Karnataka Assembly Elections : कर्नाटकावर स्वारी; महाराष्ट्रातील भाजपचे 6 बडे नेते प्रचाराला जाणार; ‘या’ नेत्यांवर जबाबदारी

कर्नाटक विधानसभा निवडणुकीचे बिगूल वाजले आहे. या निवडणुकीत प्रचार करण्यासाठी महाराष्ट्रातील भाजपचे सहा नेते कर्नाटकात तळ ठोकून असणार आहेत. त्यामुळे कर्नाटकात राजकीय प्रचाराचा चांगलाच धुरळा उडणार आहे.

Karnataka Assembly Elections : कर्नाटकावर स्वारी; महाराष्ट्रातील भाजपचे 6 बडे नेते प्रचाराला जाणार; 'या' नेत्यांवर जबाबदारी
Image Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Apr 12, 2023 | 12:33 PM

बेंगळुरू : कर्नाटक विधानसभेच्या निवडणुका जाहीर झाल्या आहेत. सर्व्हेनुसार भाजपला कर्नाटकातून सत्ता गमवावी लागणार असल्याची चिन्हे आहेत. त्यामुळे भाजपने कर्नाटक जिंकण्यासाठी कंबर कसली आहे. कर्नाटकात प्रचाराचा धुरळा उडवून देण्यासाठी भाजप देशभरातील नेत्यांची फौज कर्नाटकात उतरवणार आहे. देशभरातील एकूण 54 नेते कर्नाटकात प्रचाराला येणार आहेत. त्यात महाराष्ट्रातील सहा बड्या नेत्यांचा समावेश आहे. विशेष म्हणजे या सहा नेत्यांमध्ये देवेंद्र फडणवीस यांचं नाव नसल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.

कर्नाटकातील निवडणूक प्रचारासाठी महाराष्ट्र भाजपचे स्टार प्रचारक कर्नाटकाला जाणार आहेत. या निवडणुकीसाठी भाजपने देशातील तब्बल 54 बड्या नेत्यांची फौज तयार केली आहे. भाजपने महाराष्ट्रातील सहा जणांची एक यादी तयार केली आहे. यामध्ये केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे, केंद्रीय मंत्री कपिल पाटील, आमदार राम शिंदे, जयकुमार रावल, योगेश सागर आणि प्रसाद लाड या नेत्यांचा समावेश आहे. या नेत्यांकडे प्रत्येकी एका जिल्ह्याची जबाबदारी दिली जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. तसेच या नेत्यांना मतदारसंघही वाटून दिल्याचं सांगितलं जात आहे. महाराष्ट्रातील या सहाही नेत्यांना कर्नाटकातील मराठीबहुल परिसरातीलच प्रचाराची जबाबदारी दिली जाणार असल्याचं सांगितलं जात आहे.

हे सुद्धा वाचा

पहिली यादी जाहीर

भाजपने कर्नाटक विधानसभा निवडणुकीची पहिली यादी जाहीर केली आहे. या पहिल्या यादीत भाजपने तरुणाईला संधी दिली आहे. भाजपने 189 जणांची पहिली यादी जाहीर केली आहे. त्यात 52 नवख्या उमदेवारांना संधी दिली आहे. यात 9 जण डॉक्टर, रिटार्यड आयएएस अधिकारी, आयपीएस अधिकारी, 31 पोस्ट ग्रॅज्युएट आणि 8 महिलांना तिकीट दिलं आहे. तर मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांना शिगगाव येथून उमेदवारी देण्यात आली आहे.

जातीय समीकरण

पहिल्या यादीत भाजपने जातीय समीकरण राखण्याचा प्रयत्न केला आहे. लिस्टमध्ये ओबीसी (इतर मागासवर्ग) प्रवर्गातील 32, एससी (अनुसूचित जाती) मधील 30 आणि एसटी (अनुसूचित जनजाती)तील 16 उमेदवारांचा समावेश आहे. सोशल इंजीनिअरिंगवर भर देऊन भाजपने आपली बाजू भक्कम केल्याचं पहिल्या यादीतून दिसत आहे.

पहिल्या यादीत मुख्यमंत्री

पहिल्या यादीच विद्यमान मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांच्या नावाचा समावेश करण्यात आला आहे. त्यांना शिगगाव येथून बोम्मई यांना तिकीट देण्यात आलं आहे. भाजपचे नेते रमेश जारकीहोली हे गोकक आणि गोविंद एण करजोल हे मुधोळ येथून लढणार आहेत. तसेच भाजपचे राष्ट्रीय महासचिव सीटी रवी हे चिक्कमगलुरू येथून लढणार आहे. काँग्रेसचे दिग्गज नेते सिद्धारमैया आणि डीके शिवकुमार यांचा सामना करण्यासाठी भाजपने खास प्लान केला आहे. भाजपने या दोन्ही नेत्यांविरोधात सोमन्ना आणि आर. अशोक यांना मैदानात उतरवले आहे. ते दोन दोन मतदारसंघातून लढणार आहेत.

Non Stop LIVE Update
रायगडाच्या सर्व वाटा बंद, पायऱ्यांवरुन पाण्याचे लोट, सरकारचा निर्णय
रायगडाच्या सर्व वाटा बंद, पायऱ्यांवरुन पाण्याचे लोट, सरकारचा निर्णय.
जरांगेंनी केली चंद्रकांतदादांची नक्कल,'म्हणाले फडणवीस साहेब त्यांना...
जरांगेंनी केली चंद्रकांतदादांची नक्कल,'म्हणाले फडणवीस साहेब त्यांना....
विधान परिषद निवडणूकीत दगाफटका होण्याची भीती, आमदारांची हॉटेलवारी
विधान परिषद निवडणूकीत दगाफटका होण्याची भीती, आमदारांची हॉटेलवारी.
'शिवप्रेमींची फसवणूक...खरी वाघनखं येथे आहेत - इतिहास अभ्यासक इंद्रजीत
'शिवप्रेमींची फसवणूक...खरी वाघनखं येथे आहेत - इतिहास अभ्यासक इंद्रजीत.
परब म्हणाले तुम्हाला असं म्हटलं तर ?, उपसभापतींची मग अखेर दीलगिरी....
परब म्हणाले तुम्हाला असं म्हटलं तर ?, उपसभापतींची मग अखेर दीलगिरी.....
'मुंबईकरांनी आपली काळजी घ्यावी, कारण...,' काय म्हणाले होसाळीकर
'मुंबईकरांनी आपली काळजी घ्यावी, कारण...,' काय म्हणाले होसाळीकर.
म्हणून मुंबई तुंबली, काय म्हणाले अजित पवार, ग्लोबल वार्मिंग..आणि काय
म्हणून मुंबई तुंबली, काय म्हणाले अजित पवार, ग्लोबल वार्मिंग..आणि काय.
राजापूरात पुरात अडकलेल्या नागरिकांची सुटका, पोलीसांचे रेस्क्यू ऑपरेशन
राजापूरात पुरात अडकलेल्या नागरिकांची सुटका, पोलीसांचे रेस्क्यू ऑपरेशन.
मुंबईची झाली तुंबई, मुख्यमंत्र्यांनी घेतला कंट्रोल रुमचा ताबा
मुंबईची झाली तुंबई, मुख्यमंत्र्यांनी घेतला कंट्रोल रुमचा ताबा.
पुण्यात पुन्हा 'हिट एण्ड रन',रात्री दोघा बिट मार्शलना धडक, एकाचा बळी
पुण्यात पुन्हा 'हिट एण्ड रन',रात्री दोघा बिट मार्शलना धडक, एकाचा बळी.