Goa Election Result 2022 | गोव्यात शिवसेना-राष्ट्रवादीचं काय झालं? भातखळकर म्हणतात, हाणलेली फिश करी राईस..
निवडणूक आयोगाच्या अधिकृत वेबसाईटवरील आकडेवारीनुसार शिवसेनेला 0.25% मतवाटा मिळाला आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला तूर्तास 1.06% मतं पडली आहे. विशेष म्हणजे हे दोन्ही आकडे 'नोटा'ला मिळालेल्या मतांपेक्षाही कमी आहेत
पणजी : गोवा विधानसभा निवडणुकांचे निकाल (Goa Elections result 2022) हाती येत आहेत. गोव्यात भाजप-काँग्रेस यांच्याशिवाय शिवसेना आणि राष्ट्रवादीही निवडणुकीच्या रिंगणात उतरले असल्यामुळे महाराष्ट्राचं लक्ष लागलं आहे. सुरुवातीच्या कलांमध्येच शिवसेनेची प्रचंड पिछेहाट होताना दिसत आहे. त्यावरुन भाजप आमदार अतुल भातखळकर (Atul Bhatkhalkar) यांनी शिवसेनेला (Shivsena) चिमटा काढला आहे. “वसूली सेनेच्या स्टार प्रचारकांनी प्रचारा दरम्यान हाणलेल्या फिश करी-राईस व्यतिरिक्त यंदाही पदरात काही पडलेले नाही, फक्त पाव टक्के मतं. तरीही 2024 मध्ये पंतप्रधान त्यांचाच…” असा टोला भातखळकरांनी लगावला आहे.
वाचा अतुल भातखळकरांचे ट्वीट :
वसूली सेनेच्या स्टार प्रचारकांनी प्रचारा दरम्यान हाणलेल्या फिश करी-राईस व्यतिरिक्त यंदाही पदरात काही पडलेले नाही, फक्त पाव टक्के मतं.तरीही 2024 मध्ये पंतप्रधान त्यांचाच… pic.twitter.com/A3VmwEA0SC
— Atul Bhatkhalkar (@BhatkhalkarA) March 10, 2022
गोव्यात काय स्थिती
मतमोजणी सुरु झाल्यानंतर अडीच तासांच्या अखेरीस (सकाळी 10.30 वाजता) शिवसेनेला पाव टक्के मतं मिळाल्याचं दिसत आहे. निवडणूक आयोगाच्या अधिकृत वेबसाईटवरील आकडेवारीनुसार शिवसेनेला 0.25% मतवाटा मिळाला आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला तूर्तास 1.06% मतं पडली आहे. विशेष म्हणजे हे दोन्ही आकडे ‘नोटा’ला मिळालेल्या मतांपेक्षाही कमी आहेत. कारण 1.17% मतदारांनी ‘नोटा’चा पर्याय निवडला आहे. भाजपला सर्वाधिक मतवाटा असून त्यानंतर अनुक्रमे काँग्रेस, मगोप, आप, तृणमूल काँग्रेस, गोवा फॉरवर्ड पक्ष यांचा क्रमांक लागतो. अजूनही मतमोजणी सुरु असून मतांचा वाटा पुढे-मागे होण्याची शक्यता आहे.
कोणत्या पक्षाला किती टक्के मतं?
आप {6.78%} तृणमूल काँग्रेस {4.89%} भाजप {33.60%} गोवा फॉरवर्ड पक्ष {1.14%} काँग्रेस {23.54%} महाराष्ट्रवादी गोमांतक पक्ष {8.60%} राष्ट्रवादी {1.06%} नोटा {1.17%} शिवसेना {0.25%} इतर {18.98%}
संबंधित बातम्या :
Goa Election Result 2022 | गोव्यात शिवसेना-राष्ट्रवादीचं काय झालं? ‘नोटा’पेक्षाही कमी मतं?
पाच राज्यात पहिल्या तासाभरात काय काय घडलं? वाचा 10 मोठे मुद्दे
मुख्यमंत्र्यांवर पराभवाची टांगती तलवार; सावंत, धामी, बीरेन यांचे काय होणार?