NEET UG 2022 Exam Date: नीट युजी 2022 परीक्षा नेमकी कधी होणार? याचिकेवर न्यायालय काय म्हणालं वाचा…

| Updated on: Jul 15, 2022 | 3:21 PM

NEET UG 2022: उत्तर प्रदेश, आसाम, झारखंड, तेलंगणा, केरळ, बिहार, हरियाणा, हिमाचल प्रदेश आणि महाराष्ट्र राज्यातील 15 विद्यार्थ्यांनी दिल्ली उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती.

NEET UG 2022 Exam Date: नीट युजी 2022 परीक्षा नेमकी कधी होणार? याचिकेवर न्यायालय काय म्हणालं वाचा...
NEET PG Counselling
Image Credit source: Social Media
Follow us on

NEET UG 2022: शुक्रवार, 17 जुलै रोजी होणारी NEET UG 2022 (NEET UG 2022) परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी करणाऱ्या याचिकांवर विचार करण्यास दिल्ली उच्च न्यायालयाने नकार दिला आहे. न्यायमूर्ती संजीव नरुला यांनी नीट यूजीला (NEET UG) स्थगित करण्याची मागणी करणारी याचिका “निराधार आणि अपात्र” असल्याचे म्हटले आहे. बार अँड बेंचच्या अहवालानुसार, ‘अशा याचिका दाखल झाल्या तर न्यायालय (Court) दंड आकारण्यास अजिबात मागेपुढे पाहणार नाही,’ असे न्यायमूर्तींनी म्हटले आहे. “मी याचिकाकर्त्याच्या विरोधात आदेश देण्यास तयार होतो, परंतु ते विद्यार्थी आहेत, म्हणून आम्ही कोणतीही कठोर पावले उचलत नाही,” असं न्यायमूर्ती संजीव नरुला म्हणाले. एनटीएचे प्रतिनिधित्व करणाऱ्या वकिलाने असा युक्तिवाद केला की, “जर परीक्षा एक दिवस उशीरा झाली तर त्याचे बरेच नुकसान होऊ शकते”. उत्तर प्रदेश, आसाम, झारखंड, तेलंगणा, केरळ, बिहार, हरियाणा, हिमाचल प्रदेश आणि महाराष्ट्र राज्यातील 15 विद्यार्थ्यांनी दिल्ली उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती.

 नीट, जेईई आणि सीयूईटी परीक्षांच्या तारखा आसपास

देशातील 497 शहरांमध्ये आणि परदेशात 14 ठिकाणी होणाऱ्या नीट यूजी 2022 परीक्षेसाठी यंदा 18 लाखांहून अधिक विद्यार्थ्यांनी अर्ज केले आहेत. याचिकाकर्त्यांनी एनईईटी यूजी 2022 चार ते सहा आठवड्यांसाठी पुढे ढकलण्याची मागणी केली होती. ते म्हणाले की, राष्ट्रीय स्तरावरील परीक्षा जसे की नीट, जेईई आणि सीयूईटी परीक्षांच्या तारखा आसपास जाहीर करण्यात आल्या आहेत, ज्यामुळे विद्यार्थ्यांना मोठ्या प्रमाणात मानसिक समस्यांमधून जावं लागतंय. परीक्षेच्या तणावामुळे 16 तरुण विद्यार्थ्यांनी आत्महत्या करून आपल्या कुटुंबाला निराशेच्या गर्तेत लोटले.

हे सुद्धा वाचा

नीट यूजी 2022 ही परीक्षा रविवार, 17 जुलै रोजी होणार

नीट युजी 2022 परीक्षा ठरलेल्या तारखेलाच म्हणजे 17 जुलैलाच घेण्यात येणार आहे असं न्यायालयानं म्हटलंय. एनटीए एनईईटी neet.nta.nic.in अधिकृत वेबसाइटवर जाऊन विद्यार्थी आपले प्रवेशपत्र डाउनलोड करू शकतात. प्रवेशपत्र डाउनलोड करण्यासाठी विद्यार्थ्यांना त्यांचे लॉगिन आयडी आणि पासवर्डची आवश्यकता असेल. प्रवेशपत्र डाउनलोड केल्यास ते चेक करून घ्यावं.