तटस्थ राहिले आणि इतिहास घडला, दोन वादळात डझनभर पक्षांचा पालापाचोळा

लोकसभा निवडणुकीत प्रामुख्याने भाजपप्रणीत एनडीए आणि विरोधी पक्षांची तयार झालेली इंडिया आघाडी या दोन गटात प्रामुख्याने लढत झाली. एनडीए आणि इंडिया आघाडी अशी दोन वादळे देशात घोंगावत होती. मात्र, या वादळात काही पक्ष पालापाचोळ्या सारखे उडून गेले.

तटस्थ राहिले आणि इतिहास घडला, दोन वादळात डझनभर पक्षांचा पालापाचोळा
prakash ambedkar, navin patnayakImage Credit source: TV9 NEWS NETWORK
Follow us
| Updated on: Jun 06, 2024 | 10:30 PM

नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील एनडीए तर दुसरीकडे विरोधी पक्षांची निर्माण झालेली इंडिया आघाडी यांच्या प्रमुख लढत झाली. देशभरातील काही पक्ष एनडीएच्या बाजूने उभे राहिले तर काही पक्ष इंडिया आघाडीत सामील झाले. परंतु, असे अनेक पक्ष असे होते की ज्यांनी तटस्थ राहण्याची भूमिका घेतली होती. या पक्षांनी स्वबळावर लोकसभा निवडणूक लढविल्या. पण, दोन्ही आघाडीपासून तटस्थ राहिलेल्या त्या पक्षांना जनतेने नाकारले आहे. यामध्ये केवळ राष्ट्रीय पक्षच नाही तर अनेक प्रादेशिक पक्षांचाही समावेश आहे. लोकसभा निवडणुकीत जनतेने नाकारलेल्या पक्षांमध्ये सध्या कोणत्या ना कोणत्या राज्यात सत्तेत असलेले किंवा सत्तेबाहेर असलेले पक्ष अधिक आहेत.

नवीन पटनायक यांची बीजेडी शून्यावर बाद

लोकसभेच्या निवडणुकीत ज्या पक्षांना जनतेने नाकारले आहे त्यामध्ये ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक यांच्या बिजू जनता दलाचा पहिला नंबर लागतो. ओडिशामध्ये नवीन पटनायक यांची गेली 24 वर्ष सत्ता आहे. लोकसभा निवडणुकीआधी नवीन पटनायक यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली होती. एनडीएमध्ये सामील होण्याचा त्यांनी निर्णय घेतला होता. मात्र, जागावाटपावरून ही युती तुटली आणि नवीन पटनायक यांनी स्वबळावर निवडणूक लढण्याचा निर्णय घेतला. पण, लोकसभा निवडणुकीत बिजू जनता दलाला शून्य जागा मिळाल्या. लोकसभेसोबतच ओडिशामध्ये विधानसभेच्याही निवडणुका झाल्या. त्यातही पटनायक यांच्या पक्षाचा दारुण पराभव झाला. 147 सदस्यीय विधानसभेत बिजू जनता दलाला 51 जागांवर समाधान मानावे लागले. खुद्द मुख्यमंत्री पटनायक यांना एका जागेवर पराभवाची चव चाखावी लागली. आता इथे भाजपचे सरकार स्थापन होणार आहे. भाजपला 78 तर काँग्रेसला 14 जागा मिळाल्या आहेत.

मायावतींच्या बसपाची अवस्था वाईट

मायावती यांच्या बहुजन समाज पक्षाने 2019 मध्ये उत्तर प्रदेशमध्ये सपाबरोबर युती करून लोकसभा निवडणूक लढवली होती. त्यावेळी बसपाने 10 जागा जिंकल्या होत्या. मात्र, यावेळी बसपाने स्वतंत्र निवडणूक लढविली. पण, बसपालाही लोकसभेची 10 पैकी एकही जागा जिंकता आली नाही. मात्र, यूपीमध्ये बसपाला एकूण 9.39 टक्के मते मिळाली आहेत. 2022 च्या यूपी विधानसभा निवडणुकीतही बसपा एकट्याने लढला होता. त्या निवडणुकीतही त्यांना केवळ एक जागा मिळाली होती.

तेलंगणात केसीआरची जादू संपली

चंद्रशेखर राव यांच्या पक्ष भारत राष्ट्र समिती (BRS) पक्षाने दक्षिणेकडील तेलंगणा राज्यात नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत म्हणजेच नोव्हेंबर 2023 मध्ये गेली दहा वर्षे असलेली सत्ता गमावली. चंद्रशेखर राव यांना हा मोठा धक्का होता. त्यानंतर राज्यातील लोकसभेच्या एकूण 17 जागांपैकी एकही जागा भारत राष्ट्र समितीला जिंकता आली नाही. राज्यात भाजपने 8 तर सत्ताधारी काँग्रेसने 8 जागा जिंकल्या. मात्र, या दोन्ही आघाडीपासून दूर राहूनही AIMIM चे असदुद्दीन ओवेसी यांनी आपली हैदराबादची जागा वाचवण्यात यश मिळवले आहे. राज्यात काँग्रेसला 40.10% मते मिळाली आहेत. तर, भाजपला 35.08% आणि AIMIM ला 3.02% मते मिळाली आहेत.

तामिळनाडूचा AIADMK ही पराभूत झाला आहे

दुसऱ्या दक्षिणेकडील राज्य तामिळनाडूचा पूर्वीचा सत्ताधारी पक्ष आणि राज्याचा मुख्य विरोधी पक्ष म्हणजेच AIADMK ला देखील लोकसभा निवडणुकीत शून्य जागा मिळाल्या आहेत. पक्षाला एकूण 20.46 टक्के मते मिळाली. एआयएडीएमकेने कोणत्याही युतीशी हातमिळवणी केली नाही. गेल्या निवडणुकीत एआयएडीएमके पक्ष एनडीए आघाडीचा एक घटकपक्ष होता.

खुद्द मेहबुबा मुफ्ती पराभूत झाल्या, पक्षाचाही झाला पराभव

जम्मू काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री आणि पीडीपीच्या अध्यक्षा मेहबूबा मुफ्ती यांचाही अनंतनाग राजौरी लोकसभा मतदारसंघातून पराभव झाला. नॅशनल कॉन्फरन्सच्या मियां अल्ताफ यांनी त्यांचा पराभव केला. नॅशनल कॉन्फरन्स आणि काँग्रेस यांची युती होती. तर, पीडीपीने एकट्याने निवडणूक लढवली होती. राज्यातील लोकसभेच्या एकूण पाच जागांपैकी पीडीपीला एकही जागा जिंकता आली नाही.

हरियाणात चौटाला कुटुंब हवेत…

इंडियन नॅशनल लोकदल आणि जननायक जनता पार्टी या हरियाणातील सर्वात मोठ्या राजकीय कुटुंबातील चौटाला घराण्याचे दोन पक्ष आणि माजी उपपंतप्रधान चौधरी देवी लाल यांनी स्वतंत्रपणे निवडणूक लढवली होती. पण, दोन्ही पक्षांना शून्य जागा मिळाल्या. हिस्सार लोकसभा जागेवर चौटाला कुटुंबातील तीन उमेदवार उभे होते. यापैकी आयएनएलडी आणि जेजेपीच्या दोन उमेदवार सुनैना चौटाला आणि नयना चौटाला आपले डिपॉझिटही वाचवू शकल्या नाहीत. एकेकाळी राज्यात INLD चा वरचष्मा होता आणि ओमप्रकाश चौटाला यांचे सरकार सत्तेवर होते.

वंचित बहुजन आघाडीलाही शून्य जागा

महाराष्ट्रात प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीलाही शून्य जागा मिळाल्या. प्रकाश आंबेडकर यांनी इंडिया आघाडीसोबत दीर्घकाळ जागावाटपाची बोलणी सुरु ठेवली होती. परंतु, इच्छित करार न झाल्याने त्यांनी एकट्याने निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला. प्रकाश आंबेडकर अकोल्यातून पराभूत झाले. याशिवाय आसाममधील एआययूडीएफ या एकेकाळी काँग्रेसच्या सहयोगी पक्षालाही शून्यावर आऊट व्हावे लागले. या पक्षाचे नेते बद्रुद्दीन अजमल यांना त्यांची धुबरी जागा वाचवता आली नाही.

बीड हत्या प्रकरण : अंजली दमानिया यांना गुन्हे शाखेची नोटीस
बीड हत्या प्रकरण : अंजली दमानिया यांना गुन्हे शाखेची नोटीस.
संतोष देशमुख प्रकरणात राष्ट्रवादीच्या महिला पदाधिकाऱ्याची CID चौकशी
संतोष देशमुख प्रकरणात राष्ट्रवादीच्या महिला पदाधिकाऱ्याची CID चौकशी.
'मुख्य आरोपीला वाचवण्यासाठी मोहरे...,' काय म्हणाले विजय वडेट्टीवार
'मुख्य आरोपीला वाचवण्यासाठी मोहरे...,' काय म्हणाले विजय वडेट्टीवार.
'...यानंतर लाडकी बहीण योजना बंद..,' ठाकरे गटाच्या नेत्याचं वक्तव्य
'...यानंतर लाडकी बहीण योजना बंद..,' ठाकरे गटाच्या नेत्याचं वक्तव्य.
' तर चॅट भाषणाआधीच व्हायरल केला असता...,' काय म्हणाले जितेंद्र आव्हाड
' तर चॅट भाषणाआधीच व्हायरल केला असता...,' काय म्हणाले जितेंद्र आव्हाड.
जिल्ह्यातील लोकांनी भूमिका घ्यायला हवी होती, संतोषच्या बंधूंची खंत
जिल्ह्यातील लोकांनी भूमिका घ्यायला हवी होती, संतोषच्या बंधूंची खंत.
तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल
तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल.
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती.
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे.
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस.