Video: आवताडेची लीड वाढली आणि फडणवीसांच्या ‘त्या’ वक्तव्याचा व्हिडीओ व्हायरल !

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचा पंढरपूरमधील सभेचा एक व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे. यात फडणवीसांनी आवताडेंना विजयी करण्याचं आवाहन करतानाच राज्यातील आघाडी सरकारवर निशाणा साधला होता.

Video: आवताडेची लीड वाढली आणि फडणवीसांच्या 'त्या' वक्तव्याचा व्हिडीओ व्हायरल !
Follow us
| Updated on: May 02, 2021 | 4:11 PM

सोलापूर : एकीकडे देशातील 5 राज्यांच्या विधानसभा निवडणुकींच्या निकालासाठी मतमोजणी सुरु आहे. हळूहळू काही निकाल घोषित होत आहेत. दुसरीकडे महाराष्ट्रातही सोलापूरमधील मंगळवेढा-पंढरपूर विधानसभा मतदारसंघात पोटनिवडणुकीच्या निकालासाठी मतमोजणी सुरु आहे. आतापर्यंत घोषित निकालानुसार या मतदारसंघात भाजपची विजयाकडे जोरदार घोडदौड सुरु आहे. भाजपचे उमेदवार समाधान आवताडे आघाडीवर आहेत. यानंतर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचा पंढरपूरमधील सभेचा एक व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे. यात फडणवीसांनी आवताडेंना विजयी करण्याचं आवाहन करतानाच राज्यातील आघाडी सरकारवर निशाणा साधला होता (Devendra Fadnavis video viral after trends of Pandharpur bypolls Samadhan Autade).

या व्हिडीओत देवेंद्र फडणवीस काय म्हणत आहेत?

देवेंद्र फडणवीस म्हणत आहेत, “लोक विचारतात केवळ विधानसभा मतदारसंघाची निवडणूक आहे याने काय फरक पडणार आहे. याने काय सरकार बदलंय का? अरे सरकार कधी बदलायचं ते माझ्यावर सोडा ते बदलू आपण. लोकशाहीत या सरकारचा अनाचार, दुराचार, अत्याचार आणि भ्रष्टाचार सुरु आहे. म्हणून या सरकारला जागा दाखवून देण्यासाठी पहिली संधी कुणाला मिळाली असेल तर ती मंगळवेढा-पंढरपुरच्या नागरिकांना मिळालीय. म्हणून या मतदारसंघाची निवडणूक महत्त्वाची आहे. या सरकारला त्यांची जागा दाखवून देण्याची वेळ आलीय.”

30 फेऱ्यांमध्ये भाजपचे समाधान आवताडे आघाडीवर

आतापर्यंत मतमोजनीच्या 30 फेऱ्यांपेक्षा जास्त फेऱ्या झाल्या आहेत. सर्व फेऱ्यांमध्ये भाजपचे उमेदवार समाधाव आवताडे आघाडीवर दिसत आहेत. सध्याची परिस्थितीत बघता समाधान आवताडे यांचा विजय निश्चित मानला जातोय. त्यामुळे भाजप कार्यकर्त्यांकडून जल्लोष साजरा केला जातोय. भाजप नेते प्रशांत पारिचारक यांच्या घरी कार्यकर्ते जमले आहेत. तिथे समाधान अवताडे देखील आहेत. कार्यकर्त्यांनी उत्साहात गुलाल देखील उधळला आहे. विजयाची औपचारिक घोषणा होण्याआधी आम्ही समाधान आवताडे यांच्याशी बातचित करण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी त्यांनी आपला विजय निश्चित असून औपचारिक घोषणेची वाट बघत असल्याचं सांगितलं.

समाधान आवताडे यांची पहिली प्रतिक्रिया काय?

“विजय आमचा निश्चित आहे. फक्त औपचारिकता राहिली आहे. त्याची वाट बघतोय. त्यानंतर सविस्तर भूमिका मांडेल. प्रशांत पारिचारिक आणि सर्व पंढरपुराने ताकद दिली होती. विजय हा जनतेचा आहे. या सरकार विरोधात जनतेने दिलेला कौल आहे. गुलाल कार्यकर्त्यांनी उधळलेला आहे. विजय आमचाच होणार आहे. फक्त उतावीळपणा नको”, अशी प्रतिक्रिया समाधान आवताडे यांनी दिली.

प्रशांत पारिचारक यांची प्रतिक्रिया काय?

यावेळी प्रशांत पारिचारक यांनीदेखील प्रतिक्रिया दिली. “आमचा विजय निश्चित आहे, फक्त अधिकृत घोषणा बाकी आहे. त्यामुळे उतावीळ न होता थोडं संयमाने घेणं आवश्यक आहे. ही निवडणूक जनतेने हातात घेतली होती. त्याचाच यामध्ये विजय बघायला मिळतोय. राज्य सरकारची सगळी यंत्रणा या ठिकाणी होती. तरीसुद्धा लोकांपुढे आम्ही एकत्र गेलो. लोकांना विश्वास दिला. या तालुक्यात आम्ही गेले 30 ते 40 वर्षे काम केलं. सगळ्याच कार्यकर्त्यांनी जिद्दीने जिंकायची आशा केली होती. त्याचाच हा विजय आहे. विरोधकांना निकालाने उत्तर दिलं आहे. मतदारांनी विश्वास दाखवला त्यामुळे हा विजय शक्य झाला आहे”, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.

संबंधित व्हिडीओ :

हेही वाचा :

“ज्यांनी घराघरात भांडणं लावली त्यांच्या घरात आता टोकाची भांडणं, मेंढ्यांचं नेतृत्व कधीच लांडग्याकडे नसतं”

कोरोना काळात राजकारण करणाऱ्यांना जागा दाखवून द्या, भगीरथ भालकेंसाठी अमोल कोल्हेंची बॅटिंग

पोटनिवडणुकीने पंढरपुरात वात पेटवली; आमदार संजय शिंदे,अमोल मिटकरी, रणजीतसिंहांना कोरोना, 1800 अ‌ॅक्टिव्ह रुग्ण

Devendra Fadnavis video viral after trends of Pandharpur bypolls Samadhan Autade

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.