Election Result 2022 Live: मुख्यमंत्र्यांवर पराभवाची टांगती तलवार; सावंत, धामी, बीरेन यांचे काय होणार?
पाच राज्यातील निवडणूक निकाल (Elections Result live) दुपारपर्यंत हाती येणार आहेत. त्या Election Result 2022 Live: गोव्याचे (GOA) मुख्यमंत्री प्रमोद सावंत, उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्करसिंह धामी, पंजाबचे मुख्यमंत्री चरणजीतसिंग चन्नी आणि मणिपूरचे मुख्यमंत्री एन. बीरेन सिंह यांच्यावर पराभवाची टांगती तलवार कायम आहे.
पाच राज्यातील निवडणूक निकाल (Elections Result live) दुपारपर्यंत हाती येणार आहेत. सध्या तरी उत्तर प्रदेश, गोवा, उत्तराखंड आणि मणिपूरमध्ये भारतीय जनता पक्षाची सत्ता येईल, असेच कौल आहेत. हे चित्र सायंकाळपर्यंत स्पष्ट होईल. त्यात गोव्याचे (GOA) भाजपचे उमेदवार आणि मुख्यमंत्री प्रमोद सावंत, उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्करसिंह धामी, पंजाबचे मुख्यमंत्री चरणजीतसिंग चन्नी आणि मणिपूरचे मुख्यमंत्री एन. बीरेन सिंह यांच्यावर पराभवाची टांगती तलवार कायम आहे. कारण ते बहुतांश फेऱ्यात पिछाडीवर पडत असल्याचे चित्र आहे. सध्या गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी पुन्हा एकदा आघाडी घेतील आहे. मात्र, ती कितीवेळ टिकेल हे पाहावे लागेल. जाणून घेऊयात देशभरात अतिशय चुरशीच्या ठरलेल्या या रंजक आणि तितक्याच लक्षवेधक निकालाचे काही महत्त्वाचे मुद्दे.
- आतापर्यंत आलेल्या कलानुसार उत्तर प्रदेशमध्ये भाजपची अडीचशे जागांकडे वाटचाल सुरू आहे. सपाने शतकी खेळी पूर्ण केली आहे.
- उत्तर प्रदेशमध्ये योगी आदित्यनाथ यांनी आघाडी घेतली आहे. मात्र, गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत, उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्करसिंह धामी आणि मणिपूरचे मुख्यमंत्री एन. बीरेन सिंह हे पिछाडीवर पडले होते.
- आता पुन्हा एकदा प्रमोद सावंत यांनी आघाडी घेतली आहे. सध्या भाजपच्या खातात 20 आणि काँग्रेसच्या खात्यात 13 जागा जातील असा कौल समोर येतोय.
- मणिपूरमध्ये भाजपची बहुमताकडे वाटचाल सुरू आहे. मात्र, येथे मुख्यमंत्री एन. बीरेन सिंह हे पिछाडीवर पडलेत.
- उत्तराखंडमध्ये भाजपने बहुमताचा आकडा गाठल्याचे कौल आले आहेत. मात्र, तिथेही मुख्यमंत्री पुष्करसिंह धामी हे पिछाडीवर असल्याचे चित्र आहे.
- पंजाबमध्ये आम आदमी पक्षाने अक्षरशः मुसंडी मारली आहे. सध्या पक्ष 90 जागांवर आघाडीवर आहे. येथे आपची सत्ता येईल, अशी शक्यता आहे.
- उत्तर प्रदेशमध्ये एकूण 403 जागा, गोव्यात 40, पंजाबमध्ये 117, मणिपूरमध्ये 60 आणि उत्तराखंडमध्ये एकूण 70 जागा आहेत.
- उत्तर प्रदेशमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा करिष्मा चालला, अशी प्रतिक्रिया भाजपचे महाराष्ट्र प्रदेसाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केली आहे.
- उत्तर प्रदेशमध्ये पुन्हा एकदा योगी सरकार येण्याची चिन्हे आहेत. त्यात योगी आदित्यनाथ हेच पुन्हा एकदा मुख्यमंत्री होण्याची शक्यता आहे.
- उत्तर प्रदेशमध्ये भाजप कार्यकर्त्यांनी सध्याच विजयाची जोरदार तयारी सुरू केली आहे. ठिकठिकाणी पोस्टर लावले जात आहेत. त्यांनी जल्लोषाची जोरदार तयारी सुरू केलीय.
- पंजाबमध्ये काँग्रेसचा सुपडा साफ झाला आहे. त्यामुळे काँग्रेसचे मुख्यमंत्री चरणजीत सिंह चन्नी हे राज्यपालांची भेट घेऊन राजीनामा देणार असल्याचे समजते.
इतर बातम्याः