Lok sabha 2024 : सर्वच पक्षांकडून मुस्लीमांना नकार, 2019 मध्ये 115 तर 2024 मध्ये केवळ 78 जणांना तिकीट
CSDS - Lokniti च्या सर्व्हेक्षणानूसार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या काळात मुस्लीमांना उमेदवारी देण्याचे प्रमाण कमी झाले आहे. राजकीय पक्षांकडून साल 2014 मध्ये मुस्लीमांना ( 59 टक्के ) प्रतिनिधीत्व मिळाले होते, त्यात किंचित वाढ होत, साल 2019 मध्ये मुस्लीमांना ( 60 टक्के ) प्रतिनिधीत्व मिळाले होते.
मुंबई : लोकसभेच्या निवडणूकांचा मोहौल सुरु आहे. मतदानाची प्रक्रिया 19 एप्रिलपासून सुरू झाली आहे. 18 व्या लोकसभेसाठी मतदान सुरु असून मतदानाचे चार टप्पे पार पडले आहेत. तर पाचव्या टप्पाचे मतदान उद्या सोमवार 20 मे रोजी पार पडणार आहे. एकूण आठ टप्प्यात मतदान होत आहे. एका सर्वेक्षणानूसार 2019 च्या सार्वत्रिक निवडणुकांपासून मुस्लिम समुदायातील उमेदवारांची संख्या खूपच कमी झाली आहे. साल 2019 च्या सार्वत्रिक निवडणूकांपासून लोकसभेच्या निवडणूकांत मुस्लीमांना कमी तिकीटे देण्यामागे हिंदुत्वाच्या मुद्द्याआधारे भाजपाला मिळालेले प्रचंड यश मानले जात आहे. त्यामुळे हिंदू व्होट बॅंक नाराज होऊ नये म्हणून इतर पक्षांनी आता आपली रणनीती बदलल्याचे म्हटले जात आहे.
यंदाच्या लोकसभा 2024 च्या सार्वत्रिक निवडणुकीत भाजपाने केवळ एक मुस्लीम उमेदवार उभा केला आहे. भाजपाच्या एनडीएचा साथीदार असलेल्या जेडीयू युनायटेड पक्षाने JD (U) बिहारमध्ये आणखी एक मुस्लीम उमेदवार उभा केला आहे. प्रमुख विरोधी पक्षांमध्येही मुसलमान समाजाचे प्रतिनिधित्व कमी झाले आहे. भारतीय काँग्रेस, तृणमूल काँग्रेस, समाजवादी पक्ष, RJD, एनसीपी ( NCP ) आणि CPI (M) यांनी यावेळी 78 मुस्लिम उमेदवार उभे केले आहेत, साल 2019 च्या लोकसभेच्या वेळी सर्वपक्षांनी मिळून एकूण 115 मुस्लीमांना उमेदवारी दिली होती असे इंडियन एक्स्प्रेसमधील एका लेखात म्हटले आहे.
गेल्यावेळी इतके मुस्लीम खासदार
गेल्या लोकसभा 2019 मध्ये एकूण 26 मुस्लीम खासदार निवडून संसदेत पोहचले होते. त्यापैकी प्रत्येकी चार सदस्य भारतीय कॉंग्रेस आणि तृणमुल कॉंग्रेसचे होते. बहुजन समाज पार्टी आणि समाजवादी पार्टीचे प्रत्येकी तीन होते. तर एनसीपी आणि सीपीआय ( मार्क्सवादी ) यांचा प्रत्येकी एक सदस्य होता. तर इतर मुस्लीम सदस्य आसामच्या AIUDF चे, लोक जनशक्ती पासवान ( सध्या दोन भाग झाले आहेत ), IUML आणि जम्मू आणि कश्मीर नॅशनल कॉन्फरन्सचे होते.
बसपाने सर्वाधिक उमेदवारी दिली
सध्या होऊ घातलेल्या लोकसभा 2024 च्या निवडणूकांमध्ये सर्वात जास्त बहुजन समाज पार्टीने 35 मुस्लीम उमेदवारी दिली आहे. तर त्यातीलस अर्ध्याहून अधिक उमेदवार उत्तर प्रदेशात ( 17 ) उभे केले आहेत. तर चार जणांना मध्य प्रदेशातून, प्रत्येकी तीन जणांना बिहार आणि दिल्लीतून तिकीट दिले आहे. दोघांना उत्तराखंड आणि राजस्थान, तामिळनाडू, पश्चिम बंगाल, झारखंड, तेलंगणा आणि गुजरात येथून प्रत्येकी एका मुस्लीम उमेदवाराला मायावतीच्या बहुजन समाज पार्टीने तिकीट दिले आहे.
उत्तर प्रदेशातून सर्वाधिक खासदार संसदेत जातात. बहुजन समाज पार्टीने उत्तर प्रदेशात 2024 च्या लोकसभा निवडणुकीत एकूण जागांपैकी 25 टक्के जागांची तिकीटे अल्पसंख्याकांना दिली आहेत. बहुजन समाज पार्टीने आपल्या पुनरुज्जीवनासाठी दलित – मुस्लीम मतांचे ध्रुवीकरण करीत बाजी मारली आहे.
कॉंग्रेसने किती मुस्लीमांना तिकीट दिले
सध्या सुरू असलेल्या लोकसभा 2024 निवडणुकीत काँग्रेसने सर्वाधिक 19 मुस्लीम उमेदवारांना तिकीट दिले आहे, त्यातील सर्वाधिक सहा जागा बंगालमध्ये दिल्या आहेत. टीएमसी ( TMC ) सहा उमेदवारांसह या यादीत तिसऱ्या स्थानावर आहे. साल 2011 च्या जनगणनेनूसार पश्चिम बंगालमध्ये मुस्लीमांची संख्या 27 टक्के इतकी आहे. उत्तर बंगालच्या उत्तर दिनाजपूर जिल्ह्यात ( एकूण लोकसंख्येच्या 49.9 टक्के ) आणि मालदा ( 51.3%), मध्य बंगालच्या मुर्शीदाबाद जिल्ह्यात (66.3%), आणि दक्षिण बंगालच्या बिरभूम ( 37%), दक्षिण 24 परगणा ( 35.6% ), आणि उत्तर 24 परगाणा (25.8%) अशी मुस्लीमांची लोकसंख्या आहे.
समाजवादीने युपीत 4 उमेदवार दिले
भाजपाने समाजवादी पार्टीवर नेहमीच मुस्लीमांची बाजू घेत असल्याचा आरोप केला आहे. तरी परंतु मुस्लीम समाजाची मोठी लोकसंख्या असलेल्या मतदारसंघात समाजवादी पार्टीने यंदा केवळ 4 मुस्लीम उमेदवारांना उभे केले आहे. मुस्लीमांऐवजी समाजवादी पार्टीने यंदा 20 टक्के दलीतांसह उत्तर प्रदेशातील सर्वात मोठा ( 40 टक्के ) मतदार असलेल्या ओबीसींना आकर्षित करण्याचा प्रयत्न केला आहे.