Election Result 2022 Live: सुरुवातीच्या कलात प्रमोद सावंत आघाडीवर, मतमोजणीआधी दत्तचरणी प्रार्थना

Election Result 2022 Live: सुरुवातीच्या कलात प्रमोद सावंत आघाडीवर, मतमोजणीआधी दत्तचरणी प्रार्थना

| Updated on: Mar 10, 2022 | 9:03 AM

UP, Punjab, Uttarakhand, Goa and Manipur Vidhan Sabha Election 2022 LIVE Updates in Marathi : गोवा विधानसभेच्या निवडणुकांची मतमोजणी सुरु असून साखळीत प्रमोद सावंत गड राखतात का, याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय.

आपलं मुख्यमंत्रिपद कायम राखण्यात डॉ. प्रमोद सावंत (Dr. Pramod Sawant) यांना यश मिळतं, का याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे. डॉ. प्रमोद सावंत यांनी मतमोजणीआधी आपल्या साखळी मतदारसंघात सपत्नीक दत्त मंदिरात जाऊन प्रार्थना केली. यावेळी प्रमोद सावंत यांनी भादपं बहुमतानं जिंकून येत आहे, असा विश्वास व्यक्त केला. साखळी मतदारसंघातून (Sanquelim Goa) डॉ. प्रमोद सावंत निवडणूक लढवत आहे. डॉ. प्रमोद सावंत यांच्या नेतृत्त्वाखाली भाजपनं गोव्यात निवडणुका लढवल्या आहेत. आता मतमोजणीत सुरुवातीच्या कलांनुसार डॉ. प्रमोद सावंत हे आघाडीवर असल्याचं दिसून आलं होतं.