Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Amravati Election Final Result 2024 : बच्चू कडू यांची प्रहार, नवनीत राणा यांची हार, काँग्रेसच्या बळवंत वानखेडे यांचा विजय

Amravati Lok Sabha Election Final Result 2024 : पूर्वी राष्ट्रवादीच्या पाठींब्यावर खासदार झालेल्या नवनीत राणा यांची उमेदवारी भाजपने जाहीर केली. तर कॉंग्रेसनेही दर्यापूर विधानसभेचे विद्यमान आमदार बळवंत वानखडे यांना उमेदवारी देऊन या निवडणुकीत रंगत आणली.

Amravati Election Final Result 2024 : बच्चू कडू यांची प्रहार, नवनीत राणा यांची हार, काँग्रेसच्या बळवंत वानखेडे यांचा विजय
AMRAVATI LOKSABHA ELECTION RESULT 2024Image Credit source: TV9 NEWS NETWORK
Follow us
| Updated on: Jun 04, 2024 | 8:25 PM

अमरावती लोकसभा मतदारसंघाच्या निकालाकडे अवघ्या महाराष्ट्राचे लक्ष लागले होते. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना त्यांच्याविरोधात हनुमान चालीसावरून राज्यभरात चर्चेत आलेल्या अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांना मतदारांनी पराभवाची धूळ चारली आहे. अमरावतीकरांनी कॉंग्रेसचे आमदार बळवंत वानखेडे यांना विजयी करून लोकसभेत पाठविले आहे. आमदार बच्चू कडू यांच्या प्रहार संघटनेचे उमेदवार दिनेश बूब यांनीही चांगली लढत दिली.

अमरावती लोकसभा (Amravati Lok Sabha Constituency) निवडणूकीमध्ये यावेळी विद्यमान खासदार नवनीत राणा (Candidate of BJP Navneet Rana) या भाजपकडून लढत आहे. त्यांच्याविरोधात कॉंग्रेसचे बळवंत वानखेडे (Candidate of Congress Balwant Wankhede) आणि प्रहार संघटनेचे दिनेश बुब (Candidate of Prahaar Dinesh Bub) हे ही निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. त्यामुळे अमरावतीमध्ये तिरंगी लढत होत आहे. अमरावती लोकसभा निवडणूक गेल्या दोन महिन्यापासून चर्चेत राहिली. याचे कारण म्हणजे विद्यमान खासदार नवनीत राणा आणि शिंदे गटाचे माजी खासदार आनंदराव अडसूळ याच्यात झालेले मतभेद. यातच प्रहार संघटनेचे आमदार बच्चू कडू यांनीही नवनीत राणा यांच्याविरोधात आघाडी उघडून आपला उमेदवार देण्याचे जाहीर केले. मात्र, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि भाजप यांच्यात झालेल्या जागावाटपाच्या चर्चेमध्ये ही जागा अखेर भाजपला देण्यात आली. भाजपने येथून पूर्वी राष्ट्रवादीच्या पाठींब्यावर खासदार झालेल्या नवनीत राणा यांची उमेदवारी जाहीर केली. तर कॉंग्रेसनेही दर्यापूर विधानसभेचे विद्यमान आमदार बळवंत वानखडे यांना उमेदवारी देऊन या निवडणुकीत रंगत आणली.

आमदार बच्चू कडू यांच्या प्रहार संघटनेचे उमेदवार दिनेश बुब हे ठाकरे गटाचे कट्टर शिवसैनिक आहेत. महाविकास आघाडीच्या जागावाटपात ही जागा कॉंग्रेसला गेली. त्यामुळे बूब यांनी प्रहार संघटनेमधून उमेदवारी अर्ज दाखल केला.

अमरावतीमध्ये राजकीय परिस्थिती काय?

अमरावती लोकसभा मतदारसंघात 63.67 टक्के मतदान झाले. या लोकसभा मतदार संघातील सहा विधानसभा मतदारसंघापैकी बडनेरा (रवी राणा, अपक्ष), कॉंग्रेसच्या सुलभा खोडके (अमरावती), यशोमती ठाकूर (तिवसा), बळवंत वानखडे (दर्यापूर), प्रहारचे बच्चू कडू (अचलपूर) आणि राजकुमार पटेल ( मेळघाट) असे आमदार आहेत.

निवडणूक निकालाशी संबंधित बातम्या वाचा :

लोकसभा निवडणूक निकाल 2024 LIVE मतमोजणी अपडेट्स

लोकसभा निकाल 2024 चे फुल कव्हरेज

लोकसभा मतदारसंघनिहाय निकाल 2024, एका क्लिकवर

पहलगाम घटनेनंतर काही तासातच बारामुल्लातही दहशतवादी कारवाया
पहलगाम घटनेनंतर काही तासातच बारामुल्लातही दहशतवादी कारवाया.
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्याचा पहिला फोटो
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्याचा पहिला फोटो.
डोंबिवलीवर शोककळा; संजय लेले यांचं कुटुंब काश्मीरकडे रवाना
डोंबिवलीवर शोककळा; संजय लेले यांचं कुटुंब काश्मीरकडे रवाना.
नागपूरचे तिलक रूपचंदानी पहलगाममध्ये फसले; हल्ल्यात पत्नी जखमी
नागपूरचे तिलक रूपचंदानी पहलगाममध्ये फसले; हल्ल्यात पत्नी जखमी.
कश्मीरच्या पहलगाम येथे सर्वात मोठा अतिरेकी हल्ला,२७ पर्यटक ठार
कश्मीरच्या पहलगाम येथे सर्वात मोठा अतिरेकी हल्ला,२७ पर्यटक ठार.
शेलार ठाकरेंना 'लँड माफिया' म्हणताच पेडणेकरांकडून 'झोलर'ची आठवण...
शेलार ठाकरेंना 'लँड माफिया' म्हणताच पेडणेकरांकडून 'झोलर'ची आठवण....
युगेंद्रला साथ द्या, नातवासाठी शरद पवारांची साद म्हणाले, इथून पुढेही..
युगेंद्रला साथ द्या, नातवासाठी शरद पवारांची साद म्हणाले, इथून पुढेही...
'मी सिनिअर मंत्री आता...', चंद्रकांत पाटलांचं लक्ष फडणवीसांच्या पदावर?
'मी सिनिअर मंत्री आता...', चंद्रकांत पाटलांचं लक्ष फडणवीसांच्या पदावर?.
'हिंदी' भाषा सक्तीवरून सरकारची माघार, घेतला मोठा निर्णय; यापुढे...
'हिंदी' भाषा सक्तीवरून सरकारची माघार, घेतला मोठा निर्णय; यापुढे....
राज-उद्धव एकत्र आल्यास मुंबई कोणाची? युती सत्ताधार्‍यांसाठी डोकेदुखी?
राज-उद्धव एकत्र आल्यास मुंबई कोणाची? युती सत्ताधार्‍यांसाठी डोकेदुखी?.