Election Result 2022 Live: गोव्यात मनोहर पर्रिकर यांचे सुपुत्र उत्पल यांचा पराभव; बंड फसले!

Goa Vidhan Sabha Election 2022 LIVE Updates in Marathi: पाच राज्यांच्या निवडणुकीत आतापर्यंत हाती आलेल्या कौलानुसार उत्तर प्रदेश, उत्तराखंड, मणिपूर आणि गोव्यामध्ये भाजपचे सरकार येण्याची शक्यता आहे. तर पंजाबमध्ये आम आदमी पक्ष सत्तेत येण्याची शक्यता आहे. दुपारी चारपर्यंत या सर्व ठिकाणचे चित्र स्पष्ट होणार आहे.

Election Result 2022 Live: गोव्यात मनोहर पर्रिकर यांचे सुपुत्र उत्पल यांचा पराभव; बंड फसले!
पणजी मतदार संघातून उत्पल पर्रिकर यांचा पराभव झाला आहे.
Follow us
| Updated on: Mar 10, 2022 | 5:33 PM

साऱ्या देशाचे लक्ष लागलेल्या उत्तर प्रदेशसह पाच राज्यांच्या निवडणुकीचे एकेक निकाल येत आहेत. अतिशय चर्चेत राहिलेल्या गोवा विधानसभा निवडणुकीत (Goa Assembly Election) भाजपविरोधात बंडाचा झेंडा फडकावणारे माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांचे सुपुत्र असलेल्या उत्पल पर्रिकर (Utpal Parrikar) यांना पराभवाचा धक्का बसला आहे. पणजी मतदारसंघातून त्यांना पराभव पत्करावा लागला असून, येथे भाजपचे (BJP) बाबूश मोन्सेरात विजयी झाले आहेत. गोवा विधानसभा निवडणुकीत उत्पल पर्रिकर यांना पणजी विधानसभा मतदार संघातून तिकीट हवे होते. मात्र, भाजपने पणजीतून विद्यमान आमदारालाच तिकीट दिले. उत्पल हे आमच्या परिवारातील आहेत. त्यांना दोन जागांची ऑफर दिली होती. मात्र, त्यांनी दोन्ही जागांचे प्रस्ताव नाकारल्याचे भाजपने म्हटले होते. या पराभवानंतर पर्रिकरांची वाटचाल कशी असेल, याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे.

पर्रिकरांनी का केले बंड?

पणजी मतदारसंघात मागच्या 30 वर्षांपासून भाजपचा उमेदवार विजयी होतो. माजी मुख्यमंत्री आणि केंद्रीय संरक्षण मंत्री दिवंगत मनोहर पर्रीकर हे या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करत होते. मात्र, 2019 ला परिकरांच्या निधनानंतर झालेल्या पोटनिवडणुकीत काँगेसचे बाबूश मोन्सेरात यांचा विजय झाला. मात्र, बाबूश पुढे भाजपवासी झाले. 2022 च्या निवडणुकीत आपल्याला भाजपकडून उमेदवारी मिळाली पाहिजे, नाहीतर आपण अपक्ष निवडणूक लढविणार असल्याचे उत्पल पर्रिकर यांनी सांगितले होते. मात्र, भाजपने पर्रिकर यांचा इथे पराभव होईल, असे म्हणत इतर दोन जागांचे पर्याय ठेवले होते. त्यानंतर उत्पल पर्रिकर यांनी नकार देत बंडाचा झेंडा उभारला होता.

भाजपला बहुमत मिळणार का?

गोव्यामध्ये विधानसभेच्या एकूण 40 जागा आहेत. सध्या आलेल्या कौलानुसार भाजप 18 जागांवर आघाडीवर आहे. काँग्रेस 11, आम आदमी पक्ष 2, मगोप आणि आघाडीला 4 तर इतर उमेदवार 5 जागांवर आघाडीवर आहेत. सध्या हाती आलेल्या कौलानुसार उत्तर प्रदेश, उत्तराखंड, मणिपूर आणि गोव्यामध्ये भाजपचे सरकार येण्याची शक्यता आहे. तर पंजाबमध्ये आम आदमी पक्ष सत्तेत येण्याची शक्यता आहे. दुपारी चारपर्यंत या सर्व ठिकाणचे चित्र स्पष्ट होणार आहे.

मोदींची लाट कायम

सध्या देशात मोदींची लाट कायम आहे, असे केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी म्हटले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोरोना काळातील परिस्थिती अतिशय चांगल्या प्रकारे हाताळली. गोरगरिबांना मोफत धान्य दिले. सर्वांचे लसीकरण केले. त्यामुळे मोदींवर जनतेचा विश्वास आहे. मोदींची लाट कायम असून, तिचा खरा झंझावात लोकसभा निवडणुकीत दिसेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

इतर बातम्याः 

Election Result 2022 Live: उत्तर प्रदेशमध्ये भाजपने गाठली मॅजिक फिगर, सपाची शतकी खेळी

Election Result 2022 Live: निकालाआधीच अखिलेश यांचे फटाके; म्हणतात, इम्तिहान बाकी है अभी हौसलों का…

Assembly Election Results 2022 Date : 10 मार्चला पाच राज्यांच्या निवडणुकांचा निकाल, निकाल कुठे? कसा बघाल? वाचा एका क्लिकवर

शिंदे गटाचा अजितदादांना सरकारमधून बाहेर काढण्याचा प्लान, कोणाचा आरोप
शिंदे गटाचा अजितदादांना सरकारमधून बाहेर काढण्याचा प्लान, कोणाचा आरोप.
जरांगेंविरोधात सगळा समाज उभा करायला वेळ लागणार, कोणी दिली उघड धमकी
जरांगेंविरोधात सगळा समाज उभा करायला वेळ लागणार, कोणी दिली उघड धमकी.
'सुरतलुटी वेळी शिवरायांनी पत्र लिहीले...,' काय म्हणाले जयंत पाटील
'सुरतलुटी वेळी शिवरायांनी पत्र लिहीले...,' काय म्हणाले जयंत पाटील.
रंगारी बदक चाळीच्या बाप्पाचं लंबोदर रुप पाहण्यासाठी भक्तांची रिघ
रंगारी बदक चाळीच्या बाप्पाचं लंबोदर रुप पाहण्यासाठी भक्तांची रिघ.
गडकरी यांच्या घरी कच्च्याबच्च्यांनी गणपती आणलाय...
गडकरी यांच्या घरी कच्च्याबच्च्यांनी गणपती आणलाय....
कास पठाराचा हंगाम सुरु, मोठ्यांसाठी आणि शाळकरी मुलांसाठी किती शुल्क ?
कास पठाराचा हंगाम सुरु, मोठ्यांसाठी आणि शाळकरी मुलांसाठी किती शुल्क ?.
मी फुंकलो असतो तरी राजे पडले असते, असं जरांगे म्हणाले, राऊत यांचा दावा
मी फुंकलो असतो तरी राजे पडले असते, असं जरांगे म्हणाले, राऊत यांचा दावा.
महाराष्ट्राच्या प्रगतीत कोणतेही अडथळे नकोत, अमृता फडणवीस यांचे साकडे
महाराष्ट्राच्या प्रगतीत कोणतेही अडथळे नकोत, अमृता फडणवीस यांचे साकडे.
गणरायाच्या आगमनाने सुखसमृद्धी येवो, एकनाथ शिंदे यांचे गणरायाला साकडे
गणरायाच्या आगमनाने सुखसमृद्धी येवो, एकनाथ शिंदे यांचे गणरायाला साकडे.
घरोघरी बाप्पाच्या आगमनाची तयारी, नैवेद्यासाठी 21 भाज्या खरेदीची घाई
घरोघरी बाप्पाच्या आगमनाची तयारी, नैवेद्यासाठी 21 भाज्या खरेदीची घाई.