Special report : पश्चिम बंगालमध्ये भाजपची मोठी खेळी, 4 खासदार मैदानात, काय आहे शाहनीती?

आगामी पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीसाठी भाजपने संपूर्ण ताकद पणाला लावली आहे. मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या टीएमसी पक्षाला भाजपने थेट आव्हान दिलंय.

Special report : पश्चिम बंगालमध्ये भाजपची मोठी खेळी, 4 खासदार मैदानात, काय आहे शाहनीती?
ममता बॅनर्जी आणि अमित शाह
Follow us
| Updated on: Mar 14, 2021 | 9:37 PM

कोलकाता : आगामी पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीसाठी भाजपने संपूर्ण ताकद पणाला लावली आहे. मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या टीएमसी पक्षाला भाजपने थेट आव्हान दिलंय. एकिकडे आक्रमक प्रचार, तर दुसरीकडे निवडणूक रणनीती आखली जात आहे. याची झलक भाजपच्या नुकत्याच जाहीर झालेल्या उमेदवारांच्या यादीत दिसली. भाजपने तब्बल 4 विद्यमान खासदारांनाच विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरवलंय. यावरुनच भाजपने किती ताकद लावलीय याविषयी तर्कवितर्क लावले जात आहेत. टीव्ही 9 च्या निवडणूक तज्ज्ञांनी भाजपच्या उमेदवार यादीचं विश्लेषण केलंय (Analysis on BJP candidate list in West Bengal Assembly election 2021).

कोण आहेत 4 खासदार?

1. खासदार नितिश प्रामाणिक (कूचबेहर मतदारसंघ)

नितिश प्रामाणिक पश्चिम बंगालमधील दिनहाटा विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढत आहेत. या मतदारसंघात 41 टक्के अनुसुचित जाती, 32 टक्के मुस्लीम आणि 0.4 टक्के अनुसुचित जमातीचे नागरिक राहतात. भाजपच्या नितिश प्रामाणिक यांच्याविरोधात टीएमसीकडून उदयन गुहा निवडणूक रिंगणात आहेत. गुहा या भागातील शक्तीशाली नेते आहेत. नितिश प्रामाणिक राजबोंशी समुहातून येतात. या मतदारसंघात या समुहाची निर्णायक संख्या आहे. त्यामुळे ही लढाई अटीतटीची होणार आहे.

2. खासदार बाबुल सुप्रियो 

भाजप खासदार बाबुल सुप्रियो टोलीगुंज विधानसभा मतदारसंघातून विधानसभा निवडणूक रिंगणात आहेत. त्याच्याविरोधात टीएमसीकडून ममता बॅनर्जी यांचे निकटवर्तीय आरुप बिस्वास हे उभे आहेत. त्यामुळेच भाजपने बाबुल सुप्रियो यांना येथून उभं करत ही लढत चुरशीची केलीय. या मतदारसंघात 4 टक्के अनुसुचित जाती, 4 टक्के मुस्लीम आणि अगदी कमी प्रमाणात अनुसुचित जमाती आहेत.

3. खासदार स्वपन दासगुप्ता (राज्यसभा)

खासदार स्वपन दासगुप्ता तारकेश्वर विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढत आहेत. तारकेश्वर प्रसिद्ध शिव मंदिरासाठी ओळखले जाते. या ठिकाणी धार्मिक अनुयायांची मोठी गर्दी असते. या मतदारसंघात 27 टक्के अनुसुचित जाती, 5 टक्के अनुसुचित जमाती आणि 10 टक्के मुस्लीम लोकसंख्या आहे.

4. खासदार लॉकेट चॅटर्जी

खासदार लॉकेट चॅटर्जी या चुंचुरा विधानसभा मतदारसंघातून आपलं नशिब आजमावत आहेत. त्या हुगळी लोकसभा मतदारसंघातून खासदार आहेत. चुंचुरा या मतदारसंघात 22 टक्के अनुसुचित जाती, 4 टक्के अनुसुचित जमाती आणि 7 टक्के मुस्लीम लोकसंख्या आहे.

विशेष म्हणजे भाजप हुगळी जिल्ह्यातील दोन विधानसभा मतदारसंघात थेट विद्यमान खासदारांना उतरवत आहे. याचाच अर्थ भाजपने हुगळी जिल्ह्यात जोरदार ताकद लावली आहे.

टीएमसीच्या 4 विद्यमान आमदारांना भाजपकडून तिकीट

भाजपने टीएमसीच्या 4 विद्यमान आमदारांना आपल्याकडून विधानसभा निवडणुकीसाठी तिकीट दिलंय. यात दोमजूरचे आमदार राजीव बॅनर्जी, डायमंड हार्बरचे आमदार दिपक हलदेर, उत्तरपाराचे आमदार प्रबीर घोसल यांचा समावेश आहे.

भाजपकडून कोणत्या सिनेकलाकारांना तिकीट?

भाजपने मतदारांना प्रभावित करण्यासाठी सिनेकलाकारांनाही निवडणूक रिंगणात उतरवलं आहे. यात 4 व्यक्तींचा समावेश आहे. अंजना बासू, पायल सरकार, तनुश्री चक्रवर्ती आणि यश दासगुप्ता अशी त्यांची नावं आहेत.

(टीप – हे विश्लेषण टीव्ही 9 समुहाच्या निवडणूक संशोधन आणि विश्लेषण टीमने (TV9 Election Intelligence and Research Wing) केलंय)

हेही वाचा :

West Bengal Election 2021 : ‘जखमी वाघिण जास्त घातक असते’, व्हीलचेअरवरुन ममता बॅनर्जींची डरकाळी!

बाबुल सुप्रियोंसह चार खासदारांना विधानसभेचं तिकीट; बंगाल सर करण्यासाठी भाजपची खेळी!

Mamata banerjee Injured : ममता बॅनर्जींचे सुरक्षा संचालक निलंबित, जिल्हाधिकारी आणि एसपींवरही कारवाई

व्हिडीओ पाहा :

Analysis from a TV9 Election Intelligence and Research Wing on BJP candidate list in West Bengal Assembly election 2021

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.