अशा लोकांना जाती-धर्मातून दूर करा, महाराष्ट्रातल्या नवाब मलिक प्रकरणावर शरद पवारांना मोदींचं थेट उत्तर ?
भाजपने आपले गड शाबूत राखल्याबद्दल मोदींनी कार्यकर्त्यांचे अभिनंदन केले. तसेच त्यांनी यावेळी काँग्रेसच्या घराणेशाहीपासू ते महाराष्ट्रात सुरू असलेल्या ईडीविरोधातल्या राजकारणापर्यंत सर्वांचा समाचार घेतला.
नवी दिल्ली : आज पाच राज्याच्या निवडणुकांचा (Five State Election results 2022) निकाल लागला. यात काँग्रेस पुरती सपशेल झाली. त्यानंतर पंतप्रधान मोदींनी देशाशी (Pm Modi Live) आणि भाजप कार्यकर्त्यांशी संवाद साधला. भाजपने आपले गड शाबूत राखल्याबद्दल मोदींनी कार्यकर्त्यांचे अभिनंदन केले. तसेच त्यांनी यावेळी काँग्रेसच्या घराणेशाहीपासू ते महाराष्ट्रात सुरू असलेल्या ईडीविरोधातल्या राजकारणापर्यंत सर्वांचा समाचार घेतला. आज अजून एक विषय मी लोकांसमोर ठेवतोय. भ्रष्टाराचाविरोधात कारवाई व्हावी की नाही? पण काहीजण अशा कारवाया रोखण्याचं काम करत आहेत. असे म्हणत त्यांनी शरद पवारांवर (Sharad pawar) निशाणा साधला. कारण नवाब मलिक यांना ईडीने अटक केल्यानंतर शरद पवारांनी यावर भाष्य केले होते. मलिक मुस्लिम आहेत म्हणून त्यांचा संबंध दाऊशी जोडला जातोय असा आरोप पवारांनी केला होता. तर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी तर कोर्टाच्या निर्णयावरही सवाल उपस्थित केले आहेत. त्याचाही मोदींनी आज समाचार घेतला आहे. गेल्या अनेक दिवसांपासून महाविकास आघाडीती नेत्यांविरोधात ज्या कारवाई सुरू आहेत, त्या भाजप केंद्रीय तपास यंत्रणाचा गैरवापर करून करत आहे, असा आरोप महाविकास आघाडीकडून करण्यात येत आहे.
स्वतंत्र तपास यंत्रणांना बदनाम केलं जातंय
लोकांच्या मनात अशा भ्रष्टाचाऱ्यांबाबत एक प्रकारचा राग आहे. भाजप 2014 मध्ये एक इमानदार सरकारचं आश्वासन देत निवडणूक लढवली. 2019 ला पुन्हा आम्हाला जनतेनं सत्तेत बसवलं. देशाला आमच्याकडून अपेक्षा आहे की आम्ही भ्रष्टाचार संपवावा. पण आज आम्ही पाहतो की ज्या निष्पक्ष संस्था आहेत, ज्या भ्रष्टाचाराविरोधात कारवाई करतात, तर हे लोक त्या संस्थांना बदनाम करण्याचं काम करत आहेत. असा आरोप यावेळी मोदींनी केला. हे देशाचं मोठं दुर्भाग्य आहे की घोटाळ्यात बरबटलेले लोक आता या संस्थांवर दबाव बनवत आहेत. हे लोक या संस्थांना रोखण्यासाठी नवे नवे पर्यात शोधत आहेत. त्यांना न्यायपालिकेवरही विश्वास नाही. असे म्हणत त्यांनी शरद पवारांना थेट टार्गेट केले आहे. तर न्यायपालिकेबाबतच्या वक्तव्यांवरून राऊतांचेही अप्रत्यक्षरित्या वाभाडे काढले आहेत.
भ्रष्टाचाराला जातीचा रंग देता
यावर पुढे बोलताना मोदी म्हणाले, लोक कोणत्याही भ्रष्टाराऱ्यांवर कारवाई होताना त्याला धर्म, जातीचा रंग देतात. एखाद्या माफियाविरोधात न्यायालय निर्णय देतं तेव्हा त्यालाही जात, धर्माशी जोडलं जातं. मी सर्व संप्रदायातील लोकांना अपील करतो की अशा लोकांना आपल्या समाजापासून दूर करण्याची हिम्मत करा. यामुळे समाजाचं भलं होईल. वाराणसीचा खासदार असण्याच्या नात्यानं यूपीतील लोकांच्या प्रेमानं मलाही उत्तर प्रदेशचा बनवून टाकलं. मी माझ्या अनुभवातून सांगतो की यूपीतील लोक जात, संप्रदायाला बदनाम करणाऱ्यांपासून दूर होत राज्याच्या विकासाला प्राधान्य दिलं पाहिजे. असेही मोदी यावेळी म्हणाले आहेत. गेल्या अनेक दिवसांपासून महाविकास आघाडीतील नेत्यावर होणाऱ्या कारवाईंवरून राजकारण पेटलं आहे.
Punjab Election results 2022 : शरद पवारांच्या घरी काम करणाऱ्यांची मतं “आप”ला, असं का घडलं?
यूपीतील जनतेकडून जातीवाद, घराणेशाही आणि वंशवादाच्या राजकारणाला तिलांजली, योगींचा विरोधकांवर हल्लाबोल