यांना त्यांच्या करिअरमध्ये वेगाने प्रगती करायची असेल तर ड्युअल डिग्री प्रोग्राम त्यांच्यासाठी अत्यंत फायदेशीर ठरू शकतो. यामुळे विद्यार्थी त्यांच्या भविष्याचा भक्कम पाया तयार करू शकतात.

आजकालच्या स्पर्धात्मक जगात एकाच वेळी दोन क्षेत्रांमध्ये शिक्षण घेणं हे आव्हानात्मक ठरू शकतं. पण, एकाच वेळी दोन वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये निपुणता मिळवणं हे विद्यार्थ्यांसाठी फायदेशीर ठरू शकतं. नुकतेच १० वी आणि १२ वीच्या बोर्ड परीक्षा संपल्या आहेत. येत्या काही दिवसांत या परीक्षांचे निकाल देखील लागतील. बारावी नंतर ‘काय करायचं?’ हा प्रश्न प्रत्येक विद्यार्थ्याला पडतो. या प्रश्नाचं उत्तर आम्ही तुम्हाला देणार आहोत.
१२ वी नंतर विद्यार्थ्यांसाठी एक उत्तम पर्याय म्हणजे ड्युअल डिग्री प्रोग्राम
या प्रोग्रामद्वारे विद्यार्थ्यांना एकाच वेळी दोन डिग्री मिळवता येतात. यामुळे त्यांचे ज्ञान आणि कौशल्य दोन्ही वाढतात आणि भविष्याच्या दृष्टिकोनातून त्यांना एक मजबूत व बहुआयामी करिअर मिळवण्याचा मार्ग खुला होतो.




ड्युअल डिग्री प्रोग्राम काय आहे?
देशातील आणि राज्यातील विविध विद्यापीठे अनेक ड्युअल डिग्री प्रोग्राम राबवतात. या प्रोग्रामद्वारे विद्यार्थ्यांना एकाच वेळी दोन वेगवेगळ्या क्षेत्रात शिक्षण घेऊन दोन डिग्री मिळवता येतात. उदाहरणार्थ, बीए आणि बीबीए अशा कॉम्बिनेशनमध्ये विद्यार्थी एकाच वेळी दोन्ही डिग्री मिळवू शकतात.
१२ वी नंतर ड्युअल डिग्रीचे पर्याय
ड्युअल डिग्री प्रोग्राममध्ये बीटेक + एमबीए, बीए + एलएलबी, बीटेक + एलएलबी, बीटेक + एमएस, बीई + एमई, बीएड + एमएड यासारख्या ड्युअल डिग्री कोर्सेस खूप लोकप्रिय झाले आहेत. या कोर्ससाठी प्रत्येक विद्यापीठाचे पात्रता निकष वेगवेगळे असतात. यामुळे योग्य निकष पूर्ण करणारे विद्यार्थी ड्युअल डिग्रीसाठी प्रवेश घेऊ शकतात.
ड्युअल डिग्री प्रोग्राम डीग्रीचा फायदा
ड्युअल डिग्री केल्यामुळे विद्यार्थ्यांना अनेक फायदे मिळतात. एकाच वेळी अंडरग्रॅज्युएट (UG) आणि पोस्टग्रॅज्युएट (PG) डिग्री मिळवता येतात. यामुळे विद्यार्थ्यांचा वेळ आणि पैसा वाचतो. साधारणतः ड्युअल डिग्री प्रोग्राम ४ ते ५ वर्षांत पूर्ण होतो, ज्यामुळे विद्यार्थ्यांना लवकर करियरमध्ये पुढे जाण्याची संधी मिळते.
शिक्षण पूर्ण झाल्यावर विद्यार्थ्यांना चांगल्या नोकरीच्या संधी मिळवणं महत्वाचं असतं. ड्युअल डिग्री प्रोग्राम विद्यार्थ्यांना उत्तम नोकरीच्या संधी देऊ शकतो. या प्रोग्राममध्ये विद्यार्थ्यांना एकदाच प्रवेश प्रक्रियेला सामोरे जावे लागते, ज्यामुळे संपूर्ण प्रक्रिया सोयीस्कर आणि जलद होते.
ड्युअल डिग्री प्रोग्राममध्ये प्रवेश कसा घ्यावा?
ड्युअल डिग्री प्रोग्राममध्ये विद्यार्थी ऑनलाइन, ऑफलाइन किंवा ओपन अँड डिस्टन्स लर्निंग (ODL) मोडमध्ये कोर्स करू शकतात. या प्रोग्राममध्ये प्रवेश घेण्यासाठी विद्यार्थ्यांना संबंधित विद्यापीठाच्या वेबसाईटवर जाऊन अर्ज करावा लागतो. प्रत्येक विद्यापीठाचे पात्रता निकष वेगवेगळे असू शकतात, त्यामुळे योग्य माहिती घेणं महत्त्वाचं आहे.
UGC मान्यता
सर्वांत महत्त्वाचं म्हणजे, हा कोर्स UGC (युनिव्हर्सिटी ग्रांट्स कमिशन) कडून मान्यता प्राप्त असावा लागतो. ड्युअल डिग्री प्रोग्रामचा अभ्यासक्रम बॅचलर्स आणि मास्टर डिग्रीसाठी समायोजित केला जातो. यामुळे विद्यार्थ्यांना दोन्ही डिग्री एकाच वेळी मिळवता येतात. विद्यार्थ्यांना त्यांच्या करिअरमध्ये वेगाने प्रगती करायची असेल तर ड्युअल डिग्री प्रोग्राम त्यांच्यासाठी अत्यंत फायदेशीर ठरू शकतो. यामुळे विद्यार्थी त्यांच्या भविष्याचा भक्कम पाया तयार करू शकतात.