राम शिंदेंनी रोहित पवारांना दिलं खुलं चॅलेंज… म्हंटले मी राजीनामा द्यायला तयार पण…

राम शिंदे हे आमदार झाले असले तरी त्यांनी आमदार रोहित पवार यांना राजीनामा देऊन निवडणुकीला सामोरे जा असं खुलं चॅलेंज केले आहे.

राम शिंदेंनी रोहित पवारांना दिलं खुलं चॅलेंज... म्हंटले मी राजीनामा द्यायला तयार पण...
Image Credit source: FACEBOOK
Follow us
| Updated on: Sep 30, 2022 | 6:25 PM

कुणाल जायकर, प्रतिनिधी, टीव्ही 9 मराठी, अहमदनगर : विधानसभा निवडणूक 2019 मध्ये सर्वाधिक चर्चेच्या निवडणुकींमध्ये एक निवडणूक होती ती म्हणजे कर्जत-जामखेड (Karjat-Jamkhed) मतदारसंघाची निवडणूक. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा असलेले शरद पवार यांचे नातू रोहित पवार आणि सलग दोन टर्म आमदार असलेले प्रा. राम शिंदे (Ram Shinde) यांच्यात ही लढत झाली होती. संपूर्ण राज्याचे या लढतीकडे लक्ष लागलेले होते. या निवडणुकीत रोहित पवार (Rohit Pawar) यांनी बाजी मारली होती. खरंतर रोहित पवार यांना विधानसभा निवडणूक लढायची होती मात्र, बारामती मतदार संघातून अजित पवार आमदार होत असतात त्यामुळे रोहित पवार यांनी कर्जत-जामखेड हा मतदार संघ निवडला होता. त्यामुळे त्यांच्यावर मोठी टीका देखील झाली होती. तरी देखील रोहित पवार यांनी विजय मिळवत आमदार होण्याचा मान मिळवला होता.

प्रा. राम शिंदे यांचा पराभव झाल्यानंतर त्यांना विधानपरिषदेवर आमदार म्हणून घ्यावे अशी मागणी होत होती. तीनवर्षानंतर भाजपने त्यांना विधानपरिषद सदस्य म्हणून पाठविले आहे.

राम शिंदे हे आमदार झाले असले तरी त्यांनी आमदार रोहित पवार यांना राजीनामा देऊन निवडणुकीला सामोरे जा असं खुलं चॅलेंज केले आहे.

आमदार रोहित पवारांनी राजनामा दिलाच तर मी राजीनामा देऊन रणांगणात उतरलोच समजा असे राम शिंदे यांनी म्हंटलंय.

भारतीय घटनेच्या नियमानुसार विधान परिषद सदस्य हा सदस्यातुन निवडून येतो तर लोकांमधून निवडून आलेला विधानसभा सदस्य असतो.

त्यामुळे विधानसभा सदस्यांनी राजीनामा दिल्याशिवाय निवडणूक लागत नाही, राजीनामा देऊन चालत नाही असे म्हणत पवारांनी राजीनामा देण्याची मागणीच शिंदे यांनी केली आहे.

विधानसभा सदस्यांनी राजीनामा दिला तर मी निवडणुकीला तयार आहे असे म्हणत राम शिंदे यांनी खुलं चॅलेंज दिले आहे.

रोहित पवारांनी राजीनामा दिला की, की मी राजीनामा देऊन रणांगणात उतरलोच तोपर्यंत मी बारामतीचा प्रभारी असल्याचे शिंदे म्हणाले आहे.

शिंदे यांच्या या आवाहनावर आता रोहित पवारांची प्रतिक्रिया काय येते याकडे कर्जत-जामखेड मतदार संघातील नागरिकांचे लक्ष लागून आहे.

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.