Election Result 2022 LIVE: पाच राज्यात पहिल्या तासाभरात काय काय घडलं? वाचा 10 मोठे मुद्दे
Election Result 2022 LIVE in Marathi : आश्चर्यकारकरीत्या गोव्यात टीएमसीही आघाडीवर असून इतर पक्षांना किती जागांवर आघाडी मिळाली आहे, आणि कोण पिछाडीवर पडलंय, ते जाणून घ्या...

पाच राज्यांत कोण जिरवणार? कोण मिरवणार?Image Credit source: TV9 Marathi
पाच राज्यांच्या निवडणुकांच्या निकालाची (5 State Assembly Elections Results) उत्सुकता संपूर्ण देशाला आहे. जाणून घ्या पहिल्या तासाभराच्या मतमोजणी कुणाचा पगडा भारी आणि कोण पिछाडीवर? महत्त्वाचे TOP 10 मुद्दे :
Election Updates TOP 10 :
- सर्वात मोठी घडामोड गोव्यात घडताना दिसतेय. गोव्यात काँग्रेस 20 जागांवर आघाडीवर आहे तर भाजपा 14 जागांवर आघाडीवर आहे.
- गोव्यात ममता बॅनर्जीची टीएमसी 4 जागांवर आघाडीवर आहे तर केजरीवालांच्या आपला मात्र एकाही जागेवर आघाडीही घेता आलेली नाही.
- गोव्यात दोन जागांवर इतर जण आघाडीवर आहेत, शिवसेनेला मात्र गोव्यात फार काही हाताला लागलंय असं अजून तरी दिसत नाही.
- गोव्यात सर्वांचं लक्ष लागलेल्या उत्पल पर्रिकर यांनी पोस्टल मतदानात आधी आघाडी घेतली पण नंतर ते पिछाडीवर गेलेत. गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत मात्र आघाडीवर आहेत.
- उत्तर प्रदेशात भाजपा दीडशेच्या घरात पण जागांचं नुकसान होताना दिसतंय, तर अखिलेश यादव यांच्या सपानं गेल्या वेळेसच्या तुलनेत चांगली आघाडी घेतलीय. त्यांनी पहिल्या तासाभरात पाऊनशे जागांचा टप्पा ओलांडला.
- पहिल्या तासाभरात उत्तर प्रदेशात काँग्रेसला आघाडी पिछाडीच्या गणितात खातंही उघडता आलं नाही. फारशा प्रचारात न पडलेल्या मायावती यांच्या बीएसपीचे दोन उमेदवार आघाडीवर
- पंजाबमध्ये नवज्योतसिंह सिद्धू तसच कॅप्टन अमरिंदरसिंग हे पिछाडीवर राहिले. मुख्यमंत्री चन्नी यांनी मात्र दोन्ही जागांवर आघाडी घेतली.
- पंजाबमध्ये आपचं अर्धशतकी आघाडी तर काँग्रेस आणि अकाली दुसऱ्या तिसऱ्या क्रमांकावर आघाडी, भाजप पंजाबमध्ये फक्त 4 जागांवर आघाडी.
- अखिलेश यादव हे आघाडीवर राहिले, योगी आदित्यनाथ यांनीही आघाडी घेतली, शिवपाल यादव मात्र पिछाडीवर गेले
- मणिपूरमध्ये भाजपनं दणदणीत आघाडी घेतली तर काँग्रेसपेक्षा अपक्षांची संख्या मणिपूरमध्ये अधिक, ती 10 इतकी राहिली.
संबंधित बातम्या :
वाचा लाईव्ह अपडेट्स – Goa Election Result | गोव्यात कुणाची सत्ता? भाजप-काँग्रेसमध्ये काँटे की टक्कर, निकाल काही तासांत येणार!