पुणे : महाराष्ट्र राज्य उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेचा निकाल लागला आहे. दहावी बोर्डाचा निकाल मागील वर्षापेक्षा कमी लागला आहे. राज्यातील इयत्ता दहावीचा निकाल 93.83 टक्के लागला आहे. यंदाही निकालात मुलींनीच बाजी मारली आहे. मुलींचा निकाल 95.87% लागला आहे. तर मुलांचा निकाल 92.5% लागला आहे. आता निकालानंतर काय करता येणार, कोणत्या अभ्यासक्रमाला प्रवेश घ्यावा, ही सर्व माहिती एका चार्टमधून तुम्हाला मिळणार आहे.
राज्यात 15 लाख 29 हजार 96 इतक्या विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती. 14 लाख 34 हजार 898 इतके विद्यार्थी उत्तीर्ण झाले. ही परीक्षा राज्यभरातील 5033 परीक्षा केंद्रावर पार पडली होती.
कोणती अभ्यासक्रम आहेत उपलब्ध
दहावीचा निकाल जाहीर झाल्यानंतर आता प्रवेश प्रक्रिया सुरु होणार आहे. विद्यार्थ्यांना कला, वाणिज्य आणि विज्ञान या शाखांना प्रवेश घेता येईल. तसेच पारंपारिक विद्याशाखांसोबत वेगळी वाटही निवडता येईल. अभियांत्रिकी डिप्लोमा प्रवेश घेऊन पुढे बीईसुद्धा करता येईल. आयटीआय शाखेला प्रवेश घेऊन कौशल्य विकासासंदर्भात रोजगार मिळवता येईल. तसेच स्वत:चा छोटा उद्योगही सुरु करता येणार आहे.
बारावीनंतर अनेक संधी
विद्यार्थ्यांनी बारावीपर्यंतचं शिक्षण वाणिज्या शाखेतून घेतल्यानंतर पुढं देखील वाणिज्य शाखेची निवड करणं त्यांच्या करिअरसाठी महत्वाचं ठरु शकतं. बारावीनंतर विद्यार्थी फायनान्स, अकाऊंटिंग, टॅक्सेशन, ऑडिटींग, गुंतवणूक क्षेत्र, विमा क्षेत्र, बँक असं मोठं क्षेत्र वाणिज्य शाखेच्या विद्यार्थ्यांसाठी खुलं आहे.
भारतात गेल्या काही वर्षांपासून पर्यटन आणि हॉस्पिटलिटीसह हॉटेल इंडस्ट्री वाढत आहे. यामुळे हॉटेल मॅनेजमेंट आणि हॉस्पिटलटी क्षेत्र सातत्यानं वाढत असल्यानं या क्षेत्रात करिअरच्या चागंल्या पगाराच्या संधी निर्माण होत आहेत. देश सेवेसाठी इच्छूक असणारे तरुण 12 वी किंवा ग्रॅज्युएशननंतर सैन्यदलात दाखल होऊन देशसेवा करु शकतात, असे विविध अभ्यासक्रम उपलब्ध आहेत.
यंदा नागपूरचा सर्वाधिक कमी निकाल
मार्चमध्ये इयत्ता दहावीची परीक्षा पार पडली होती. या परीक्षेला 15 लाख 29 हजार 96 विद्यार्थी बसले होते. त्यातील 14 लाख 34 हजार 898 इतके विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. इयत्ता दहावीच्या निकालात नागपूर विभागाचा सर्वात कमी म्हणजे 92.49 टक्के निकाल लागला आहे. तर कोकण विभागाने 98.11 टक्के निकाल लागला आहे.