Exit Poll 2024 : या एक्झिट पोलनूसार कॉंग्रेस आघाडीला केवळ 29 जागा, कोणी वर्तविला धक्कादायक अंदाज
लोकसभा निवडणूकांच्या बहुतांशी एक्झिट पोलनी एनडीएला स्पष्ट बहुमत मिळणार असा अंदाज वर्तविला आहे. तर कॉंग्रेस आघाडीला शंभरीच्या आसपास जागा मिळतील असे म्हटले आहे. परंतू एका एक्झिट पोलने कॉंग्रेसला इतक्या कमी जागा दाखविल्या आहेत. की त्यांचे विरोधी पक्ष नेते पदही धोक्यात आले आहे.
लोकसभेच्या सातव्या टप्प्याचे मतदान झाल्यानंतर लागलीच लोकसभा निवडणूक 2024 चे एक्झिट पोल जाहीर झाले आहेत. लगभग सर्वच एक्झिट पोलनी निवडणूकीचे वर्तविलेल्या अंदाजानूसार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना एनडीएला बहुमत मिळणार असे म्हटले आहे. एक्झिट पोलच्या निवडणूक अंदाजामुळे भाजपात आनंदाचे वातावरण आहे. परंतू कॉंग्रेस आघाडीमध्ये टेन्शन पसरले आहे. अनेक एक्झिट पोलनी कॉंग्रेस आघाडीला बहुमतापासून कोसोदूर दाखविले आहे. अनेक एक्झिट पोल कॉंग्रेस प्रणित इंडिया आघाडीला 100 च्या आसपास जागा मिळतील असा अंदाज वर्तविला आहे. परंतू एका निवडणूक एक्झिट पोलने कॉंग्रेस आघाडीला संपूर्ण देशात केवळ 29 ते 35 जागा दाखविल्या आहेत. हा निवडणूक एक्झिट पोल जर खरा ठरला तर लोकसभेत कोणी विरोधी पक्ष नेता देखील होऊ शकणार नाही.
भाजपा प्रणित एनडीएला लोकसभा 2024 च्या निवडणूकात सुदर्शन न्यूज आणि प्रबोधनच्या सर्व्हेने 373 ते 404 जागा मिळतील असा अंदाज वर्तविला आहे. तर कॉंग्रेसला 29 ते 35 जागा मिळण्याची भविष्यवाणी केली आहे. तर इतरांना 94 ते 104 जागा मिळतील असे या एक्झिट पोलने म्हटले आहे. हा असा पहिलाच एक्झिट पोल आहे ज्यांनी कॉंग्रेस आघाडीला इतक्या कमी जागा मिळतील असा अंदाज वर्तविला आहे.याचा अर्थ पश्चिम बंगाल पासून उत्तर प्रदेश, बिहारपर्यंत कॉंग्रेस आणि त्यांच्या आघाडीला खूपच नुकसान होण्याचा अंदाज वर्तविला आहे.
2019 च्या लोकसभा निवडणूकात पाच एक्झिट पोलनी भाजप प्रणित एनडीएला 300 किंवा त्याहून अधिक जागा मिळतील असा अंदाज वर्तविला होता. तर तीन एक्झिट पोलमध्ये एनडीएला 250 पेक्षा जास्त जागा मिळतील असे सांगितले होते. परंतु प्रत्यक्षात, 2019 मध्ये, भाजपने सर्व एक्झिट पोलचे निकालाचे अंदाज चुकवित एकूण 303 जागा जिंकून बहुमत मिळविले होते. तरीही भाजपाप्रणित एनडीएला एकूण 353 जागा मिळाल्या होत्या. भाजपला संपूर्ण देशात सर्वाधिक 37.36 टक्के मते मिळाली होती.
2019 चा एक्झिट पोलमध्ये कॉंग्रेसला किती जागा
लोकसभा निवडणुकीच्या 2019 च्या एक्झिट पोलमध्ये बहुतेक एक्झिट पोलनी काँग्रेस आणि त्यांच्या मित्रपक्षांना 120 पेक्षा जास्त जागांचा अंदाज वर्तविला होता. परंतु प्रत्यक्षात काँग्रेस प्रणित यूपीएला केवळ 93 जागा मिळाल्या. आज तक आणि न्यूज 24 चे एक्झिट पोलचे अंदाज सर्वाधिक खरे ठरले आहेत. ‘आजतक’ने आपल्या एक्झिट पोलमध्ये यूपीएला 77 ते 107 जागा मिळतील असे म्हटले होते. तर न्यूज 24 कॉंग्रेसला 95 जागा मिळतील असे म्हटले होते. काँग्रेसने एकूण 52 जागा जिंकल्या, तर त्यांच्या मित्र पक्षांच्या युपीए आघाडीला एकूण 93 जागा मिळाल्या. काँग्रेसला एकूण 19.49 टक्के मते मिळाली होती.