भारताच्या 14 जुलैच्या चंद्रयान-3 मोहीमेचे ब्रेन कोण ? आयआयटी मद्रासचे पी.वीरामुथुवेल
माझ्या मुलाला केंद्र सरकारच्या अनेक विभागातून नोकरीच्या संधी आल्या होत्या, त्याने त्या नाकारल्या. साल 2014 रोजी त्याची इस्रोचे शास्रज्ञ म्हणून निवड झाल्याने त्याचे स्वप्न अखेर सत्यात उतरले असे त्यांचे वडील पी. पलानिवेल यांनी सांगितले.
मुंबई : भारताची चंद्रयान – 3 चंद्रावर 14 जुलैला चंद्रावर स्वारी करण्यासाठी सज्ज झाले आहे. साल 2019 च्या 7 सप्टेंबरला चंद्रयान – 2 मोहिमेला गालबोट लागले होते. लॅंडरची सॉफ्ट लॅंडींग न झाल्याने अख्ख्या भारताला चुटपूट लागली होती. मात्र, या अपयशातून धडा घेत पुन्हा नव्या जोमाने 14 जुलै रोजी चंद्रयान-3 प्रक्षेपकासह आंध्रप्रदेशातील श्रीहरीकोट्टा येथील सतिश धवन केंद्रातून उड्डाण घेणार आहे. या मोहीमेच्या मागे एका व्यक्तीचे योगदान मोठे आहे. ती व्यक्ती म्हणजे इस्रोचे संशोधक पी.वीरामुथुवेल होय..
भारतीय अवकाश संशोधन संस्थेच्या ( इस्रो ) चंद्रयान – 3 या मोहिमेचे काऊंट डाऊन सुरु झाले आहे. 14 जुलै रोजी दुपारी भारताच्या चंद्रयान – 3 चे उड्डाण होणार आहे. मात्र या मिशन मागे असलेल्या सायंटीस्ट पी.वीरामुथुवेल यांचे योगदान खूप महत्वाचे आहे. ही मोहीमच त्यांचे ब्रेन चाईल्ड म्हणून ओळखले जाते.
तामिळनाडूच्या विल्लुपूरम
तामिळनाडूच्या विल्लुपूरम हे इस्रो सायंटीस्ट वीरामुथुवेल यांचे गाव आहे. त्यांनी विल्लुपूरमच्या रेल्वे स्कूलमध्ये त्यांचे शालेय शिक्षण झाले आहे. त्यांनी एका खाजगी पॉलिटेक्निकमधून मॅकेनिकल इंजिनिअरिंगमध्ये डिप्लोमा केला. इंजिनिअरिंगमध्ये पदवी एका खाजगी कॉलेजातून घेतली. अन्य एका खाजगी विद्यापीठातून पदवीत्तर शिक्षण घेतले.
विविध विभागातील नोकरीच्या संधी होत्या
त्यानंतर पीएचडीसाठी त्यांनी आयआयटी मद्रासमध्ये प्रवेश घेतला. त्यांचे वडील पी. पलानिवेल यांनी सांगितले की आपल्या मुलाला केंद्र सरकारच्या अनेक विभागातून नोकरीच्या संधी आल्या, परंतू त्याने त्या नाकारल्या. साल 2014 रोजी त्याची इस्रोच्या शास्रज्ञ म्हणून त्यांची निवड झाल्याने त्याचे स्वप्न अखेर सत्यात उतरले.
अशी झाली नियुक्ती
चांद्रयान-3 चे प्रोजेक्ट डायरेक्टर म्हणून त्यांची मेहनत आहे. चांद्रयान-2 मोहीमेत लॅंडरची सॉफ्ट लॅंडींग अयशस्वी झाल्यानंतर चांद्रयान मोहीमेच्या संचालक एम.वनिथा यांच्यानंतर त्यांची येथे नियुक्ती झाली. चांद्रयान-3 च्या प्रकल्पाचे प्रमुख असलेले वीरामुथुवेल यांनी चांद्रयान-2 मध्येही महत्वाची भूमिका होती. ही मोहिमे अवघ्या काही इंचांनी लॅंडींग फसल्याने यशाच्या उच्चांकावर पोहचली नसली तरी 95 टक्क्यांहून अधिक यशस्वी झाली होती. तिच्यासाठी अमेरिकन अंतराळ संशोधन संस्था नासा आणि संशोधकांशी समन्वय करण्याचे काम त्यांनी केले होते.
चांद्रयान -2 चे गालबोट
22 जुलै 2019 रोजी सतिश धवन स्पेस सेंटरहून भारताची दुसरी चंद्रावरील मोहीम चांद्रयान -2 च्या रॉकेटचे प्रक्षेपण झाले होते. परंतू 6 सप्टेंबर रोजी पहाटे विक्रम लुनार लॅंडर चंद्राच्या पृष्टभागाला पोहचण्यासाठी अवघे काही अंतर शिल्लक असताना क्रॅश होऊन या मोहीमेला गालबोट लागले होते.
14 दिवसांचे मिशन
भारतीय अंतराळ विभागाचे सचिव आणि इस्रोचे चेअरमन सोमनाथ एस. यांनी सांगितले की चांद्रयान – 3 रॉकेटने प्रक्षेपण जरी 14 जुलै रोजी होणार असले तरी प्रत्यक्षात पृथ्वीपासून चंद्रावर यान पोहचण्यास वेळ लागणार असून 23 किंवा 24 ऑगस्ट रोजी सॉफ्ट लॅंडींगची योजना आहे. एक चंद्र दिवस इतके लॅंडरचे मिशन लाईफ असणार आहे. चंद्राचा एक दिवस म्हणजे पृथ्वीचे 14 दिवस असल्याने हे मिशन तितक्या दिवसांचे आहे.