मुंबई : पाच राज्यांच्या निवडणुकांची रणधुमाळी सुरु झाली आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार उत्तर प्रदेशचा दौरा करणार आहेत. गोव्यात सेना-राष्ट्रवादीकडून मविआचा प्रयोग करण्याचा प्रयत्न सुरु असल्याची माहिती शरद पवार यांनी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आयोजित पत्रकार परिषदेत दिली.
गोव्यात काँग्रेस पार्टी, तृणमूल काँग्रेस आणि राष्ट्रवादीमध्ये चर्चा सुरु आहेत. गोव्यात भाजपला पर्याय देण्याचा आमचा विचार सुरु आहे. गोव्यात भाजपचे सरकार हटवण्याची गरज आहे आणि तसे एकत्रित पाऊल टाकण्याची आवश्यकता आहे अशी आमची इच्छा आहे. माझ्या पक्षाकडून प्रफुल पटेल, शिवसेनेकडून संजय राऊत व तेथील कॉंग्रेसचे नेते अशी चर्चा सुरू आहे असेही शरद पवार म्हणाले. काही ठिकाणी आम्ही जागा लढवू इच्छित आहोत. त्याची माहिती दोन्ही पक्षाला दिली आहे. गोव्यात संजय राऊत आणि प्रफुल्ल पटेलांची चर्चा सुरु आहे. येत्या दोन दिवसात गोव्यातील निवडणुकीसंदर्भात निर्णय होईल, असे पवारांनी स्पष्ट केले.
शरद पवार पुढच्या आठवड्यात उत्तर प्रदेशच्या दौऱ्यावर जाणार आहेत. उत्तर प्रदेशात सपा आणि राष्ट्रवादीची आघाडी झाली असून उद्या बैठक पार पडणार आहे. लखनऊमधील जागावाटपाबाबत या बैठकीत निर्णय होण्याची शक्यता आहे. तसेच उत्तर प्रदेश विधान परिषदेचे सदस्य राहिलेले माजी आमदार सिराज मेहंदी साहेब राष्ट्रवादीत आले असून त्यांचे अनेक सहकारीही पक्षात सामील होणार आहेत, असा दावाही पवारांनी केला आहे.
पाच राज्यात निवडणुका होत आहेत. या निवडणुकीत राष्ट्रवादी तीन राज्यात निवडणूक लढवणार आहे. राष्ट्रवादी गोव्यासह मणिपूर आणि उत्तर प्रदेशातही निवडणुका लढवणार असल्याचे शरद पवार यांनी घोषित केले. मणिपूरमध्ये राष्ट्रवादी पाच जागांवर काँग्रेससोबत निवडणूक लढवणार आहे. (Statement of NCP President Sharad Pawar at the press conference regarding Goa elections)
संबंधित बातम्या
मोठी बातमी : पाच राज्यातल्या निवडणुकांसाठी शरद पवार मैदानात, प्रेस कॉन्फरन्समध्ये मेगा प्लॅन मांडला
उत्तर प्रदेशात भाजपाला गळती सुरूच; आणखी तीन आमदारांचे राजीनामे, सपाकडून भाजपाला कुलूपाची भेट