Exit Poll Result 2022 : उत्तर प्रदेशमध्ये सातव्या टप्प्यातील जागांसाठी मतदान, 5 राज्यांच्या एक्झिट पोलमध्ये कौल कुणाला?
Exit Poll Result 2022 Date and Time : उत्तर प्रदेशमधील विधानसभा निवडणुकीसाठी आज सातव्या टप्प्याचं मतदान होत आहे. यानंतर उत्तर प्रदेश, उत्तराखंड, गोवा, पंजाब आणि मणिपूर राज्यातील मतदारांचा कौल कुणाला असू शकतो, या संदर्भातील एक्झिट पोल जारी होतील.
नवी दिल्ली : उत्तर प्रदेश, उत्तराखंड, पंजाब, मणिपूर आणि गोवा या पाच राज्यातील विधानसभा निवडणुकांची (Assembly Election 2022) रणधुमाळी सध्या अंतिम टप्प्यात पोहोचलीय. उत्तर प्रदेश वगळता पंजाब, उत्तराखंड, मणिपूर आणि गोवा या राज्यांतील मतदान पार पडलं आहे. उत्तर प्रदेशमधील सातव्या टप्प्याचं मतदान आज पार पडणार आहे. उत्तर प्रदेशातील सातव्या टप्प्याचं मतदान पार पडल्यानंतर टीव्ही 9 नेटवर्ककडून पाच राज्यातील विधानसभा निवडणुकांमध्ये मतदारांनी कौल कुणाला दिलाय या संदर्भातील एक्झिट पोल (Exit Poll) जाहीर करण्यात येणार आहे. तुम्ही टीव्ही 9 मराठीवर एक्झिट पोलच्या अपडेटस् पाहू शकता. टीव्ही 9 मराठीची वेबसाईट आणि सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर एक्झिट पोलचे अपडेट पाहता येतील. उत्तर प्रदेश, उत्तराखंड, पंजाब, गोवा आणि मणिपूर या राज्यातील निवडणुकांचे एक्झिट पोल 7 मार्चला (Exit Poll date) उत्तर प्रदेशातील सातव्या टप्प्याची मतदान प्रक्रिया पार पडल्यानंतर जारी होतील.
एक्झिट पोलचे अपडेट कुठं पाहणार
उत्तर प्रदेश, पंजाब, उत्तराखंड, गोवा आणि मणिपूर या पाच राज्यातील मतदार काँग्रेस, भाजप आणि समाजवादी पार्टी या पैकी कोणत्या पक्षाला कौल देणार याचा कल एक्झिट पोलमधून पाहायला मिळेल. पाच राज्यातील सत्ता कोणत्या पक्षांकडे जाणार याचा अंदाज एक्झिट पोलमधून वर्तवण्यात येणार आहे. एक्झिट पोलचे सर्व अपडेट टीव्ही 9 मराठी आणि www.tv9marathi.com वेबसाईटवर पाहायला मिळतील. टीव्ही 9 मराठीच्या सोशल मीडिया प्लॅट फॉर्मवर देखील अपडेट पाहायला मिळतील.
उत्तर प्रदेशात आज सातव्या टप्प्याच मतदान
पाच राज्यांपैकी सर्वात मोठे राज्य म्हणून उत्तर प्रदेशच्या विधानसभा निवडणुकीच्या मतदानासाठी 7 टप्पे करण्यात आले होते. 10 फेब्रुवारी , 14 फेब्रुवारी, 20 फेब्रुवारी , 23 फेब्रुवारी, 27 फेब्रुवारी, 03 मार्च रोजी मतदान पार पडलं आहे. आता 07 मार्चला म्हणजेच आज सातव्या टप्प्यातील मतदान होणार आहे. सातव्या टप्प्यातील मतदान संपल्यानंतर एक्झिट पोल जाहीर होतील. गोवा आणि उत्तराखंड राज्यातील मतदान 14 फेब्रुवारी रोजी एका टप्प्यात पार पडलं. पंजाब राज्यातील विधानसभा निवडणुकीसाठी 20 फेब्रुवारीला मतदान पार पडलं. मणिपूर राज्यात 27 फेब्रुवारी आणि 5 मार्च रोजी मतदान पार पडलं आहे.
10 मार्चला निकाल
उत्तर प्रदेश, उत्तराखंड, पंजाब, मणिपूर, गोवा या राज्यांच्या निवडणुकांचे निकाल 10 मार्चला जाहीर होणार आहेत. त्यापूर्वी 7 मार्चला सायंकाळी एक्झिट पोल पाहता येणार आहे.
कुठे कुणाची प्रतिष्ठा पणाला?
उत्तर प्रदेशमध्ये योगी आदित्यनाथ, अखिलेश यादव, मायावती आणि प्रियांका गांधी याच्या नेतृत्त्वाखाली निवडणुका लढण्यात आल्या. तिथं मतदार कुणाला पसंती देतात हे पाहावं लागेल. गोवा, मणिपूर आणि उत्तराखंडमध्ये भाजप विरुद्ध काँग्रेस असा सामना आहे. तर, पंजाबमध्ये काँग्रसेला आप आणि शिरोमणी अकाली दलाचं आव्हान आहे.
इतर बातम्या: