पणजी : गोवा निवडणुकीच्या प्रचाराला (Goa Elections 2022) चांगलाच रंग चढला आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी सध्या गोव्यात प्रचार करत आहे. यावेळी राहुल गांधींचं एक वेगळं रुप दिसून आलं. राहुल गांधी प्रचार करत असताना एका महिलेने राहुल गांधी (Rahul Gandhi) यांना मिठी मारली आणि आम्ही हातालाच मतदान करणार अशी ग्वाही दिली. तर गोव्यात भाजपने (Bjp) आतापर्यंत कोहीच विकास केला नाही, अशी तक्रारही ही महिला राहुल गांधी यांच्याकडे करताना दिसून आली. पाच राज्यात सध्या निवडणुकांचा प्रचार जोमाने सुरू आहे. काही दिवसातच मतदान पार पडेल. गोव्यात सत्तेत येण्यासाठी काँग्रेस जोमाने कामाला लागली आहे. काही दिवसांपूर्वीच अमित शाह यांनी गोव्यात दाखल होत काँग्रेस आणि राहुल गांधी यांचा समाचार घेतला होता. आता राहुल गांधी गोव्यात प्रचार करत आहे. त्यावेळे ते अमित शाह यांच्या टीकेला प्रत्युत्तर देणार का? याचीही उत्सुक्ता सर्वांना लागली आहे.
राहुल गांधी प्रचार करताना काय घडलं?
आपकी सादगी की बात निराली राहुल जी।
देश ढूंढ रहा, हर ‘हाथ’ खुशहाली राहुल जी।।#GoenchoFudaarCongressSarkar pic.twitter.com/EbiAB3yD9Y— Congress (@INCIndia) February 4, 2022
यापूर्वीही राहुल गांधींच्या गालाची चुंबने
2014 लाही काहीसा असाच प्रकार समोर आला होता. महिलांनी अचानकपणे त्यांच्या गालाची चुंबने घेण्यास सुरुवात केल्याने राहुल गांधी अवाक झाले होते. आसाममधील जोरहाटमध्ये महिला काँग्रेस कार्यकर्त्यांनी घेरलेल्या राहुल गांधींवर चौफेर चुंबनांचा वर्षाव करण्यात आला. राहुल गांधी आसाममधील जोरहाट येथे काँग्रेसच्या महिला कार्यकर्त्यांशी कामाबाबत चर्चा करण्यासाठी गेले होते. पक्ष, संघटना, निवडणुका, महिला सक्षमीकरण अशा अनेक विषयांवर बोलण्याची योजना होती. मात्र, राहुल गांधींना पाहून एका महिलेने मागून राहुल गांधींच्या गालावर चुंबन घेतले. ही गोष्टही फास चर्चेत राहिली होती.
राहुल गांधी यांचा गरोघरी जात प्रचार
गोवा दौर्यावर आलेल्या राहुल गांधी यांनी मुरगाव विधानसभा मतदान क्षेत्रातील सडा या ठिकाणी घरोघरी जाऊन काँग्रेसचा प्रचार केला. घरोघरी प्रचार करताना राहूल गांधी यांच्यासोबत माजी केंद्रीय मंत्री पी, चीदंबरम आणि महाराष्ट्राचे प्रदेश अध्यक्ष नाना पटोले हे होते. राहूल गांधी यांनी घरोघरी जात त्यांनी मतदारांशी संवाद साधला. गोव्यात भाजपची कोंडी करण्यासाठी आणि भाजपला सत्तेतून खाली खेचण्यासाठी महाराष्ट्रातील दोन राजकीय पक्ष सध्या चांगलाच जोर लावत आहे. त्यांना किती यश मिळतं हे निवडणुकीनंतरच स्पष्ट होईल, सध्या तरी गोव्यातला माहोल निवडणुकांमुळे तापला आहे.
प्रचाराला गाण्यांची जोड
गोव्या दौऱ्यावरती असलेले काँग्रेसचे नेते राहुल गांधी त्यांनी घरोघरी जाऊन प्रचार केला. घरोघरी जाऊन प्रचार करत असताना डूलबा वळवईकर यांच्या घरात ते गेले. इथं वळवईकर यांच्या कुटुंबासोबत एका हिंदी गाण्यांचा देखील आस्वाद घेतला. राहुल गांधी आणि वळवईकर कुटुंबामध्ये बराच वेळ चर्चाही झाली. गोव्यात भाजपला सत्तेतून खाली खेचण्यासाठी सर्वच राजकीय पक्ष जोमाने मैदानत उतरले आहे. त्यातच काँग्रेसनेही धडाडीने प्रचार सुरू केला आहे. त्यातच राहुल गांधी गोव्यात उतरल्याने सर्वांच्या नजरा गोव्याकडे लागल्या आहेत.