ELON MUSK नंतर राहुल गांधी यांचे EVM संदर्भात ट्वीट, वायकर यांचा संदर्भ देऊन म्हणाले, EVM हा एक ब्लॅक बॉक्स…

मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघांमध्ये महायुतीचे उमेदवार रवींद्र वायकर यांचा 46 मतांनी विजय झाला आहे. यासंदर्भात ठाकरे गटाने वायकर यांच्या नातेवाईकाविरोधात मोबाईल फोन वापरल्याची तक्रार केली आहे. याचा संदर्भ राहुल गांधी यांनी घेतला आहे.

ELON MUSK नंतर राहुल गांधी यांचे EVM संदर्भात ट्वीट, वायकर यांचा संदर्भ देऊन म्हणाले, EVM हा एक ब्लॅक बॉक्स...
Rahul Gandhi
Follow us
| Updated on: Jun 16, 2024 | 2:34 PM

एकीकडे विरोधकांकडून ईव्हीएम संदर्भातले आरोप होत असतानाच टेसला मोटर्स आणि एक्सचे मालक इलॉन मस्क यांनी ईव्हीएम मशीन संदर्भात एक पोस्ट करत चिंता व्यक्त केली आहे. त्यातच आता कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांनी देखील EVM संदर्भात एक्सवर एक पोस्ट केली आहे. या पोस्टमुळे खळबळ उडाली आहे. या पोस्टमध्ये मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघांमध्ये मतमोजणीच्या दिवशी मतदान केंद्रावर एकनाथ शिंदे गटाचे उमेदवार रवींद्र वायकर यांच्या एका नातेवाईकाने ईव्हीएम अनलॉक करणारा फोन वापरल्याच्या बातमीचा हवाला कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांनी दिला आहे.

टेस्ला आणि एक्सचे मालक ELON MUSK यांनी अमेरिकेतील निवडणूकीचा संदर्भ घेत एक्सवर एक पोस्ट केली आहे. यात त्यांनी EVM हे विश्वासार्ह नाही. त्याला हॅक करता येऊ शकते असे म्हटले आहे. त्यामुळे EVM ऐवजी अनेक राष्ट्र जुन्या पद्धतीचे बॅलेट मतदानाला प्राधान्य देत आहेत अशी पोस्ट इलॉन मस्क यांनी एक्स प्लॅटफॉर्मवर केली आहे. मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघांमध्ये मतमोजणीच्या दिवशी शिंदे गटाचे उमेदवार रवींद्र वायकर यांच्या नातेवाईकाने ईव्हीएम अनलॉक करणारा फोन वापरल्याच्या आरोप होणाऱ्या बातम्यांचे कात्रण कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांनी पोस्ट केले आहे. आणि ELOM MUSK यांची पोस्ट देखील टॅग केली आहे.

काय म्हणाले राहुल गांधी

मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघांमध्ये मतमोजणीच्या दिवशी मतदान केंद्रावर वाईकरांच्या नातेवाईकाने ईव्हीएम अनलॉक करणारा फोन वापरल्याच्या बातमीचा हवाला देत राहुल गांधी यांनी एक्सवर पोस्ट केली आहे. भारतातील ईव्हीएम हा एक “ब्लॅक बॉक्स” आहे आणि कोणालाही त्यांची तपासणी करण्याची परवानगी नाही. आपल्या निवडणूक प्रक्रियेतील पारदर्शकतेबद्दल गंभीर चिंता व्यक्त केली जात आहे. जेव्हा लोकशाही संस्थांमध्ये उत्तरदायित्वाचा अभाव असतो, तेव्हा लोकशाही फक्त दिखावा म्हणून उरते आणि फसवणूक होण्याची शक्यता वाढते अशा आशयाची पोस्ट कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांनी एक्सवर केली आहे.

राहुल गांधी यांची पोस्ट –

एकीकडे विरोधकांकडून ईव्हीएम संदर्भातले आरोप होत असतानाच टेस्ला इलेक्ट्रीक कार आणि एक्सचे मालक एलोन मस्क यांनी ईव्हीएम मशीन संदर्भात एक पोस्ट करीत चिंता व्यक्त केली आहे. इलॉन मस्क यांनी म्हटलंय, ‘ईव्हीएम मशीन बंद केले पाहिजेत. कारण मानवी हस्तक्षेपाने किंवा इतर प्रकारे ईव्हीएम मशीन हॅक होण्याचा धोका आहे’ इलॉन मस्क यांच्या या ‘एक्स’ पोस्टवर प्रतिक्रिया देत राहुल गांधी यांनी मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघातील घटनेचा दाखला दिला आहे. त्यामुळे आता पुन्हा एकदा ईव्हीएमवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.

रवींद्र वायकर यांचा 48 मतांनी विजय

मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघांमध्ये सुरुवातीला महायुतीचे उमेदवार रवींद्र वायकर हे सुरुवातीला मतमोजणीत पिछाडीवर होते. त्यानंतर ठाकरे गटाचे उमेदवार अमोल कीर्तिकर यांना एका मताने विजयी करण्यात आले. एका मताचा फरक असल्याने त्यानंतर रवींद्र वायकर यांनी फेर मतमोजणीची मागणी केली. फेरी मतमोजणीनंतर अखेर पोस्टल बॅलेट मतमोजणीत 48 मतांनी रवींद्र वायकर यांना विजयी घोषीत करण्यात आले. या मतदान केंद्रात रवींद्र वायकर यांच्या नातेवाईकांनी मोबाईल फोन वापरल्याचा आरोप होत आहे. यासंदर्भात एका उमेदवाराने निवडणूक आयोग आणि पोलिसांकडे तक्रार केली आहे. या फोनमुळे ईव्हीएम मशिन अनलॉक केल्याचे म्हटले जात आहे. दुसरीकडे पोलिसांना या फोनमध्ये काही आक्षेपार्ह नसल्याचे म्हटले आहे. तर ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांनी आयोगाकडे सीसीटीव्ही फुटेज मागणी करुनही ते देण्यास आयोगाने नकार दिल्याकडे लक्ष वेधले आहे.

250 कोटींचा पीकविमा घोटाळ्याचा पॅटर्न, धस अण्णा यांचे मुंडेंवर निशाणा
250 कोटींचा पीकविमा घोटाळ्याचा पॅटर्न, धस अण्णा यांचे मुंडेंवर निशाणा.
'माझ्या मुलाचा मर्डर..', सोमनाथ सूर्यवंशीच्या आईच्या पवारांसमोरच संताप
'माझ्या मुलाचा मर्डर..', सोमनाथ सूर्यवंशीच्या आईच्या पवारांसमोरच संताप.
Mumbai Boat Accident कसा झाला, त्याला जबाबदार कोण?
Mumbai Boat Accident कसा झाला, त्याला जबाबदार कोण?.
'दादा, त्याला मंत्रिमंडळातून काढा..',अजित पवारांसमोर गावकऱ्यांचा संताप
'दादा, त्याला मंत्रिमंडळातून काढा..',अजित पवारांसमोर गावकऱ्यांचा संताप.
हवा तर पोलीस बंदोबस्त देऊ,कोणालाही पाठीशी घालणार नाही - अजित पवार
हवा तर पोलीस बंदोबस्त देऊ,कोणालाही पाठीशी घालणार नाही - अजित पवार.
संतोष देशमुख यांच्या मुलीच्या शिक्षणाची जबाबदारी आम्ही घेतो -शरद पवार
संतोष देशमुख यांच्या मुलीच्या शिक्षणाची जबाबदारी आम्ही घेतो -शरद पवार.
'परभणी प्रकरणात खरी वस्तूस्थिती जाणून...,' काय म्हणाले शरद पवार ?
'परभणी प्रकरणात खरी वस्तूस्थिती जाणून...,' काय म्हणाले शरद पवार ?.
मस्साजोग प्रकरणात अख्खं गाव...',पवार भेटीवर काय म्हणाले खासदार सोनावणे
मस्साजोग प्रकरणात अख्खं गाव...',पवार भेटीवर काय म्हणाले खासदार सोनावणे.
संजय राऊत रेकी प्रकरणानंतर मंत्री नितेश राणे म्हणाले की मच्छर...
संजय राऊत रेकी प्रकरणानंतर मंत्री नितेश राणे म्हणाले की मच्छर....
देवेंद्र फडणवीस यांच्या अवतीभोवतीची मंडळी कोण ? संजय राऊत यांचा सवाल
देवेंद्र फडणवीस यांच्या अवतीभोवतीची मंडळी कोण ? संजय राऊत यांचा सवाल.