Exit Poll 2024 : एक्झिट पोलवर प्रशांत किशोर यांची खणखणीत प्रतिक्रिया; असा दाखवला आरसा, तुम्ही वाचायलाच हवा सल्ला

Lok Sabha Elections 2024 Exit Poll : लोकसभा निवडणुकीच्या निकालापूर्वी एक्झिट पोलचा पोळा फुटला. त्यात भाजप नेतृत्वातील एनडीएला कौल देण्यात आला आहे. तर काही राज्यात इंडिया आघाडीने भाजपच्या स्वप्नांना सुरुंग लावल्याचे दिसून येते. या घडामोडींविषयी प्रशांत किशोर यांची पहिली प्रतिक्रिया आली आहे.

Exit Poll 2024 : एक्झिट पोलवर प्रशांत किशोर यांची खणखणीत प्रतिक्रिया; असा दाखवला आरसा, तुम्ही वाचायलाच हवा सल्ला
प्रशांत किशोर यांनी असा दाखवला आरसा
Follow us
| Updated on: Jun 02, 2024 | 3:44 PM

लोकसभा निवडणूक 2024 च्या एक्झिट पोल आल्यानंतर लागलीच राजकीय रणनीतीकार प्रशांत किशोर यांनी तात्काळ प्रतिक्रिया दिली. सहाव्या आणि सातव्या टप्प्यातील मतदानादरम्यान त्यांनी लोकसभा निवडणुकीत अनेक पक्षांचे कुठे प्राबल्य दिसेल. कुठे हा पक्ष नवीन खाते उघडेल. कुठे त्याला फटका बसेल, याचे भाकीत केले होते. त्यांनी भाजपच्या निवडणुकीसाठीच्या धोरणाचे आणि रणनीतीचे कौतुक केले होते. त्यामुळे एक्झिट पोलनंतर ते काय प्रतिक्रिया देतील याविषयी उत्सुकता होती.

प्रशांत किशोर यांनी टोचले कान

प्रशांत किशोर यांनी निवडणुकीचे कौल आल्यानंतर काही पत्रकार आणि नेत्यांवर निशाणा साधला. त्यांनी लोकांना आवाहन केले की नाहकच्या चर्चा आणि विश्लेषणात तुमचा अमूल्य वेळ फुकट वाया घालवू नका. त्यांनी अनेक एक्झिट पोलमध्ये भाजप नेतृत्वातील एनडीएला बहुमत मिळत असल्याच्या आकडेवारीकडे लोकांचे लक्ष वेधले.

हे सुद्धा वाचा

असा दाखवला आरसा

” पुढील वेळी ज्यावेळी निवडणुका असतील आणि राजकीय चर्चा होईल, त्यावेळी तुमचा अमूल्य वेळ या बोगस पत्रकार, भंपक नेते आणि स्वयंभू मीडिया विश्लेषकांच्या दळभद्री चर्चेसाठी वाया घालवू नका’, प्रशांत किशोर यांनी एक्झिट पोल आणि त्यानंतरच्या गोंधळावर अशी खणखणीत प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी एक्स या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर याविषयीची पोस्ट शेअर केली आहे.

एक्झिट पोल 2024 चे निकाल हाती येण्यापूर्वी काही तास अगोदर प्रशांत किशोर यांनी ‘द प्रिंट’ ला मुलाखत दिली होती. या मुलाखतीत भाजप नेतृत्वातील एनडीए जोरदार कामगिरी बजावणार असल्याची यापूर्वीच भविष्यवाणी त्यांनी पुन्हा केली.

भाजप करणार कमाल

गेल्या निवडणुकीपेक्षा भाजप चांगली कामगिरी बजावेल असे भाकीत प्रशांत किशोर यांनी केले होते. पश्चिम आणि उत्तर भारतातील जागांमध्ये फारसा बदल होईल असे वाटत नसल्याचे ते म्हणाले होते. तर पूर्व आणि दक्षिण राज्यातील मतदान खेचण्यात भाजप यशस्वी होण्याचा दावा त्यांनी खूप पूर्वी केला होता. तेलंगणा, आंध्र प्रदेश, केरळ आणि तामिळनाडूमध्ये भाजप लक्षणीय कामगिरी करुन दाखवेल, हे त्यांचे भाकीत, एक्झिट पोल पण मान्य करत आहेत. तर कर्नाटकमध्ये भाजप दमदार कामगिरी करेल. बिहार, राजस्थान, महाराष्ट्र आणि हरियाणामध्ये मात्र भाजपला फटका बसेल असा त्यांचा अंदाज आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींविरोधात लोकांमध्ये असंतोष नसल्याचे त्यांनी सांगितले.

... अन् एकटी महिला भिडली, छेड काढणाऱ्याला चांगलंच चोपल, बघा व्हिडीओ
... अन् एकटी महिला भिडली, छेड काढणाऱ्याला चांगलंच चोपल, बघा व्हिडीओ.
मुंबईतील काँग्रेस कार्यालयात घुसून आंदोलन करणं 'भाजप युवा'च्या अंगाशी
मुंबईतील काँग्रेस कार्यालयात घुसून आंदोलन करणं 'भाजप युवा'च्या अंगाशी.
'ए अंबादास खाली बस...', शिंदेंनी विरोधकांना फटकारलं, सभागृहात काय झाल?
'ए अंबादास खाली बस...', शिंदेंनी विरोधकांना फटकारलं, सभागृहात काय झाल?.
'.. आता भाजपची वाट', सुषमा अंधारे यांचा नेमका कोणाला खोचक टोला?
'.. आता भाजपची वाट', सुषमा अंधारे यांचा नेमका कोणाला खोचक टोला?.
बीड सरपंच संतोष देशमुखांची हत्या, शवविच्छेदन अहवालातून काय आलं समोर?
बीड सरपंच संतोष देशमुखांची हत्या, शवविच्छेदन अहवालातून काय आलं समोर?.
अचानक संध्याकाळी 17 लाख मतं वाढली? EVMच्या आरोपांवर फडणवीसांचं उत्तर
अचानक संध्याकाळी 17 लाख मतं वाढली? EVMच्या आरोपांवर फडणवीसांचं उत्तर.
'लाडक्या बहिणीं'नो तुमच्यासाठी मोठी बातमी, डिसेंबरचा हफ्ता कधी मिळणार?
'लाडक्या बहिणीं'नो तुमच्यासाठी मोठी बातमी, डिसेंबरचा हफ्ता कधी मिळणार?.
अध्यक्ष महोदय बोट दुर्घटना तुमच्याच मतदारसंघातील, दादा असं का म्हणाले?
अध्यक्ष महोदय बोट दुर्घटना तुमच्याच मतदारसंघातील, दादा असं का म्हणाले?.
'बहुमत मिळाल्यानं गांगरून गेलेत', मनसे नेत्याची महायुतीवर सडकून टीका
'बहुमत मिळाल्यानं गांगरून गेलेत', मनसे नेत्याची महायुतीवर सडकून टीका.
...म्हणून भूजबळांना महायुतीच्या मंत्रिमंडळातून डावललं, कारणं आली समोर
...म्हणून भूजबळांना महायुतीच्या मंत्रिमंडळातून डावललं, कारणं आली समोर.