Election Result 2022 Live : निवडणूक निकालानंतर दिल्लीतल्या घडामोडींना वेग, काँग्रेस बैठक बोलवणार

| Updated on: Mar 10, 2022 | 9:22 PM

UP, Punjab, Uttarakhand, Goa and Manipur Vidhan Sabha Election 2022 LIVE Updates : येत्या 10 मार्चला सकाळी 10 वाजल्यापासून (10 March Election result) या निवडणुकांच्या निकालाला सुरूवात होणार आहे. उत्तर प्रदेश, पंजाब, गोवा, उत्तराखंड आणि मणिपूर या पाच राज्यांचा यात समावेश आहे.

Election Result 2022 Live :  निवडणूक निकालानंतर दिल्लीतल्या घडामोडींना वेग, काँग्रेस बैठक बोलवणार

नवी दिल्ली : देशात सध्या एकच मुद्दा चर्चेत आहे तो म्हणजे पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुका (Five State Election result) पाचही राज्यात निवडणुकांचे मतदान पार पडले आहे. एक्झिट पोलही आले (Election Exit Poll) आहेत. आता प्रतीक्षा आहे फक्त निवडणूक निकालाची. उद्या म्हणजेच बुधवार 10 मार्चला सकाळी 10 वाजल्यापासून (10 March Election result) या निवडणुकांच्या निकालाला सुरूवात होणार आहे. याच्या वेगवान अपडेट आम्ही तुम्हाला टीव्ही 9 मराठी वर दाखवणार आहोत. उत्तर प्रदेश, पंजाब, गोवा, उत्तराखंड आणि मणिपूर या पाच राज्यांचा यात समावेश आहे. पाच पैकी चार राज्यात सध्या भाजपची सत्ता आहे. मात्र समोर आलेल्या एक्झिट बोलमधून भाजपला मोठा झटका बसणार, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. त्यामुळे या निकालाची उत्सुकता आणखी वाढली आहे. एक्झिट पोलच्या अंदाजानुसार भाजपला उत्तर प्रदेश आणि मणिपूरमध्ये पुन्हा सत्ता मिळताना दिसतेय. तर गोवा आणि उत्तराखंड ही राज्यं भाजप गमावण्याची शक्यता एक्झिट पोलने वर्तवली आहे. त्यामुळे या निकालाकडे साऱ्या देशाचे लक्ष लागले आहे. या पाच राज्यांना मिनी लोकसभा म्हटले जाते. त्यामुळे निकालाला विशेष महत्व प्राप्त झाले आहे.

LIVE NEWS & UPDATES

The liveblog has ended.
  • 10 Mar 2022 07:18 PM (IST)

    उत्तराखंड-39 जागांचे निकाल जाहीर झाले

    निवडणूक आयोगाने आतापर्यंत 39 जागांचे निकाल जाहीर केले आहेत. त्यानुसार बसपा 1, भाजप 27 आणि 11 जागांवर अपक्ष उमेदवार विजयी झाले आहेत.

  • 10 Mar 2022 07:13 PM (IST)

    निकालनंतर ओवैसी काय म्हणाले?

    AIMIM प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांनी निवडणूक निकालांबद्दल प्रतिक्रिया दिली आहे.

    यूपीच्या जनतेने भाजपला सत्ता देण्याचा निर्णय घेतला आहे. जनतेचा निर्णय मला मान्य आहे. AIMIM चे प्रदेशाध्यक्ष, कार्यकर्ते, सदस्य आणि ज्या लोकांनी आम्हाला मतदान केले त्यांचे मी आभार मानतो. आम्ही खूप प्रयत्न केले पण आमच्या अपेक्षेप्रमाणे निकाल लागला नाही. आगामी काळात आम्ही पक्षवाढीसाठी काम करू-ओवैसी

  • 10 Mar 2022 06:30 PM (IST)

    पंजाब-AAP ने 103 पैकी 82 जागा जिंकल्या

    निवडणूक आयोगाने जारी केलेल्या आकडेवारीनुसार पंजाबमधील 117 जागांपैकी 103 जागांचे निकाल जाहीर झाले आहेत. घोषित 103 जागांमध्ये आम आदमी पार्टीने 82 जागा जिंकल्या आहेत तर 10 वर आघाडीवर आहे. सत्ताधारी काँग्रेसने 14 तर भाजपने 2 जागा जिंकल्या आहेत. बहुजन समाज पक्षाने 1 जागा जिंकली. 3 जागा अकाली दलाच्या खात्यात गेल्या.

  • 10 Mar 2022 05:22 PM (IST)

    भाजप मुख्यालयात जल्लोष साजरा

    उत्तरखंडमध्ये भाजपला मोठा विजय प्राप्त झाला आहे. त्यामुळे भाजपच्या मुख्यालयात भाजप नेते जल्लोष साजरा करत आहेत.

  • 10 Mar 2022 05:19 PM (IST)

    लवकरच सोनिया गांधींची बैठक

    काँग्रेस नेते रणदीप सुरजेवाला यांनी निवडणुकीतील पराभवावर प्रतिक्रिया व्यक्त केलीय. काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी लवकरच काँग्रेस कार्यकारिणीची बैठक बोलावून या सर्व पराभवाची कारणे आणि सर्वसमावेशक विचारमंथन करण्याचा निर्णय घेतला आहे. अशी माहिती त्यांनी दिली आहे, तसेच आम आदमी पार्टीचेही अभिनंदन केले आहे.

  • 10 Mar 2022 04:12 PM (IST)

    चन्नी यांनी हार स्वीकारली

    आज लागलेल्या निवडणूक निकालात काँग्रेसच्या बड्या नेत्यांना झटका बसला आहे. कारण यात पंजाबचे मुख्यमंत्री चरणजीतसिंग चन्नी यांचाही पराभव झाला आहे. त्यांनी हार स्वीकारल्याचे ट्विट केले आहे.

    I humbly accept the verdict of the people of Punjab and Congratulate @AamAadmiParty and their elected CM @BhagwantMann Ji for the victory. I hope they will deliver on the expections of people.

    — Charanjit S Channi (@CHARANJITCHANNI) March 10, 2022

  • 10 Mar 2022 03:53 PM (IST)

    आनंदपूर साहिबमधून आपच्या हरजोत सिंह बैंस विजयी

    पंजाबमध्ये आपने काँग्रेसला धोबीपछाड दिला आहे. पंजाबमध्ये आपची एकहाती सत्ता आलीये. आनंदपूर साहिब विधानसभा मतदारसंघातून आम आदमी पार्टीच्या हरजोत सिंह बैंस विजयी झाल्या आहेत.

  • 10 Mar 2022 03:38 PM (IST)

    उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांचा पराभव

    उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांचा धक्कादायकरित्या पराभव झाला आहे. धामी यांचा खटीमा विधानसभा मतदार संघातून पराभव झाला, एकीकडे उत्तराखंडमध्ये भाजपाला बहुमत मिळताना दिसून येत आहे. मात्र दुसरीकडे धामी यांच्या पराभवाचा धक्का देखील बसला आहे.

  • 10 Mar 2022 03:30 PM (IST)

    केजरीवाल लाईव्ह अपडेट

    आम्ही असा भारत बनवू की इथल्या विद्यार्थ्यांना युक्रेनमध्ये जाण्याची गरजच पडणार नाही – केजरीवाल

    सफाई कामगार, शेतमजून, नोकरदार वर्गानं चन्नी यांचा पराभव केला आहे.

    सिंद्धू यांचा पराभव करणारा आपचा एक साधा स्वयंसेवक होता.

    पंजाबमध्ये 75 वर्ष फक्त काँग्रेसनं नुकसान केलंय.

    इन्कलाबचं नाव आम आदमी पार्टी आहे.

    भगतसिंहांचं स्वप्न पूर्ण करणाऱ्यांचं नाव आम आदमी पार्टी आहे.

  • 10 Mar 2022 02:52 PM (IST)

    पंजाबचे मुख्यमंत्री चरणजीत चन्नी यांचा दोन्ही जागांवर पराभव

    पंजाबचे मुख्यमंत्री चरणजीत चन्नी यांनी दोन जागी निवडणूक लढवली होती. दोन्ही ठिकाणी त्यांचा पराभव झाला आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नवज्योतसिंग सिद्धू याचा देखील पराभव झाला. तर, शिरोमणी अकाली दलाचे पंजाबच्या सुखबीर सिंह बादल यांचा 13 हजार मतांनी पराभव झाला आहे. तर, प्रकाश बादल यांचा देखील पराभव झाला आहे. उत्तराखंडमध्ये काँग्रेसच्या हरिश रावत यांना पराभवाचा फटका बसलाय.

  • 10 Mar 2022 02:29 PM (IST)

    सुखबीर सिंग बादल पराभूत

    सुखबीर सिंग बादल यांना देखील पराभवाचा सामना करावा लागला आहे. सुखबीर सिंग बादल हे जलालाबाद मतदारसंघातून उभे होते, हा मतदारसंघ त्यांच्यासाठी अत्यंत सुरक्षित माणण्यात येत होता. मात्र तरी देखील आम आदमी पार्टीच्या उमेदवाराकडून सुखबीर सिंग बादल यांचा पराभाव झाला आहे.

  • 10 Mar 2022 02:20 PM (IST)

    काँग्रेस नेते हरिश रावत यांचा पराभव

    माजी मुख्यमंत्री आणि कॉग्रेसचे उमेदवार हरिश रावत हे उत्तराखंडच्या लालकुआ मतदारसंघातून पराभूत झाले आहेत. हरिश रावत यांचा हा पराभव काँग्रेससाठी मोठा धक्का माणण्यात येत आहे. या मतदारसंघात भाजपा आणि काँग्रेसमध्ये चुरशीची लढत होती. अखेर या लढतीमध्ये हरिश रावत यांचा पराभव झाला आहे.

  • 10 Mar 2022 02:01 PM (IST)

    सरकारी कार्यालयात इथूनपुढे मुख्यमंत्र्यांची प्रतिमा लावण्यात येणार नाही – मान

    पंजाबमध्ये आपचा विजय मोठा विजय झाला आहे. हा काँग्रेससाठी मोठा धक्का माणण्यात येत आहे. दरम्यान इथून पुढे आता सरकारी कार्यालयात मुख्यमंत्र्यांची प्रतिमा लावण्यात येणार नसल्याचे मान यांनी सांगितले आहे. मान हे आपचे पंजाबमधील मुख्यमंत्री पदाचे उमेदवार आहेत. मान यांचे मुख्यमंत्रीपद आता जवळपास निश्चित माणण्यात येत आहे.

  • 10 Mar 2022 01:47 PM (IST)

    पंजाबच्या पठानकोटमधून भाजपाचे अश्वीनी कुमार शर्मा यांचा विजय

    पंजाबच्या पाठानकोटमधून भाजपाचे अश्वीनी कुमार शर्मा यांचा विजय झाला आहे. त्यांनी काँग्रेसचे उमेदवार अमित विज यांचा 7759 मतांनी पराभव केला.

  • 10 Mar 2022 01:30 PM (IST)

    पटियालामधून माजी मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांचा पराभव

    पंजाबमधून मोठी बातमी समोर येत आहे. पटियालामधून माजी मुख्यमंत्री अमरिंदर सिंग यांचा पराभव झाला आहे. आपचे उमेदवार अजित कोहली यांनी अमरिंदर सिंग याचा पराभव केला.

  • 10 Mar 2022 01:20 PM (IST)

    मणिपूरच्या वाबगई मतदारसंघातून भाजपाचे डॉ. उसम देबेन सिंह यांचा विजय 

    मणिपूरमध्ये भाजप सुरुवातीपासूनच आघाडीवर आहे. हाती आलेल्या निकालानुसार सध्या भाजप 19 जागांवर आघाडीवर असून, त्यांचा एक उमेदवार विजयी झाला आहे. मणिपूरच्या वाबगई मतदारसंघातून भाजपाचे डॉ. उसम देबेन सिंह यांचा विजय झाला आहे. तर दुसरीकडे तिपइमुख मतदारसंघातून जेडीयूचे नंगुसंगलुर सानाटे यांचा विजय झाला आहे.

  • 10 Mar 2022 01:17 PM (IST)

    आम्ही जनादेशाचा नम्रपणे स्वीकार करतो – सिद्धू

    पंजाबचा निकला जवळपास स्पष्ट झाला आहे. काँग्रेसला नाकारून जनतेने आपत्या मताचे दान ‘आप’च्या पारड्यात टाकले आहे. पंजाबमध्ये आपने स्पष्ट बहुमतानाकडे वाटचाल केली आहे. याचदरम्यान काँग्रेस नेते नवज्योत सिंग सिद्धू  यांनी एक ट्विट केले आहे. लोकांचा आवाज हा देवाचा आवाज असतो. जनता ही आमच्यासाठी देव आहे. आम्ही पंजाबचा जनादेश नम्रपणे स्वीकारतो. आपचे अभिनंदन असे ट्विट सिद्धू यांनी केले आहे.

  • 10 Mar 2022 12:45 PM (IST)

    पंजाबचे मुख्यमंत्री चरणजित सिंग चन्नी उद्या राजीनामा देणार

    मुख्यमंत्री चरणजित सिंग चन्नी यांनी बोलावली महत्त्वपूर्ण बैठक

    उद्या सकाळी 11 वाजता होणार बैठक

    चन्नी यांच्यासह संपूर्ण मंत्रिमंडळ उद्या राजीनामा देणार

    पंजाबमध्ये आम आदमी पार्टीला संपूर्ण बहुमत

  • 10 Mar 2022 12:42 PM (IST)

    उत्तराखंडमध्ये भाजप 42 तर काँग्रेस 24 जागांवर आघाडीवर

    उत्तराखंडमध्ये पुन्हा एकदा भाजपाचेच सरकार येणार असल्याचे जवळपास निश्चित झाले आहे. उत्तराखंडमध्ये भाजपाने 42 तर काँग्रेस 24 जागांवर आघाडीवर आहे.

  • 10 Mar 2022 12:20 PM (IST)

    अरविंद केजरीवालांनी मानले पंजाबच्या जनतेचे आभार

    अरविंद केजरीवाल यांनी पंजाबच्या जनतेचे आभार मानले असून, ते आज दुपारी दोन वाजता संवाद साधणार आहेत.

  • 10 Mar 2022 12:04 PM (IST)

    मणिपूरमध्ये भाजपाची 24 जागांवर आघाडी

    उत्तरप्रदेश, गोवा, उत्तराखंड पाठोपाठ मणिपूरमध्ये देखील भाजपाची सरशी होताना दिसून येत आहे. तब्बल 24 जागांवर भाजपाचे उमेदवार आघाडीवर आहेत. तर काँग्रेसचे उमदेवार 11 जाग्यांवर आघाडीवर आहे. विशेष म्हणजे यावेळी अपक्ष उमेदवारा देखील मोठ्या संख्येने आघाडीवर आहे. राज्यात तब्बल 9 अपक्ष उमदेवारांनी आघाडी घेतली आहे.

  • 10 Mar 2022 11:53 AM (IST)

    शिरोमणी अकाली दलाचे प्रकाश सिंग बादल पिछाडीवर

    हाती आलेले निवडणुकीच्या निकालानुसार शिरोमणी अकाली दलाचे प्रकाश सिंग बादल हे पंजाबमधून पिछाडीवर आहेत. यंदाची विधानसभा निवडणूक जिंकायची आणि मानाने राजकारणातून निवृत्त व्हायचे अशी घोषणा त्यांनी केली होती. मात्र सध्या तर प्रकाश सिंग बादल हे पिछाडीवर असल्याचे समोर येत आहे.

  • 10 Mar 2022 11:39 AM (IST)

    पंजाबमध्ये दिगज्जांना धक्का चन्नी, सिद्धू पिछाडीवर

    पंजाबमध्ये दिगज्जांना धक्का बसला असून, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री चन्नी हे दोनही जागेवरून पिछाडीवर आहेत. तर नवज्योत सिंग सिद्धू  हे अमृतसहमधून पिछाडीवर आहेत.

  • 10 Mar 2022 11:34 AM (IST)

    उत्ताराखंडमध्ये भाजपाची 44 तर काँग्रेसची 22 जागांवर आघाडी

    उत्तराखंडमध्ये भाजपाने बाजी मारलीये, काँग्रेसच्या जवळपास दुप्पट म्हणजे 44 जागांवर भाजपाचे उमेदवार आघाडीवर आहेत. तर काँग्रेसचे 22 जागांवर उमेदवार आघाडीवर आहे. बसवाच्या एकाही उमेदवाराला आघाडी मिळवता आलेली नाही. तर दुरसरीकडे दोन जागांवर अपक्ष उमेदवार आघाडीवर आहेत.

  • 10 Mar 2022 11:28 AM (IST)

    पंजाबमधील जनतेची आपला पसंती, काँग्रेसची पिछेहाट

    पंजाबमधील जनतेने यावेळी काँग्रेसला नाकारले आहे. पंजाबमध्ये केजरीवाल आणि आपच्या स्थानिक नेतृत्वाची जादू चालली असल्याचे दिसून येत आहे. पंजाबमध्ये तब्बल 87 जागांवर आपच्या उमेदवारांनी आघाडी घेतली आहे. तर अवघ्या 14 जागांवर काँग्रेस आघाडीवर आहे.

  • 10 Mar 2022 11:21 AM (IST)

    उत्तराखंडमधून रावत पिछाडीवर

    उत्तराखंडमधून महत्त्वाची बातमी हाती येत आहे. उत्तराखंडमधून हरिश रावत पिछाडीवर आहेत. हरिश रावत तब्बल आठ हजार मतांनी पिछाडीवर आहेत.

  • 10 Mar 2022 11:17 AM (IST)

    मणिपूरमध्ये भाजपाची सरशी, काँग्रेसची पिछेहाट

    निवडणूक आयोगाकडून प्राप्त झालेल्या माहितीनुसार मणिपूरमध्ये भाजपाने 19 जागांवर आघाडी घेतली आहे. तर काँग्रेसची पिछेहाट झाली असून, काँग्रेसचे उमेदवार अवघ्या तीन जागांवर आघाडीवर आहेत.

  • 10 Mar 2022 11:08 AM (IST)

    उत्तराखंड निवडणूक निकाल

    दल का नाम विजयी आघाडी एकूण
    बहुजन समाज पार्टी 0 2 2
    भारतीय जनता पार्टी 0 44 44
    अपक्ष 0 2 2
    काँग्रेस 0 21 21
    एकूण 0 69 69
  • 10 Mar 2022 10:34 AM (IST)

    उत्तराखंडमध्ये भाजपाची निर्णायक आघाडीकडे वाटचाल

    पक्ष विजयी आघाडी एकूण
    बहुजन समाज पार्टी 0 2 2
    भारतीय जनता पार्टी 0 39 39
    अपक्ष 0 2 2
    काँग्रेस 0 17 17
    एकूण 0 60 60
  • 10 Mar 2022 10:30 AM (IST)

    मणिपूरमध्ये भाजपाची आघाडी

    पक्ष विजयी आघाडी एकूण
    भाजपा 0 13 13
    अपक्ष 0 1 1
    काँग्रेस 0 5 5
    जदयू 0 4 4
    कुकी पिपल्स अलायन्स 0 1 1
    नागा पीपल्स फ्रंट 0 4 4
    नॅशनल पीपल्स फ्रंट 0 4 4
    रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) 0 1 1
    एकूण 0 33 33
  • 10 Mar 2022 10:24 AM (IST)

    पंजाबमध्ये आपची 88 जागांवर आघाडी

    पक्ष  विजयी आघाडी एकूण
    आम आदमी पार्टी 0 88 88
    बहुजन समाज पार्टी 0 2 2
    भारतीय जनता पार्टी 0 5 5
    अपक्ष 0 1 1
    कँग्रेस 0 13 13
    शिरोमणि अकाली दल 0 8 8
    एकूण 0 117 117
  • 10 Mar 2022 10:21 AM (IST)

    उत्तराखंडमध्ये भाजप 30 जागांवर आघाडीवर

    निवडणूक आयोगाकडून प्राप्त माहितीनुसार उत्तराखंडमध्ये भाजप 30 जागांवर,  बसप 2, कँग्रेस 19, अपक्ष 1 तर उत्तराखण्ड जन एकता पार्टी 1 जागेवर अघाडीवर आहे.

  • 10 Mar 2022 10:15 AM (IST)

    पंजाबमध्ये आपच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण

    पंजाबमध्ये आपची बहुमताकडे वाटचाल सुरू असल्याचे दिसून येत आहे. तब्बल 87 जागांवर आपने आघाडी घेतली आहे. काँग्रेसची पिछेहाट झाली असून, आपच्या कार्यकर्यांमध्ये जल्लोषाचे , उत्साहाचे वातावरण आहे.

  • 10 Mar 2022 10:12 AM (IST)

    मणिपूरमध्ये भाजपची आघाडी

    मणिपूरमध्ये पुन्हा एकदा भाजप सत्ते येणार असल्याचे संकेत मिळत आहे. आतापर्यंत हाती आलेल्या निकालानुसार राज्यात भाजपाचे उमेदवार 22, काँग्रेस 14, एनपीपीचे 10 तर अपक्ष उमेदवार 10 जागांवर आघाडीवर आहेत.

  • 10 Mar 2022 10:07 AM (IST)

    पंजाबमध्ये आप काँग्रेसची पिछेहाट

    पंजाबमधील जनतेने आपला कौल दिल्याचे स्पष्ट झाले आहे. तब्बल 88 जागांवर आपच्या उमेदवारांनी आघाडी घेतली आहे, तर काँग्रेसची पिछेहाट झाली असून, अवघ्या 18 जागांवर काँग्रेसचे उमेदवार आघाडीवर आहे. अकाली दलाने सात जागांवर आघाडी घेतली आहे.

  • 10 Mar 2022 10:00 AM (IST)

    उत्तराखंडमध्ये भाजपची 39 जागांवर आघाडी, काँग्रेसची पिछेहाट

    उत्तराखंडमध्ये भाजपाने निर्णायक आघाडीच्या दिशेने वाटचाल सुरू केल्याचे दिसत असून, आतापर्यंत हाती आलेल्या निकालानुसार भाजपा उमेदवारांनी तब्बल 39 जागांवर आघाडी घेतली आहे. तर दुसरीकडे काँग्रेसची पिछेहाट झाली असून काँग्रेस 25 जागांवर आघाडीवर आहे. आपच्या उमेदवाराला अद्याप आघाडी घेता आलेली नाही. अपक्ष दोन जागांवर आघाडीवर आहेत.

  • 10 Mar 2022 09:53 AM (IST)

    मणिपूरमध्ये भाजपाची विजयाच्या दिशेने वाटचाल

    मणिपूरमध्ये भाजपाची सरशी होताना दिसून येत आहे. मणिपूरमध्ये भाजपाने तब्बल 25 जागांवर आघाडी घेतली आहे. तर काँग्रेस 14 आणि अपक्ष उमेदवार 10 जागांवर आघाडीवर आहेत.

  • 10 Mar 2022 09:48 AM (IST)

    पंजाबमध्ये आपची निर्णायक आघाडी

    पंजाबमध्ये आपची निर्णायक आघाडीकडे वाटचाल सुरू असून, तब्बल 74 जागांवर आपचे उमेदवार  आघाडीवर आहेत. तर काँग्रेसचे उमेदवार 30 जागांवर आघाडीवर आहेत. अकाली दर 10 तर बीजेपीने तीन जागांवर आघाडी घेतली आहे.

  • 10 Mar 2022 09:44 AM (IST)

    उत्तराखंडमध्ये भाजपची 37 जागांवर आघाडी

    उत्तराखंडमध्ये पुन्हा एकदा भाजपाची सत्ता येणार असल्याचे जवळपास निश्चित झाले आहे. उत्तराखंडमध्ये 37 जागांवर भाजप उमेदवार आघाडीवर आहेत, तर काँग्रेस दोन नंबरचा पक्ष ठरला आहे. काँग्रेसने 30 जागांवर आघाडी घेतली आहे. आपला राज्यात अद्यापपर्यंत एकाही जागेवर आघाडी घेता आलेली नाही.

  • 10 Mar 2022 09:40 AM (IST)

    पंजाबमध्ये आप 66 जागांवर आघाडीवर

    पंजाबमध्ये आपने निर्णायक आघाडी घेतल्याचे दिसून येत आहे, हाती येत असलेल्या निकालानुसार आप 66 जागा, काँग्रेस 35, अकाली दल 10 तर भाजप 3  ठिकाणी आघाडीवर आहे.

  • 10 Mar 2022 09:32 AM (IST)

    पंजाबचे माजी मुख्यमंत्री अमरिंदर सिंग पिछाडीवर

    पंजाबचे माजी मुख्यमंत्री अमरिंदर सिंग पिछाडीवर गेल्याचे पहायला मिळत आहे. त्यांचे प्रतिस्पर्धी अजीत पाल सिंग यांनी आघाडी घेतली आहे. अमरिंदर सिंग हे तीन हजार मतांनी पिछाडीवर आहेत.

  • 10 Mar 2022 09:30 AM (IST)

    पंजाबमध्ये आपची विजयाकडे वाटचाल

    पंजाबमध्ये आपची निर्णायक बहुमताकडे वाटचाल सुरू असल्याचे दिसून येत आहे. आपचे उमेदवार 62 जागांवर आघाडीवर आहेत. तर काँग्रेसचे उमेदवार 37 जागांवर आघाडीवर आहेत. भाजपाचे उमेदवार केवळ तीन जागांवर आघाडीवर आहेत.

  • 10 Mar 2022 09:26 AM (IST)

    उत्तराखंडमध्ये पुन्हा काँग्रेसची मुसंडी, 30 जागांवर आघाड

    उत्तराखंडमध्ये काही काळ काँग्रेस पिछाडीवर पडल्याचे दिसून येत होते, मात्र पुन्हा एकदा काँग्रेसने जोरदार कमबॅक केले आहे. उत्तराखंडमध्ये भाजपाचे उमेदवार 32 जागांवर आघाडीवर आहेत, तर काँग्रेसच्या उमेदवारांनी 30 जागांवर आघाडी मिळवली आहे.

  • 10 Mar 2022 09:23 AM (IST)

    मणिपूरमध्ये भाजपाची दणदणीत आघाडी

    मणिपूरमध्ये भाजपाची दणदणीत आघाडी, तर काँग्रेसपेक्षा अपक्षांची संख्या अधिक

  • 10 Mar 2022 09:21 AM (IST)

    पंजाबमध्ये आपची मोठी आघाडी, 60 जागांवर उमेदवार आघाडीवर

    पंजाबमध्ये आपने मोठी आघाडी घेतली असून, आपचे उमेदवार 60 जागांवर आघाडीवर आहेत. तर दुसरीकडे काँग्रेस पिछाडीवर गेले असून, काँग्रेसचे उमेदवार 38 जागांवर आघाडीवर आहेत.

  • 10 Mar 2022 09:17 AM (IST)

    काँग्रेसचे उमेदवार सिद्धू पिछाडीवर, बादल यांची आघाडी

    पंजाबमधील निवडणुकीच्या निकालात मोठी चुसर पहायला मिळत आहे. माजी मुख्यमंत्री बादल यांनी आघाडी घेतली असून, काँग्रेसचे उमेदवार सिद्धू तीसऱ्या नंबरवर गेले आहेत.

  • 10 Mar 2022 09:12 AM (IST)

    उत्तराखंडमध्ये भाजप 34 तर काँग्रेसची 28 जागांवर आघाडी

    उत्तराखंडमध्ये भाजप 34 जागांवर तर काँग्रेसची 28 जागांवर आघाडी

  • 10 Mar 2022 09:09 AM (IST)

    पंजाबमध्ये आपची 44 जागांवर आघाडी

    पंजाबमध्ये आम आदमी पार्टी आघाडी घेताना दिसत असून, तब्बल 44 जागांवर आपचे उमेदवार आघाडीर आहेत.

  • 10 Mar 2022 09:05 AM (IST)

    मणिपूरमध्ये भाजप 19 तर काँग्रेसची 13 जागांवर आघाडी

    मणिपूरमध्ये भाजप उमेदवारांची  19 तर काँग्रेस उमेदवारांची 13 जागांवर आघाडी

  • 10 Mar 2022 09:00 AM (IST)

    मणिपूरमध्ये भाजप 20 तर काँग्रेस 14 जागांवर आघाडीवर

    मणिपूरमध्ये विधानसभा निवडणुकीची मतमोजणी सुरू आहे. आतापर्यंत हाती आलेल्या निकालानुसार मणिपूरमध्ये भाजप 20 तर काँग्रेस 14 जागांवर आघाडीवर  आहे.

  • 10 Mar 2022 08:58 AM (IST)

    उत्तराखंडमध्ये भाजपची आघाडी, काँग्रेस पिछाडीवर

    उत्तराखंडमध्ये भाजपाने आघाडी घेतली असून, काँग्रेस पिछाडीवर गेले आहे. उत्तराखंडमध्ये भाजप 36 जागांवर अघाडीवर आहे. तर काँग्रेसच्या उमेदवारांनी 25 जागांवर आघाडी घेतली आहे.

  • 10 Mar 2022 08:51 AM (IST)

    उत्तराखंडमध्ये भाजप, काँग्रेसमध्ये चुरस

    उत्तराखंडमध्ये काँग्रेस आणि भाजपामध्ये चुरस दिसत असून, आतापर्यंत हाती आलेल्या निकालानुसार भाजप 30 जागांवर तर काँग्रेस 29 जागांवर आघाडीवर आहे.

  • 10 Mar 2022 08:38 AM (IST)

    मणिपूरमध्ये भाजप 13 तर काँग्रेसची 10 जागांवर आघाडी

    मणिपूरमध्ये भाजप उमेदवारांची  13 तर काँग्रेस उमेदवारांची 10 जागांवर आघाडी

  • 10 Mar 2022 08:33 AM (IST)

    उत्तराखंडमध्ये भाजप 28 तर काँग्रेस 22 जागांवर आघाडीवर

    उत्तराखंडमध्ये भाजप आणि काँग्रेसमध्ये चुरस पहायला मिळत आहे. भाजप 28 तर काँग्रेस 22 जागांवर आघाडीवर आहे.

  • 10 Mar 2022 08:29 AM (IST)

    पंजाबमध्ये 18 जागांवर आपच्या उमेदवारांची आघाडी

    पंजाबमध्ये 18 जागांवर आपच्या उमेदवारांनी आघाडी घेतली असून, कँग्रेस 13 जागांवर आघाडीवर आहे.

  • 10 Mar 2022 08:26 AM (IST)

    उत्तराखंडमध्ये भाजप दहा तर काँग्रेसची नऊ जागांवर आघाडी

    उत्तराखंडमध्ये मतमोजणीला सुरुवात झाली आहे. उत्तराखंडमध्ये भाजप दहा जागांवर पुढे आहे, तर काँग्रेसने देखील नऊ जागांवर आघाडी घेतली आहे.

  • 10 Mar 2022 08:22 AM (IST)

    पंजाबमध्ये आप पिछाडीवर काँग्रेसच्या उमेदवारांची सहा जागांवर आघाडी

    पंजाबमध्ये मतमोजणीच्या सुरुवातीलाच काँग्रेस आघाडीवर असल्याचे दिसून येत आहे. काँग्रेसचे उमेदवार सहा जागांवर आघाडीवर आहेत, तर आपचे उमेदवार तीन जागांवर आघाडीवर आहेत.

  • 10 Mar 2022 08:18 AM (IST)

    पंजाबमध्ये काँग्रेस चार तर आप तीन जागांवर आघाडीवर

    पंजाब विधानसभेच्या निवडणूक मतमोजणीला सुरुवात झाली आहे. सुरुवातीलाच काँग्रेसने आघाडी घेतली असून, चार जागांवर काँग्रेसचे उमेदवार आघाडीवर आहेत, तर आपचे उमेदवार तीन जागांवर आघाडीवर आहेत.

  • 10 Mar 2022 08:09 AM (IST)

    पाच राज्यांमध्ये मतमोजणीला सुरुवात

    आज पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचे निकाल लागणार आहेत. त्यासाठी मतमोजणीला सुरुवात झाली आहे. या पाच राज्यांमध्ये पंजाब, मणिपूर, गोवा, उत्तरप्रदेश आणि उत्तराखंड या राज्यांचा समावेश आहे.

  • 10 Mar 2022 08:03 AM (IST)

    लोकांना पंजाबमध्ये बदल हवा होता – मान

    पंजाबमधील ‘आप’चे मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार भगवंत मान यांनी संगरूर गुरुद्वारामध्ये जाऊन प्रार्थना केली. यावेळी बोलताना त्यांनी म्हटले आम्हाला पूर्ण विश्वास आहे, पंजाबमध्ये आम्हीच सत्तेत येऊ. लोकांना बदल हवा होता, त्यासाठी लोकांनी आम आदमी पक्षाची निवड केली आहे.

  • 10 Mar 2022 07:52 AM (IST)

    मतमोजणीपूर्वी माजी मुख्यमंत्री हरिश रावत मंदिरात, परिवासोबत घेतले भगवान विष्णूचे दर्शन

    उत्तराखंडमध्ये आज विधानसभेच्या 70 जागांसाठी मतमोजणी होत आहे. मतमोजणीपूर्वी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री हरीश रावत यांनी सहपरिवार मंदिरात जाऊन पूजा केली. यावेळी त्यांनी आपले काही फोटो ट्विट केले आहेत. निवडणुकीमध्ये पक्षाला भरघोस यश मिळावे यासाठी प्रार्थना केल्याचे त्यांनी म्हटले.

  • 10 Mar 2022 07:28 AM (IST)

    उत्तरप्रदेशमध्ये पुन्हा भाजप सत्तेत येणार – ब्रजेश पाठक

    अवघ्या काही वेळात मतमोजणीला सुरुवात होणार आहे. मतमोजणीपूर्वी उत्तरप्रदेशमध्ये पुन्हा एकदा आम्हीच सत्तेत येऊ, असा दावा उत्तरप्रदेशमधील भाजपाचे मंत्री आणि नेते ब्रजेश पाठक यांनी केला आहे.

  • 10 Mar 2022 07:20 AM (IST)

    Noida Election Result 2022 : सपाच्या कार्यकर्त्यांचे ईव्हीएमवर लक्ष

    नोयडामध्ये सपाचे कार्यकर्ते ज्या ठिकाणी ईव्हीएम ठेवण्यात आले आहे, त्या रूमच्या बाहेरच ठाण मांडून बसले आहेत.  यातील एका कार्यकर्त्यांनी तर मतमोजणीपूर्वी गाणे देखील गायले आहे. सपाकडून प्रत्येक मतदार संघामध्ये अशाच पद्धतीने ईव्हीएमवर लक्ष ठेवण्यात येत आहे.

  • 10 Mar 2022 07:15 AM (IST)

    1200 मतमोजणी केंद्राची व्यवस्था

    थोड्याचवेळात पाचही राज्यांच्या मतमोजणीला सुरुवात होणरा आहे. मतमोजणीसाठी एकूण पाच राज्य मिळून 1200 मतमोजणी केंद्राची व्यवस्था करण्यात आली आहे. प्रत्येक मतमोजणी केंद्राबाहेर सुरक्षा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

  • 10 Mar 2022 07:09 AM (IST)

    UP Assembly Election Result : गोरखपूरमध्ये कडेकोट बंदोबस्त

    आज पाच राज्यातील निवडणुकांचा निकाल आहे. यामध्ये पंजाब, उत्तरप्रदेश, मणिपूर, उत्तराखंड आणि गोवा या राज्यांचा समावेश आहे. थोड्याच वेळात मतमोजणीला सुरुवात होणार आहे. मतमोजणीच्या पार्श्वभूमीवर उत्तर प्रदेशच्या गोरखपूर मतदारसंघात कडेकोट सुरक्षा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

  • 10 Mar 2022 07:04 AM (IST)

    पंजाबमध्ये आपच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण

    पंजाबमध्ये आपच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. त्याचे महत्त्वाचे कारण म्हणजे पंजाबमध्ये यावेळी आप सत्तेत येणार असल्याचा अंदाज बांधला जातोय. कार्यकर्त्यांनी आतापासून जल्लोष सुरू केला आहे. राज्यातील पक्षाचे मुख्यलय सुशोभित करण्यात आले आहे. तसेच विजयानंतर वाटण्यासाठी जिलेबी देखील तयार करण्यात येत आहे.

  • 10 Mar 2022 06:54 AM (IST)

    पंजाबचे मुख्यमंत्री चन्नी यांची चमकौर साहिबच्या गुरुद्वारामध्ये प्रार्थना

    आज पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचा निकाल लागणार आहे. यामध्ये पंजाबचा देखील समावेश आहे. या सर्व पार्श्वभूमीवर पंजाबचे मुख्यमंत्री चरणजित सिंग चन्नी यांनी चमकौर साहिबच्या गुरुद्वाराला भेट दिली. त्यांनी चमकौर साहिबच्या गुरुद्वारा श्री कटलगढ साहिब येथे नतमस्तक होत पक्षाच्या विजयासाठी प्रार्थना केली.

  • 09 Mar 2022 02:06 PM (IST)

    UP Election 2022 : उत्तर प्रदेशात कडेकोट सुरक्षा व्यवस्था

    यूपीमधील एडीजी (कायदा आणि सुव्यवस्था) प्रशांत कुमार यांनी सांगितले की 10 मार्च रोजी होणाऱ्या मतमोजणीसाठी सुमारे 70,000 नागरी पोलीस कर्मचारी, 245 कंपन्या, निमलष्करी दल आणि 69 कंपनी पीएसी तैनात करण्यात आले आहेत. यादरम्यान कोणीही गोंधळ घालण्याचा किंवा दंगल घडवण्याचा प्रयत्न केल्यास त्याच्यावर कडक कारवाई केली जाईल.

  • 09 Mar 2022 01:53 PM (IST)

    Uttarakhand Election 2022 : काँग्रेसचे दिग्गज नेते मतमोजणीवर लक्ष ठेवणार

    माजी मुख्यमंत्री हरीश रावत आणि इतर नेत्यांच्या उपस्थितीत काँग्रेस पक्षाची डेहराडूनमधील एका हॉटेलमध्ये बैठक झाली. या बैठकीत मतमोजणीवर लक्ष ठेवण्यासाठी राज्यातील 13 जिल्ह्यांतील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते उपस्थित राहतील, असा निर्णय घेण्यात आला.

  • 09 Mar 2022 01:49 PM (IST)

    UP Election 2022 : राजकीय शक्तीपुढे जनशक्ती झुकणार नाही : अखिलेश यादव

    समाजवादी पक्षाचे नेते अखिलेश यादव म्हणाले की, आजपासून पुढचे तीन दिवस प्रत्येक तरुणाने, प्रत्येक मतदाराने मतमोजणी केंद्रावर रक्षण करावे आणि ढोल-ताशांच्या गजरात स्वातंत्र्याचे भजन करावे. राजकीय शक्तीपुढे जनशक्ती झुकणार नाही, असा एल्गार अखिलेश यादव यांनी केला

  • 09 Mar 2022 01:47 PM (IST)

    Punjab Election 2022 : पंजाबमध्ये राजकीय पक्षांकडून लाडवांच्या ऑर्डर

    पंजाब विधानसभा निवडणुकीचे निकाल उद्या जाहीर होणार आहेत. निवडणूक निकाल जाहीर होण्यापूर्वी राजकीय पक्षांकडून लाडवांच्या ऑर्डर्स दिल्या जात असून, त्यासाठी दुकानांमध्ये लाडू तयार केले जात आहेत.

  • 09 Mar 2022 01:45 PM (IST)

    5 State Election 2022 : निकाल सकारात्मक दिसतील, भाजपाध्यक्षांना विश्वास

    10 मार्च रोजी उत्तर प्रदेश, पंजाबसह पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकांच्या मतमोजणीपूर्वी, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जगतप्रकाश नड्डा यांनी मंगळवारी पक्षाच्या नेत्यांना सांगितले की निवडणुकांचे सकारात्मक निकाल पाहायला मिळतील. मध्य प्रदेशच्या एक दिवसीय दौऱ्यावर असताना नड्डा हे इंदौरमध्ये भाजपचे प्रदेश पदाधिकारी आणि मोर्चा अध्यक्षांसोबत आयोजित बैठकीत बोलत होते.

Published On - Mar 09,2022 1:42 PM

Follow us
महाराष्ट्र कुणाचा? किंग कोण? एका क्लिकवर पाहा
महाराष्ट्र कुणाचा? किंग कोण? एका क्लिकवर पाहा.
निकालापूर्वीच महायुती-मविआत हालचाली, 160 च्या वर दोघांचाही दावा अन्...
निकालापूर्वीच महायुती-मविआत हालचाली, 160 च्या वर दोघांचाही दावा अन्....
'कालचा बॉम्ब आधी फुटला असता तर...', उद्धव ठाकरेंचं मोठं वक्तव्य
'कालचा बॉम्ब आधी फुटला असता तर...', उद्धव ठाकरेंचं मोठं वक्तव्य.
निकालाला काहीच तास, पवारांकडून दावा; म्हणाले, काळजी करू नका, राज्यात..
निकालाला काहीच तास, पवारांकडून दावा; म्हणाले, काळजी करू नका, राज्यात...
'...तर आव्हाडांनी दादांच्या म्हशीच्या गोठ्यावर काम कराव', कोणाच आव्हान
'...तर आव्हाडांनी दादांच्या म्हशीच्या गोठ्यावर काम कराव', कोणाच आव्हान.
बच्चू कडूंना महायुती अन मविआकडून फोन, तिसऱ्या आघाडीचा पाठिंबा कोणाला?
बच्चू कडूंना महायुती अन मविआकडून फोन, तिसऱ्या आघाडीचा पाठिंबा कोणाला?.
जयंत पाटलांच्या हाती मविआ नेत्यांच्या गाडीचं स्टेअरिंग; राऊत म्हणाले..
जयंत पाटलांच्या हाती मविआ नेत्यांच्या गाडीचं स्टेअरिंग; राऊत म्हणाले...
'मध्यरात्री EVM ठेवलेल्या स्ट्रॉग रुममध्ये भाजपच्या...', पवारांचा आरोप
'मध्यरात्री EVM ठेवलेल्या स्ट्रॉग रुममध्ये भाजपच्या...', पवारांचा आरोप.
'... तर प्रणिती शिंदे यांचे घर फोडू', कोणी भरला काँग्रेसला सज्जड दम?
'... तर प्रणिती शिंदे यांचे घर फोडू', कोणी भरला काँग्रेसला सज्जड दम?.
'एक्झिट पोलची ऐशी की तैशी, आम्ही 26 ला सरकार बनवतोय'; राऊतांचा दावा
'एक्झिट पोलची ऐशी की तैशी, आम्ही 26 ला सरकार बनवतोय'; राऊतांचा दावा.